म्युझिक सिस्टिम कुठली घ्यावी?

Submitted by योकु on 14 May, 2012 - 04:20

म्युझिक सिस्टिम कुठली घ्यावी? कृपया सुचवा. २.१ सिस्टिम चालेल. टिवी ला कनेक्ट होणारी. मी बोस कंपनीची पाहीलिय पण ती माझ्या बजेट बाहेर वाटतेय. बोस स्टोर मधे प्राईस आहे ४२०००/- !!!
कोणी वापरलीय का? मी असं पाहीलय की यूएस मधे स्वस्त आहेत. हे खर आहे का? बोस स्टोर शिवाय मुंबईत कुठे मिळू शकेल?
मला त्या डिवाईस कडून अतिशय उत्तम दर्जाच्या आवाजाची अपेक्शा आहे. जास्त पीएमपीओ, वॅटस... धाड धूडुम आवाज वगरे नको.

In short, the system must give THE BEST sound with the minimum audible volume!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

युट्युब वर मी अन बॉक्सिंगचे काही व्हिडीओ पाहिले त्यावरून या प्लेअर मध्ये एक प्रॉब्लेम दिसतोय.

मी जर एक आर्टिस्ट सिलेक्ट केला तर तो त्याचीच गाणी रँडमली प्ले करतो. यात टोटल रँडम सिलेक्शन चा ऑप्शन दिसत नाही. म्हणजे मी रफी ऐकत असलो तर सगळी गाणी रफीचीच लागणार.
आमच्याकडे तो मुड्स वाला ऑप्शन शून्य कामाचा आहे. कोणीही वापरणार नाही बहुतेक.

कार प्लेअर मध्ये रँडम सिलेक्शन फ्रॉम फोल्डर आणि रँडम सिलेक्शन फ्रॉम Usb असे दोन पर्याय असतात. यात एकच आहे.

म्हणजे एक तर बिनाका गीतमाला ऐकायची किंवा मग एक कोणतातरी गायक/गायिका निवडून ऐकायची...
बरोबर ?

ज्यांनी वापरला आहे ते सांगू शकतील का ?

बरोबर आहे.
मूड्सवाला ऑप्शन मी पण नाही वापरला. त्यात वेगवेगळे कलाकार येतील.
एक मिक्स्ड आर्टिस्ट्स पण आहे.

वर कोणाला तरी हेडफोन हवा होता ना!

हे amazon वर बघा

ACID EYE ™ KB-2600 Over the Ear Foldable Wireless Bluetooth Headphone with Volume Limiter, Built-in Micro Phone, Micro SD card Music Player, FM Stereo Radio, Audio Input & Output, Blue

चैला,
ती प्रेयसीच्या निधनाने अत्यंत रडवणारी अन मग तो म्हातारा शेजारी रेडीओ सदृश यंत्र घेऊन झोपतो असे दाखवणारी संतापजनक जाहिरात मयेकरांच्या कारवाँची आहे हे वाचून/जाणून चिडचिड झाली Sad

मला चांगला सराउंड साउंड हवा आहे. साउंड सिस्टीम चा ९९% उपयोग टीव्हीला लावून होणार आहे. खोली साधारण १२ बाय २५ फूट इतकी आहे. वायर्स शक्यतो नकोत किंवा लागल्या तरी टीव्हीला लागून जे भाग असतील त्यांच्यासाठी लागल्या तर चालेल पण टीव्ही पासून लांब जे स्पीकर्स असतील ते तरी वायरलेस पाहिजेत. तर मी खालील कॉन्फिगरेशन चा विचार करतो आहे.
१) बोस साउंड टच ३०० साउंड बार + २) बोस वर्च्युअली इनव्हिजिबल ३०० वायरलेस सराउंड स्पीकर्स (२ नग ) + ३) बोस Acoustimass ३०० वायरलेस बास मॉड्यूल
साउंड बार हा टीव्ही ला HDMI ने जोडावा लागेल. तो टीव्हीला लागूनच असेल म्हणून वायर चालतील. दोन सराउंड स्पीकर्स आणि बास मॉड्यूल wirelessly जोडले जातील. तर हे ठीक वाटत आहे.
साउंड बार आणि सराउंड स्पीकर्स (जे पाठीमागच्या भिंतीवर लावले जातील) हे तर आवश्यक आहेतच. पण बास मॉड्युल ची किंमत साउंड बार इतकीच आहे. तर हा बास मॉड्यूल इतका आवश्यक असतो का? त्याने आवाजात किती आणि कसा फरक पडतो?
संपुर्ण सिस्टीम साठी इतर काही चांगले पर्याय आहेत का? (टीव्ही पासून लांबचे स्पीकर्स तरी वायरलेस असलेच पाहिजेत अशी माझी गरज आहे). वायरलेस लिंक मुळे आवाजाचा दर्जा वायर्ड लिंक पेक्षा कमी होतो का?

अजबराव, जर बोस / इक्विवॅलंट सिस्टिम्स कंपेअर केल्या तर बास मॉड्यूल (बोस च्या भाषेत - अकुस्टीमास हाईड-अवे स्पिकर/मॉड्यूल) असल्यानी जाणवण्याइतपत फरक नक्की पडतो.
शक्यतो अशी सिस्टिम पाहा जी संपूर्णपणे टिव्हीला कनेक्ट होते (मोस्टली सगळ्या बोस होतात). त्यानंतर कुठलाही सोर्स आपण मोस्टली टिवीला कनेक्ट करतो सो आऊटपूट साउंड हा कनेक्टेड सिस्टिम मधूनच होईल.
वायरलेस वर माझाही फारसा भरवसा नाहीय (आऊटपूट साऊंड क्वालिटीवर फरक पडत नसला तरीही). वायरिंग उत्तमरित्या कन्सिल केलं तर हा प्रॉब्लेम राहाणार नाही
तुम्ही वर जे कॉन्फिग दिलंय ते १.७L पर्यंत आहे. यामध्ये एकदा बोस स्टोअर्स मध्ये विचारून लाईफस्टाईल १२०/१३५ किंवा साउंडटच १३० किंवा सिनेमेट १ एस आर मिळाली तर तुमचा इश्यू सॉल्व्ह होऊ शकेल.
यांमध्ये मध्ये एक साऊंड बार + अकुस्टीमास हाईड-अवे स्पिकर/मॉड्यूल + एक कंट्रोल मॉड्यूल + युनिव्हर्सल रिमोट आहे. तुलनेनी या स्वस्तही आहेत. यात तुम्हाला हवे असतील तर बोस वर्च्युअली इनव्हिजिबल ३०० वायरलेस सराउंड स्पीकर्स (२ नग ) अ‍ॅड करता येतील.

माहितीबद्दल धन्यवाद योकु. तुम्ही चांगलं सांगितलंत. आणखी थोडी माहिती मिळवून आणि ओळखीतल्या जाणकारांशी सल्लामसलत करून निकाल लावीन म्हणतो.

सारेगामा कारवाँ मध्ये मला जाणवलेली मोठी त्रुटी म्हणजे गाणं पॉझ करता येत नाही. अर्थात मी एकांकडे 10-15 मिनिटे हाताळून पाहीला फक्त. जर कोणाला पॉझ कसे करायचे हे माहीत असेल तर नक्की सांगा!

कारवाँला पॉझची सोय आहे, रिमोटवर. काल चुकून पॉझ झालं तेव्हा कळलं. मी रिमोट क्वचितच वापरतोय.

सारेगम कारवां गिफ्ट देण्यासाठी घ्यायचं आहे. मराठी कारवां पण दिसतंय अॅमेझॉनवर. कुणी घेतलं आहे का इथे? त्यात गीतरामायण आहे असं दिसतंय. अजून कुठली कुठली गाणी आहेत ते कुणी सांगू शकेल का? भावगीतं/ चित्रपटगीतं?
मराठी कारवांमधे हिंदी गाणीही आहेतच.

मी घेतलंय मराठीपण गीतरामायणातली सगळी गाणी सुधीर फडकेंच्या आवाजात आहेत आणि मला तो आवाज थकलेला वाटला.
यातलं हिंदी गाण्याचं सिलेक्शन जास्त आवडलं. मराठी गाण्यांचं तितकंसं आवडलं नाही. पण अर्थात ती माझी पसंती आहे.
गाण्यांची यादी
इथे इंग्रजीतल्या अल्फाबेट्सप्रमाणे दिलेली असली तरी गाणी रँडमली वाजतात आणि तुम्हांला हवं असलेलं गाणं त्या यादीत असूनही वाजेलच याची खात्री नाही. मध्येच गाणी रिपीट होतात..

गाणी रॅंडमली (शफल) वाजतात हा डिलब्रेकर आहे. हवं ते गाणं हव्या त्या वेळेला वाजवता येउ नये यापेक्शा दुसरं मोठं कुठलंहि फ्रस्ट्रेशन नाहि... Proud

कारवाँ मिनी एक पर्सनली मला आवडलेला प्रकार. मोठ्या पेक्षा बराच स्वस्तही. दोघांतल्या किमतीचा फरक जवळजवळ ४०००/-
मिनी कारवाँ मध्ये एएम पण येतं जे मोठ्या कारवाँ मध्ये नाही. बाकी कनेक्टिविटी दोन्हींत सेम आहे.

गाणी रॅंडमली (शफल) वाजतात हा डिलब्रेकर आहे>> रेडिओवर गाणी ऐकल्यासारखं वाटावं म्हणून आहे ते असं वाटतंय मला.
@ भरत, यादीसाठी धन्यवाद! मराठी कारवां घ्यायचं नक्की केलं आहे.

<रेडिओवर गाणी ऐकल्यासारखं वाटावं म्हणून आहे ते असं वाटतंय मला>
हो, पण आता मला जिवलगा ऐकायचंय म्हणून मी आशाची गाणी लावली तर रे सोडून सगळी गाणी वाजतात, काही दुसर्‍यांदा वाजतात.हे मला टॉप ३०० त कधीतरी ऐकू आलं.
माझ्याकडच्या सीडीज आणि कॅसेट्स इतक्यांदा ऐकल्यात की त्यांतल्या गाण्यांचा क्रम डोक्यात असतो. पुढलं गाणं कोणतं ते आपसूक आठवतं.

मला गाण्यांचा चॉइस का नाही आवडला ते लिहितो. शान्ताबाईंची कधी न ऐकलेली टुकार वाटणारी गाणी आहेत त्यात.
कलाकारांत शांताराम नांदगावकर, सुरेश वाडकर आहेत. हृदयनाथ मंगेशकरांच्या (संगीतकार)नावावर अजित कडकडेंनी गाइलेल्या आरत्या आहेत. श्रीनिवास खळे, यशवंत देव, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे,स सुलोचना चव्हाण (वेगळे) नाहीत.
राधा मंगेशकरची गाणी आहेत पण ऋतू हिरवा नाही (हा अल्बम दुसर्‍या कंपनीचा असेल)
गीतरामायणातला सुधीर फडकेंचा आवाज आजारी वाटतो.
त्यातल्या त्यात नाट्यसंगीत आवडलं.
सारेगमच्या साइटवर मेक युअर ओन म्युझिक कार्ड अशी एक सोय आहे, ती आजमावून पाहायचीय. कारवॉंत नसलेल्या पण मला हव्याच असलेल्या गाण्यांसाठी)
हिंदी सारेगम मध्ये गझलांत मेहंदी हसन नाही. गझलांच्या म्युझिक कार्डमध्ये अर्धा जगजितने व्यापलाय. इथेही मेहंदी हसन नाही
शिवाय दोन्ही मराठी हिंदीची रेट्रोची व्याप्ती नव्वदीच्याही पुढे गेलीय. दिलवाले दुल्हनिया, हम आपके है कौन आणि आशाचं मराठीतलं बम चिकी बम असलं काहीतरी गाणं आहे Uhoh

हं, आलं लक्षात भरत. मागे एकदा देव आनंद की रफीची २०० गाणी असलेली म्युझिक फाईल व्हॉट्सॲप वर आली होती. पण त्यात काही काही खूप प्रसिद्ध आणि चांगली अशी गाणी नव्हतीच आणि कधी न ऐकलेली बरीच गाणी होती. आता आपण न ऐकलेली आणि तरीही चांगली अशी गाणी असतात हे मान्य, पण प्रसिद्ध गाणी काय उगाच प्रसिद्ध झालेली नसतात ना! Happy देव आनंदची २०० गाणी निवडा नाही तर रफीची, त्यात ' अभी ना जाओ छोडकर' नसेल, तर काय अर्थ त्या कलेक्शनला!
आता मला जिवलगा ऐकायचंय म्हणून मी आशाची गाणी लावली तर रे सोडून सगळी गाणी वाजतात>> मागे मी वाचलं की नवीन आवृत्तीत लोकाग्रहास्तव त्यांनी ही ( हवं ते गाणं लावण्याची) सोय केली आहे.

Saregama Carvaan is now out with its Premium variant. All the new features of Carvaan Premium are based on consumer feedback collected over the last few months. The most notable addition is a companion app (iOS and Android) that allows users to choose the song they want to hear or create their own playlist on Carvaan

Saregama Carvaan Premium Portable Digital Music Player (Royal Blue) https://www.amazon.in/dp/B07H86KR34/ref=cm_sw_r_cp_apa_i_G2naCbSTZBF9E

माझा विचार चाललाय वरील सिस्टीम घ्यायचा. कुणी घेतली असेल तर फीडबॅक द्यावा.

माझ्याकडे ४.१ आहे.. मस्त चालते... intex चा आहे बहुतेक... bluetooth जोडून गाणी लावता येतात, रेडीओ आहे.. sound quality एक नम्बर

गाना / सावन / गुगल प्ले म्युझिक / अ‍ॅपल म्युझिक चे पेड सबस्क्रिप्शन्स वापरत नाही का कुणी (अ‍ॅमेझॉन म्युझिक अनलिमिटेड नाही अजून भारतात; प्राईम म्युझिक वर सगळं नाहीय) ? माझ्यामते हा सगळ्यात सोपा उपाय आहे. साधा ब्लूटूथ स्पिकर असेल तर काम भागतं. हवं ते गाणं, प्लेलिस्ट तयार करणं; शेअर्ड लिस्ट्स इ. बरेच पर्याय असतात आणि हो एकही अ‍ॅड नसते. ७/८ के चं कारवाँ पेक्षा हे फारच सोपं आणि सगळं फोनवरच राहातं. १२०/- प्रतिमहिना काही फार नाही (१२००/- प्रतीवर्ष); यातही काही आवडलं नाही तर हवं तेव्हा बंद करता येतं. एकही गाणं फोन मध्ये स्टोर असं करायला लागत नाही. ४जी / वायफाय वर चालतं (अर्थात ऑन द गो हवं असेल तर डालो करता येतातच).

गाना वापरते मी.. पेड नाही घेतला अजून... शिवाय रेडिओ असतोच, सावन असतं... लॅपटॉप मधलं कधीकाळी प्रेमाने जमलेलं collection असतं... तेवढं पुरतं ऐकायला Happy ब्लुएटूथ असल्यामुळे काही पण जोडून ऐकत येतं speaker ला

मी गानाचे तीन महिन्यांच्या सबस्क्रिप्शन्स चुकून घेतले.
मी नेटवर MP3 download शोधत होतो लॅपटॉपवर. त्यात गानाची साईट आली. ३ महिन्याला १८०₹ आणि त्यात हवे तेवढे MP3 download करा. मी मेम्बरशीप घेतली. आणि मग डाउनलोड करायला गेलो, तर मेसेज आला ऍप डाउनलोड करा.म्हटलं काय भानगड आहे ही! फोनवर MP3 download करा, मग तिथून लॅपटॉपवर घ्या, उगा कटकट.
ऍप डाउनलोड केला, काही गाणी डाउनलोड केली, मग आता लॅपटॉपवर MP3 कॉपी करू या म्हणून फाईल मॅनेजर उघडून बघितले तेव्हा सगळा प्रकार लक्षात आला. MP3 डाउनलोड होत नाही, ऍपच्या फॉरमॅट मध्येच डाउनलोड होते आणि ऍप मध्येच ऐकावे लागेल. दोन आठवड्या पूर्वी सांगलीला गेलो तेव्हा प्रवासात डाउनलोड केलेली गाणी ऐकत गेलो.

प्राईम म्युझिक ची ऍड नंतर बघितली, प्राईमची मेम्बरशीप आहे, त्यात फ्री डाउनलोड आहे. ते पण वापरतो आता.

अरे हो, जर तुमच्याकडे ऑलरेडी म्युझिक सिस्टीम असेल तर सरळ एक ब्लूटूथ अ‍ॅडॉप्टर घेणे हा सगळ्यात चांगला पर्याय. चांगल्या कंपनीचा अ‍ॅडाप्टर मात्र १००० - १२००/- ला पडेल आणि पूर्ण वायरफ्री गाणे चालू ठेवता येतील.

Pages