मी काय करू?

Submitted by उमेश गवळी on 4 June, 2012 - 05:52

माझे वय ४२ वर्श आहे. मला सध्या कोनताहि जोब नाहि .माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे तसेच सतत अपयश येत असल्यामुळे माझ्या पत्नीला नैराश्य आलेले आहे. या नैराश्याच्या भरात ती अनेकदा "आपण सर्वजण आत्महत्या करूयात" असे म्हणत असते. मला १२ वर्षाची एकच गोड मुलगी आहे. अनेकदा तिच्याकडे पाहून मी हा विचार मनातून काढून टाकत असतो परंतु माझ्या मुलीलाच जर मी आवश्यक गोष्टी देऊ शकलो नाही तर जगण्याचा मला काहीच अधिकार नाही असे माझी पत्नी म्हणत असते ....मी काय करू?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्महत्या करु नका, आयुष्य खुप सुन्दर आहे, भरपुर प्रयत्न करा, नोकरी नक्कीच मिळेल, तुम्ही खचून जावू नका, तुमच्या पत्नीला आणि मुलीला धीर द्या. परिस्थिती नक्कीच बदलेल.

Everything will be fine at the end, if not, it is not the end. Try hard and be positive my friend!

आत्महत्त्यावगैरेचा विचारही करू नका हो.. एकच आयुष्य मिळालय आपल्याला..
कधीकधी जास्त त्रास होतो, पण हे ही दिवस जातील.
स्वतःवर विश्वास ठेवणं कधीकधी अवघड वाटतं - पण तरीही hang in

बायकोला घेऊन काऊन्सेलर कडे जाणं शक्य असल्यास दोघही जाऊन या.

जॉब नसला तरी काहीतरी छोटा व्यवसाय सुरू करा. लोकांची भीड बाळगू नका, कष्टाची तयारी ठेवा. आपलं भविष्य आपल्याच हातात असतं. एकदा पैसा मिळायला लागला की आत्मविश्वास नक्की वाढेल. आत्महत्या ही पळवाट आहे.

आपल्याला मुलं झालं कि आपल आयुष्य फक्त आपल एकट्याच रहात नाही. त्यामुळ आत्महत्या करण्याचा पर्याय तुमच्याकडे नाही.
तुमच्या १२ वर्षाच्या मुलीला आवश्यक गोष्टी तुम्ही दोघांनी अगदी साध्यातला साधा जॉब केला तरी पुरवु शकता. तुमच्या मिसेसनाही काम बघायला सांगा. अगदी डबे प्रोव्हाईड करण्यापासून अनेक कामे घरातूनही करता येतील. लोक काय म्हणतील त्याचा विचार करु नका.
ही फेज तात्पुरती असणार आहे. कसलही काम करायची तयारी असणार्‍या माणसाच कधी अडत नाही .

वरच्या सार्‍यांशी सहमत! आत्मह्त्या वगैरे शब्द पण मनात आणू नका!
अवघड काळ येतच असतो. तसा तो जातोही.
hang in there. This too shall pass! all the best!

तुमच्या मिसेसनी तुम्हाला आत्महत्येविषयी सांगण्या ऐवजी खंबीरपणे तुम्हाला साथ द्यायला हवी. सर्व मिळून आत्महत्या तर कराल पण स्वतःचीच तेवढी आत्महत्या असते, दुसर्याचा तो "खून" च असतो.
काय अधिकार तुम्हाला तिच्या (मुलिच्या) आयुष्याला संपवायचा? आणि तुमच्या आत्महत्त्येने तिची परीस्थिती आहे त्याहून बिकट होईल हे लक्षात येतय का?
हे विचार काढून टाका, हाती पायी धड नसलेली, अंध्,मुकी माणसे आयुष्याशी झगडताना दिसतात.

तुम्ही पुढे व्हा. मित्रांशी बोला, लहान सहान कामं सुरू तर करा. पत्नीलाही धीर द्या, तिलाही हातभार लावायला सांगा. प्रॉब्लेम्स आयुष्यभरासाठी नसतात. शुभेच्छा तुम्हाला !!

कुठे राहतो? काय येते? काय काम करत होता? काय काय कामे केली आहेत? शेवटची नोकरी का सुटली. एव्हढी माहिती द्या. काम मिळवून देवू. प्रश्न मिटला.

आत्ता मी फोन करुन बोलले. ते ठीक आहेत. कामासाठी प्रयत्न चालू आहेत. मी त्यांना CV पाठवायला सांगीतला आहे मला व इतरांना. तुम्ही पण फोन करा.

सर्व मायबोलीकरांचे मन:पूर्वक धन्यवाद आणि विनम्र आभार..
विशेषत: मिन्वा यांचे, ज्यांनी प्रत्यक्ष फोनद्वारे माझी विचारपूस केली व मला जीवनाकडे आशावादी दृष्टीकोनातून पाहण्याची वाट दाखवली.
आपणा सर्वांचे पाठबळ मिळाल्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे.
या जगात देव नक्कीच आहे आणि तो तुमच्या रूपाने मला दिसला याबद्दल मी पुनश्च तुम्हा सर्वांचे आभार मानतो.
धन्यवाद!!!

आजुबाजूला डोळे उघडून पाहिलंत, तर तुमच्याहीपेक्षा अत्यंत हलाखीची परिस्थीती असलेले लोक हाल खात जगतातच आहेत. सर्वांत महत्वाची गोष्ट, तुमच्या बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या मुलीला अगदी सगळं नाही देता आलं तरी, तुम्ही तिला जे आहे त्यातून कसं जगायचं, ते शिकवू शकता. आणि प्रयत्न करत राहणं आपल्या हातात असतं. कुठलेच आणि कुणाचेच आयुष्यातले सारे दिवस एकसारखे राहत नाहीत. पलटतातच. आई वडीलांनी केलेल्या कष्टांचं चीज मुलं करून दाखवतात. तेव्हा तुमच्या मुलीला मोठ करण्यासाठी जे जे म्हणून कष्ट होतील ते उचला आणि तिला याची जाणिव राहिल असं घरचं वातावरण संस्कारीत ठेवा. सगळं चांगलं होईल.

मी तर म्हणेल ,बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष न करता तिचेही मनोबल वाढ्वायलला हवे आणि अशा विचारांपासुन पराव्रुत्त करणे फार महत्वाचे आहे.

फपतुमच्या पेक्षाही अफाट दु:ख या जगात आहेत.
नीट बघा.तुमच्या कडे काय नाही या पेक्षा काय आहे ते बघा.तुम्ही अजुन तरुण आहात.सर्वच दिवस सारखे नसतात.हे ही दिवस जातील.हा तुमचा परिक्षेचा काळ आहे.आमच्या सर्व मायबोलीकरांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत.
माझे वय 39 आहे.अजुन माझे लग्न झाले नाही.मी काय करायला पाहीजे?

<< माझे वय 39 आहे.अजुन माझे लग्न झाले नाही.मी काय करायला पाहीजे? >>

लग्न.

म्हणजे लग्न का होत नाही ह्या कारणांचा अभ्यास करुन त्यावर उपाय योजना केलीत तरी चालेल. पण महाराज लोकांच्यात लग्न करायची पद्धत असते काय ? तूम्ही आध्यात्मिक महाराज असाल हे गृहित.

मूळ समस्येवर या लोकहो.

<<<तुमच्या मिसेसनी तुम्हाला आत्महत्येविषयी सांगण्या ऐवजी खंबीरपणे तुम्हाला साथ द्यायला हवी.>>> आशु२९ - तुम्हाला फुकटचे सल्ले द्यायला काय होते. तुम्ही स्वता ला ह्या परीस्थितीमधे imagine करा आणि मग सल्ले द्या.

उमेश च्या पत्नी नि पण काही थोड्या दिवसात धीर सोडला नसेल, बरिच वर्ष वाट बघुन काहीच होत नसेल तर असे विचर येणारच.

बोलणे सोप्पे असते.