उन्हाळा

Submitted by चाऊ on 14 September, 2008 - 05:54

सोनेरी पंखांचा ह्ळ्द्या सुंदर शिळ घालतो आहे. हवेतला उश्मा जिवाची काहीली करतोय. उन्हाळा सुरु झाल्याच्या खुणा पुन्हा नव्याने शाळा कालेजच्या दिवसांची आठवण करुन देत आहेत. ती दूष्ट परिक्षा आणी त्या नंतर उन्हाळ्याची सुट्टी. नुस्ती धमाल.
कॆर्य़ा (मला कयरया म्हणायचय!), करवंद,जांभळं, करमळं, रांजणं,कोकंब, फणस,ताडगोळे .. केव्हडा तरी जंगलचा मेवा.दिवसभर उनाडायचं, पत्ते खेळायचे, ल्याडिस, झब्बु,बदाम सत्ती; आजच्या मुलांना हे सगळं अनोळखी वाटेल. लगोरी, वीटी-दांडु, खांब-खांबोळी, सुर-पारंब्या, सागर-गोटे, काच-पाणि.. केव्हडे तरी खेळ. कोणतेही खर्चिक कींवा महागडं सामान नको, शिकवायला कोच नको, मोठं खास तयार केलेलं पटांगण नको.अंगणात, ओसरीत,रस्त्यावर, वाडीत, माळ्यावर कींवा माळरानात, कुठेही खेळा.दिवस उतरणीला लागला की निघायचं समूद्रावर जायला.वाळुत पकडा-पकडी, उभा खोखो नाहीतर पाण्यात डुंबायच.
रात्री जेवल्यावर उघड्या (ओपन ऐयर) चित्रपटग्रुहात सिनेमा पहायला जायचं. दर दिवसा आड नवा चित्रपट, सुट्टीत विस - पंचविस टुकार खेळ पाहीले जायचे.ऐखादा बरा असला तर पर्वणी!आणी सिनेमात कुणाला रस होता? बडबड, मस्ती, हेच उद्दीष्ट्य.
नाहीतर रात्री परत पत्ते कुटायचे. कोणीतरी भुताच्या गोष्टी सुरु करयच्या. भिती वाटत असली तरी ऐकाव्याश्या वाटायच्या. मग काळोखात, काही करायला जायची वेळ आली की पंचाईत!सावल्यांमध्ये, हलणाय्रा पानांमध्ये नको ते आकार दिसायचे. घाबरलो सांगायची पण लाज;त्यात साप-किरडांचं भय.
पण त्यातच मजा असायची.
घामाच्या धारांनी पुन्हा मला गावी नेउन सोडलं.गेलं बालपण पुन्हा येणं नाही, पण गाव अजुन तसच आहे. आणि ती गावाला जायची ओढ ही!

गुलमोहर: 

chaoo,
कैर्‍या kaiRyaa असे लिहा.
---------------------------------------------------------------
I'm not dumb. I just have a command of thoroughly useless information
- Calvin & Hobbs

>>लगोरी, वीटी-दांडु, खांब-खांबोळी, सुर-पारंब्या, सागर-गोटे, काच-पाणि.. केव्हडे तरी खेळ.
हो ना.... फारफार मजा यायची हे सगळ खेळायला Happy
याच्या जोडीला रुमालपाणी, लोखंडपाणी, विषामृत, जोडसाखळी, भारत भारत, टीपीटीपी टीपटॉप, डब्बा ऐसपैस, नवा व्यापार.... कित्ती कित्ती खेळ खेळायचो!
खरयं.... गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी Happy

कैर्‍या .. जमलं
मनःपुर्वक धन्यवाद.