मराठीतून संगणकावर आपली वैयक्तिक दैनंदिनी (डायरी) लिहिण्यासाठी कोणते software वापरावे ?

Submitted by आराध्या on 7 June, 2012 - 04:15

मला माझ्या संगणकावर मराठी भाषेतुन माझी वैयक्तिक दैनंदिनी ( डायरी) लिहायची आहे तर मी कोणते free software वापरू ? मी गूगल सर्च केल्यावर काही फ्री सोफ्टवेअर पाहिले परंतु ते हि सेवा इंग्रजी व काही इतर भाषांमध्ये देतात परंतु मला मराठीमधुनच डायरी लिहायची आहे तर मायबोलीवरील सदस्यांना अश्या कोणत्या free software बद्दल माहिती असेल तर जरुर कळवावे. सध्या मी Google Marathi Input ही सेवा वापरुन मराठी मध्ये लिहीत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही वैयक्तिक दैनदिनी लिहिण्यासाठी Google blogger चा वापर करू शकता . blogspot अकौंट ओपन करा आणि अशी setting करा कि तो ब्लॉग फक्त तुम्हालाच दिसेल . मराठीत लिहिण्यासाठी Google Marathi Input चा उपयोग करा .

फायदे :
१ . software install करण्याची गरज नाही .
२. हार्ड डिस्क करप्ट झाली कि data lost होण्याची भीती नाही .
३. जगातून कुठूनही वापरता येते .

मला offline वापरता येइल असे software हवे आहे means I need Digital Diary instead of Paper Diary.......मी आता दोन software डाउनलोड केली. idaily diary and efficient diary त्यातील efficient diary मला जास्त चांगले वाटले कारण त्यामध्ये Smiley add करता येतात , मी त्यामध्ये google marathi input वापरुन मराठी मध्ये लिहित आहे, व ते मराठीमध्ये सेव होत आहे. अश्या software मुळे काही viruscha problem होत नाही ना किंवा आपली माहिती कोणी वापरत नाही ना ?? .... Sad कोणाला याबद्द्ल काही माहिती आहे का ????

खालील दुव्यावरुन गमभन प्रो किंवा लाईट उतरवून घ्या. झीप फाईल अनझीप केल्यावर त्यात कसे वापरायचे त्याची सर्व माहिती मिळेल. पण माझ्या माहितीप्रमाणे गमभन वापरण्यासाठी (ऑफलाईन) संगणकावर आय.ई. (internet explorer) असणे गरजेचे आहे.

http://www.gamabhana.com/?q=node/3

धन्स मुंबइकर , विशाल कुलकर्णी
माझ्या संगणकावर आय. ई आहे, मी गमभन वरुन फाइल उतरवून घेते, बहुतेक त्याचा मला उपयोग होइल असे वाटते Happy