बकरी चोर

Submitted by ज्ञानेश्वर धानोरकर on 17 May, 2012 - 08:21

नागपुर भंडारा रोडपासून थोड्या आडवळनाच्या मार्गावर आयुध निर्माण वसाहत आहे. आजूबाजूला डोंगराळ प्रदेश आहे. या भागात वन्य प्राण्यांचे अस्तित्व असते. कधी कधी पाणी वगैरे मिळाले नाही तर ते मनुष्यवस्तीचा सहारा घेतात. मानव वस्तीत वन्यप्राण्याने अचानक भटकणे, भीतीदायक, धोकादायक, कधी कधी गमतीदार असते. अशीच एक घटना जवाहरनगर आयुध निर्माण वसाहतीच्या परिसरात घडली. रात्री साडेदहा-अकरा वाजण्याच्या सुमारास एक वाघ वसाहतीच्या काही भागात फिरून निघुन गेला. कधी कधी वाघ डोगरपायथ्याकडे फिरायला जाणार्‍यांच्या नजरेस पडायचा. लोकांना भीती वाटायची. उद्या चालुन वाघाने आपल्यावर हल्ला केला तर, असा वाईट विचारही त्यांच्या मनात यायचा.

अशा भरकटलेल्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आयुध निर्माण विभागाची असते. अशा प्राण्यांना पकडुन त्यांना ताडोबा, नागझिरा अशा जंगलात सोडून देण्यात येते. वाघाला पकडायचे म्हणून त्या परीसरात एके ठिकाणी लोखंडी पिंजरा ठेवण्यात आला. पिंजर्‍याला झाडांच्या फांद्यांनी झाकून दिले. वाघ लवकरच पकडला जावा म्हनून पिंजर्‍यामधे एक बकरी बांधून ठेवण्यात आली. रस्त्याने जाणारे लोक पिंजर्‍याकडे नवलाने पाहत. व्यक्ती तितक्या प्रकृती हा निसर्गाचा नियम आहे, त्यानुसार दोन टवाळखोर मुलांच्या मनात एक कल्पना आली. पिंजर्‍यातील बकरी चोरून न्यायची. केव्हा रात्र होते आणि बकरी चोरुन नेतो याची त्यांना घाई झाली. अंधारात दोघे पिंजर्‍याजवळ आले. बकरी सोडायला आतमधे गेले. लगेच पिंजरा बंद झाला. बकरी चोरनारी मुले पिंजर्‍यात अडकली. त्यांना पिंजर्‍यातून बाहेर पडणे शक्य नव्हते.

सकाळी फ़िरायला जाणारे लोक रस्त्याने जात होते. काहींनी पिंजर्‍याजवळ जाऊन पाहिले तर काय नवल! आतमध्ये दोन मुले आणि एक बकरी... लोकांकडे पाहिल्यानंतर मुलांना हसावं की रडावं काहिच समजेना-बकरी तर चोरुन नेऊ शकले उलट बकरी चोर म्हणुन सर्व हिणवू लागले. बातमी साहेबांपर्यंत पोहचली. ज्या साहेबांकडे पिंजर्‍याची चावी होती त्यांना बोलावण्यात आले. मुलांच्या मनात विचार आला "करु गेलो काय अन झाले उल्टे पाय" . अधिकार्‍यांनी मुलांना समजावून सांगितले, "चोरीचा विचार मनात आणू नये. चोरीचा प्रयत्न करु नये."

गुलमोहर: