खेडे गावाने आपले गावपण ­सोडू नये­?

Submitted by सम्राट on 15 May, 2012 - 01:17

वर्ष संपले, सुट्ट्या पडल्या कि आपल्या मनात वेध लागतात ते गावी जाऊन १ महिना मस्त सुट्टी घालवावी, मस्त मजा करावी.
पण प्रत्येक शहरात राहणाऱ्या माणसाला नेहमीच वाटते कि खेडे गावाने आपले गावपण सोडू नये , खेडे गावाने सुधृन शहरा सारखे होऊ नये , ती नदी तशीच रहावी, ती पाण्याची डनकिन तशीच असावी, विहिरीवारचा रहाट, कुडाची घरे ........

हीच असते मानसिकता प्रत्येक शहरात राहणाऱ्या माणसाची....का असे ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कारण खेड्यातलेही लोक सुधारले तर शेतात राबून अन्न पिकवणे, स्वतः शेणात राहून सकाळी सहाला दुधाचा टँकर शहराकडे पाठवणे , हे उद्योग मग कोण करणार? हे शहरातल्या लबाड माणसाना ठाऊक असते, म्हणून त्याना वाटत असते की खेडे कायम तसेच रहावे.

खेडे गावाने गावपण जपणे न जपणे हे गावातील लोकांच्या सोयीने ठरेल. मात्र सामाजिक सुधारणांच्या बाबतीत बरीचशी खेडी आजही मध्ययुगातच आहेत असं वाटतं.. त्याबाबत बदल होईल तो सुदिन.

अशी कोणाची मानसिकता नसते.
खेडेविकासाचा पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही
खेड्यात मोठे धरण असुनही त्याचे पाणी शहराकडे जाते, खेड्याला नाही मिळत !

खेड्यात मोठे धरण असुनही त्याचे पाणी शहराकडे जाते, खेड्याला नाही मिळत !

पाणीच काय अन्न वस्त्र निवारा ( म्हणजे लाकूड, विटा, सिमेंट, लोखंड) सगळेच शहरालाच जाते.

शहर भी कभी गाँव था |
म्हणुन शहराला वाटते की आपल्यासारखा बकालपणा या गावांना येउ नये. Happy

आणि तुम्हाला कुठे शहरं दिसली, ती तर मोठ्ठी बकाल खेडीच !

इतकी मोठी शहर,पैसा, गाड्या, बंगले त्यातल्या इतक्या सोयी, मनोरंजनाच्या गोष्टी असुनही इथली माणसं सुट्टीत पुन्हा शहराबाहेर , दुर गावाकडे जाणं पसंद करतात यावरुन गावाकडे काहीतरी आहे जे शहरात मिळत नाही

खेडेगाव ???? ईईईईईईईईई!!!! एकदाच त्या मराठवाड्यातील एका खेडेगावात आणी खानदेशातील एका गावात असे ६ महिने जेमतेम काढले आणी जी काही धुम ठोकली ती परत कधी मागे वळून न पाहाण्याकरताच. अहो ते म्हणायला ठीकै, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू.

आमचेही कौलारु घरच होते, पण त्याकौलातुन पावसाळ्यात पावसाचा आणी त्या आधी उन्हाळ्यात उंदरे, साप, पाली, झुरळे इ इ चा वर्शाव व्हायचा.

दूरवर पाहिले की उंच डोंगर, झाडे पण पाऊस नावाला नाही, पावसाळ्यात थोड्डास्सा पडला तेव्हढाच.

प्यायला काय वापरायला पण पाणी मिळत नाही, लोडशेडिंगचे तर काही विच्चार्रु नका. त्यातुन डासांचे गायन, नृत्य रोज अनूभवत होतो.:अरेरे:

पाणी नसल्याने आंघोळ नाही, खाणे नाही, आन काहीच नाही. आणी लाईट नसल्याने मनोरंजन नाही, वारा नाही, पंखा नाही.

आणी वर म्हणताय, खेडेगावाने खेडेगावासारखे रहावे. हूं

शहरी माणसे गावात गावपण अनुभवायला जात असतात. गावातील माणसा॑तील आपुलकी अनुभवायला
आपल्याला मजा वाटते; पण त्या॑चे खडतर जिवन आपल्याला दिसत नाही. त्या॑ना शहरातील नातेवाईका॑ -
बद्द्ल कुतूहल असते; आदर असतो पण तोच खेडूत शहरात आला कि आपल्यातीलच काहिजण त्याला
गाव॑ढळ म्हणायला मागेपुढे पाहत नाही, हा असा खेडूत जर आधुनिक जगाच्या प्रवाहात आला तर आपला
मोठेपणा मिरवायच॑ स्थान गमावल॑ जाईल म्हणून खेडयाने आपले गावपण सोडू नये असे शहरी माणसाला
वाटते.

अहो तोच तर गोंधळ आहे ना. आजकाल एक गंमत झालीय. कुठेतरी फार्महाऊस घ्यायचे , मज्जा म्हणून सुट्टीत तिथे रहायला जायचे. जरा गावाकडची गार, प्रदुषणमुक्त हवा अनुभवायची, बैलगाडीत वगैरे बसायचे ( पोरासोरांनाही बसवायचे ) मग परतायचे घरी शहराकडे. अशी ही रोमहर्षक कल्पना असते.

पण होतं काय की चार दिवसाचे चांदणे चांगले असले तरी वास्तव दाहक असते. खेड्यांमध्ये इतक्या आधुनीक सोयी नसतात, ज्याची ट्रिपला जातांना कल्पना केली जाते. खेड्यातला शेतकरी बिचारा दिवसंरात्र काबाडकष्ट करुन जगतो. आणी आमचे साहेब मग आयपील बापपीएल करुन कमावतात. गावाकडे जायला डांबरी रस्ते नसतात, वीज नसते, वीजेचे खांब देखाव्याला असतात, पाण्याचे वांदे, लोडशेडिंग असते काही ठिकाणी, तर त्यामुळे शेतीला पाणी देता येत नाही, शेत जळते ( शेतकरी पण जळतो )

वास्तव भयानक असते. जमेल खेडुताला मदत करणे ?
तिकडे तुमची मुंबई फुगत चाललीय बेडकीसारखी, कोण आवरणार तिला ? गावाकडे चला ही नुसती हाकोटीच ठरतेय.

शहरातील लोकानां कांही वेळ शहरी गोंगाटापासून दूर राहिलं तर बरं वाटतं आणि खेड्यातील लोकानां , विशेषतः तरुणाईला, जीवनाच्या जोषपूर्ण मुख्य प्रवाहापासून आपण दूर फेंकले गेल्यासारखं सतत वाटत रहातं. आतां खेडोपाडीं उपलब्ध झालेल्या टीव्हीसारख्या माध्यमांमुळें तर खेड्यांत ही भावना अधीकच तीव्र होतेय. शहरी लोकानां कायमचं खेड्यांत रहायची किंवा खेड्यातल्याना कायमचं शहरात राहायची पाळी आली कीं बव्हंशीं दोघांचाही भ्रमनिरास होतोच !

आमची नाही ही मानसिकता. वयाची ३० वर्षे होईपर्यंत शहरात राहून आता मस्त गावात रहातोय . उन्हाळा, दुष्काळ गरिबी सारं अनुभवतोय. मुलाच्या शिक्षणाचं नुकसान होईल कदाचित.
खेडी तशीच रहावीत असं लोकाना वाटत कारण त्याना आपला नॉस्टाल्जिया सांभाळयचा असतो . भारताबाहेर गेलेले भारत आपण देश सोडताना होता तसाच रहावा म्हणतात.
केव्हातरी आमच्या शेतातल्या घराचा फोटो टाकेन. सोलार सिस्टीम, भाजीचा मळा, दररोज ताजी भाजी आणि दूध असल्याने फ्रिजची आवश्यकता नाही. (तसंही सोलरची पॉवर फ्रिजला चालवू शकत नाहीये सध्या. )
खेडि जरूर बदलावीत पण त्यांची बकाल शहरे होऊ नयेत. आणि सगळ्यात जास्त बदलण्याची गरज आहे खेड्यातल्या लोकांची मानसिकता.

साती खूपच नशीबवान आहात. पण जिथे कायम दुष्काळ आहे, अशा ठिकाणी प्यायलाच सोडा, वापरायला आणी शेतीलाही पाणी नसते हो. पुणे, मुंबई, पुणे ते कोल्हापूर हा पट्टा, नंतर कोकणात. अशा ठिकाणी निसर्ग तसा प्रसन्न आहे, पाणी मुबलक आहे, पाऊसही पडतो. त्यामुळे निसर्गसौंदर्य अबाधीत रहाते.

शहरीकरणामुळे आणी अफाट लोकसंख्येमुळे जंगल आणी झाडे तोडीमुळे भारताची सुफल, सजल, समृद्ध भारत ही प्रतिमा संपलीय. रेनफॉरेस्ट हे नावालाच राहिले ( आसाम, मेघालय सोडा )

माणसाची हाव जर संपली ना तर गाव हे खरोखरच स्वप्नातले राहू शकेल.

बाकी सोलार सिष्टीम विषयी. खरच असेच उत्तम निर्णय घेऊन मुलालाही तुमच्यासारखेच डोळस बनवा. तुम्हाला अनेक शुभेच्छा. :स्मितः

मनुष्याला जे मिळत नाही त्याचे त्याला आकर्षण असते .खेड्यातले जीवन शहरी माणसाला दुरापास्त असते म्हणुन त्याला ते आकर्षक वाटते.

केव्हातरी आमच्या शेतातल्या घराचा फोटो टाकेन. सोलार सिस्टीम, भाजीचा मळा, दररोज ताजी भाजी आणि दूध असल्याने फ्रिजची आवश्यकता नाही. (तसंही सोलरची पॉवर फ्रिजला चालवू शकत नाहीये सध्या. )
खेडि जरूर बदलावीत पण त्यांची बकाल शहरे होऊ नयेत. आणि सगळ्यात जास्त बदलण्याची गरज आहे खेड्यातल्या लोकांची मानसिकता.

अनुमोदन !

मला तस फारस वाटत नाही कि मुलांच्या शिक्षणाच खुप नुकसान होईल खेड्यात, कारण अस्सल कणखरपणा,निस्वार्थ मैत्री,स्वाभिमानी आयूष्य जगायला मुलं खेड्यात जास्त चांगल शिकतील हे नक्की. बाकी टेक्नीकल नॉलेज तर आता नेट मुळे कुठेही अगदी वाडी-वस्तीवर देखील उपलब्ध होऊ शकतं.

साति अनुमोदन. माझे आई वडिल हि तुमच्या सारखेच २४ वर्षे शहरत राहुन अता गावात रहतात भाऊ शेति करतोय अगदि अवडीने... गावात बेसिक प्रोब्लेम्स तर आहेत पण ते इथे हि आहेत. स्वछ हवा, पाणि आनि मनशान्ति, आरोग्य. भावाचा २ वर्षे वयाच मुलगा आनि इथले (शहरातले) त्यच्याच वयाचि मुल बघितलि कि फरक जानवतो. त्याच्यातलि स्ट्रेन्ग्थ, चपळ्पना अनि एतर बरच वेगळेपण दिसुन येत.

गाव उपभोगायला गेलं तर निराशा येऊन सगळ्या गैरसोयींची कटकट वाटणं स्वाभाविक आहे. आपलं ज्ञान, बुद्धी, वेळ, कष्ट आणि पैसा यापैकी जमेल तितक्या गोष्टी पणाला लावून आहे त्यात सुधारणेचे बदल करायची दुर्दम्य इच्छा असेल तर मग त्याच गोष्टी कटकटी न वाटता उत्साह देणारी आव्हानं वाटू शकतात. मला वाटतं कधीकाळी गावाकडून शहरात येऊन स्थायिक झालेल्या प्रत्येकाला कधीतरी मागे जाऊन ही आव्हानं अंगावर घेण्याची सुप्त मनीषा असते. काही तसा प्रयत्नहि करतात पण बरेचदा त्यात हात पोळतात कारण ते बदल करण्याची घाई झालेली असते. काही काळ तिथे आहे त्या परिस्थितीत राहून तिथली माणसं आणि समीकरणं अंगात मुरवावी लागतात आणि मगच नक्की काय आणि कसे बदल केले जाऊ शकतात ते उमजायला लागतं. त्यानंतरच तिथले चार मदतीचे हात मनापासून पुढे येतात. मग शहराची आठवणहि येत नाही.