पॉट पेंटिंग.

Submitted by सुलेखा on 1 June, 2012 - 03:52

साहित्य- सुरई च्या आकाराचा उभा मातीचा /क्ले चा फ्लॉवरर्पॉट,ऑईल पेंट्स-सेरेलिअन ब्ल्यु,पिवळा,हिरवा,ब्राऊन.ब्रश,पेन्सिल,सशाचे चित्र, फेवि ग्लु.
पॉट वर सशाचे चित्र ठेवुन त्याच्या आजुबाजुला गवत आणि झाडे ,पाने पेंसिलिने काढुन घेतली. ग्लु लावुन सशाचे चित्र चिकटवले.त्याच्या आजुबाजुचे गवत ,पाने व झाडे पिवळा-हिरवा-ब्राऊन कलरच्या मिक्सिंग ने रंगवली.पॉट चा उरलेला भाग ब्ल्यु कलरने रंगवला ,दोन दिवस सावलीत पॉट वाळत ठेवला.
या कल्पने प्रमाणे मातीचा तवा,इतर आकारीतील पॉट,प्लायवूड चा चौकोन,थर्मोकोलची शीट,ड्राईंग शीट यावर परी,झोपडी,शेतकरी,प्राणी-पक्षी,बैलगाडी असे एखादे चित्र घेवुन त्यावर आधारीत देखावा[जंगल,झाडे,पायवाट,डोंगर,नदी,झरा]करता येईल्,पोस्टर कलर वापरुन त्यावर वार्निश चा कोट केला कि डिझाईन टिकाऊ होईल. pot 1.JPG

हा संपुर्ण पॉट-pot 2.JPG

गुलमोहर: 

छान Happy

ए सही दिसतंय गं !! ससा आणि त्याचं बॅक ग्राऊंड फार सुरेख मिक्स केलं आहेस.... !!