गुगल अर्थचा उपयोग

Submitted by आराध्या on 11 June, 2012 - 03:15

गुगलचे "गुगल अर्थ" या सोफ्टवेयरचा आपल्या दैनदिंन आयुष्यात काही उपयोग करता येतो का, ते कसे वापरले जाते, व त्याचा काय उपयोग केला जातो, क्रुपया कोणी हे सोफ्ट्वेयर वापरत असेल तर आपले अनुभव शेयर करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वापरतो. पण त्याला जरा फास्ट कनेक्शन लागतं. त्यामुळे मी तरी आयफोनआयपॅड वरच गूगल मॅप्स वापरतो. सगळ्यात जास्त वापर रस्ता शोधायला होतो. आपल्या करंट लोकेशन पासून पाहीजे अस्लेल्या ठीकाणाचा रस्ता ९० - ९५ % बरोबर आणि जवळचा अस्लेला आपोआप समोर येतो.
त्याखालोखाल, रेस्तराँ, कॉफीशॉप्स, बुकस्टोर्स शोधायला पण चांगलाच कामाला येतो. मुख्यम्हणजे हे सगळं मुंबापुरीत व्यवस्थित होतं. अगदी २जी नेटवर्कवर सुद्धा...

गुगल अर्थ ! भूलोकीचे एक स्वप्नच जणू...
मी तर तासन तास गूगल अर्थ सर्फ करतो.
स्थानिक रीत्या बर्‍याचशा जागा, दुकाने, ऑफिसे शोधायला उपयोग चांअगला होतो . बर्‍याचशा बारीक सारीक गोष्टी लोकानी फीड केल्या आहेत त्यामुळे सर्च मध्ये टाकले की सर्व थिकाणे दिसू लागता. उदा.विजय सेल्स, पुणे असा सर्च दिला की पुण्यातील विजय सर्चची सर्व दुकाने पत्ता व लोकेशसह दिसतात. आम्हाला एकदा अंधेरीच्या एका कम्पनीत परीक्षेला जायचे होते. आम्ही पुण्यातून गूगल अर्थवर सर्व रस्ता पाहून ठेवला होता. तो भाग कधीही पाहिला नसताना व ड्रायवरलाही रस्ता माहीत नसताना त्यालाच 'मार्गदर्शन' करीत आम्ही बरोब्बर पोचलो! जगातील प्रेक्षणीय स्थले 'पाहण्याचे ते एक उत्तम माध्यम आहे. शिवाय त्या त्या ठिकाणी लोकानी फोटो व यू ट्यूबच्या क्लिप्स टाकलेल्या असतात त्यामुळे प्रत्यक्ष तिथे असल्याचा फील येतो. पुलं, मीना प्रभू यांची प्रवास वर्णने वाचताना मी बर्‍याचदा गुगल अर्थचा वापर करतो. ७५० रुपयांच्या अनलिमिटेद बी एस एन एलच्या ब्रॉडबॅन्डचा पुरेपूर वापर ! Happy

लहानपणी फिरलेल्या जागा, आपली शाळा,खेळण्याच्या जागा 'वरून' पहायला वेगळीच खुमारी येते...

गुगल अर्थ व गुगल नकाशाचा उपयोग आमच्या सारख्या भटक्यांना सह्याद्रीतील अनवट गड-किल्ले, रानवाटा शोधण्यासाठी प्रामुख्यांने होतो. गेल्या महीन्यात त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) गेलो असता, त्रिंबकगडाचा एक भाग असलेल्या भंडारदुर्गाची पाऊलवाट शोधण्यासाठी गुगलनकाशा फार उपयोगी पडला. तसेच मराठवाड्यातील औसा, उदगीर, नळदुर्ग, नरनाळा, कंक्राळा..इ.इ. किल्ल्यांपर्यंत पोहचण्यासाठीचे रस्ते शोधण्याच्या कामी गुगल नकाशाचा बराच उपयोग झाला.

यू एस मधले तर रोड कॅमेरा फोटोज तर अफलातून आहेत अगदी रस्त्याने चालत गेल्यासारखेच वाटते. तसेच आता सगळाच भाग हाय रिझॉल्युशनखाली आला आहे व ३ डी देखील Happy
३६० डेग्रीज चे फोटो ३६० अंशातून पॅन करून टाकलेले पहायलाही मजा येते. शिवाय लाईव हवामानविषयक फोटोज देखील..

३६० डेग्रीज चे फोटो ३६० अंशातून पॅन करून टाकलेले पहायलाही मजा येते > अगदी.

गुगल नकाशाचा उपयोग आमच्या सारख्या भटक्यांना सह्याद्रीतील अनवट गड-किल्ले, रानवाटा शोधण्यासाठी प्रामुख्यांने होतो. > +१

विकिमॅपिया वापरुन बघा.. सोसायटी / घराचा उल्लेख देखिल सापडतो.