दृपालची आरती

Submitted by Kiran.. on 19 June, 2012 - 01:12

th.jpg

सुखहर्ता दुखकर्ता वार्ता विघ्नाची
सेव्हण्या पुर्वी लेख कृपा जयाची

लाथाळी थांबे क्षणाक्षणाची
पाच पाच मिनिटास येई आठवण धाग्यांची

जयदेव जयदेव जय दृपाल देवा
चाहूल मात्रे भरते धडकी मनाला... जयदेव जयदेव

उणीदुणी इथे नित्यप्रहरा
बाफाबाफावर लत्ताप्रहारा
नीलवर्णि तू शोभतो बरा
अंगाई गातसे दमल्या सर्वरा

जयदेव...........
शिवशिवती बोटे शत्रूदमना
कंपू करती फोन एकामेकांना
सरळ झोडावे कि उफराटा बाणा
बाफ कामाचा पेटताहे सरणा
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सर्वर वंदांना
जयदेव..................

- Kiran..

shilpa mahajan ताई,
दृपल / ड्रुपल हे drupal असे गुगललेत (म्हणजे गूगल वर ''सर्च" केलेत) तर तुमच्या लक्षात येईल की ही मायबोली चालविण्यासाठी आधारभूत प्रणाली आहे. तिथे गडबड झाल्याने मायबोली सुमारे १ दिवस 'डाऊन' होती. (जालावरून मायबोलीची साईट गायब होती. त्या कालावधीच्या आधीचे कित्येक प्रतिसादही कालाच्या उदरात गायब झालेत.)
तेंव्हा भारतीय प्रथेनुसार, काहीही झाले की कोपणार्‍या देवाची आपण आधी आरती करून टाकतो. तशी किरणरावांनी दृपलदेवाची आरती लिहिली आहे.
आता समज्लं का कस्ला द्येव हाये तो?

इब्लीस - उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
शिल्पा - उत्तर मिळालं ना ? आज सकाळी दृपल महाराज आलेले Happy
प्रमोद काका धन्यवाद !

Pages