Mutual Fund / SIP बंद कसे करायचे?

Submitted by mimarathi on 9 May, 2012 - 22:32

२/३ वर्षापूर्वी आम्ही काही SIP - Mutual Funds मध्ये गुंतवणूक केली होती. ते आता बंद करायचे आहेत. ज्या एजंट ने हे काम केले त्याला बर्याचदा सांगून झाले, पण तो आता काहीच करत नाही. फॉर्म्स मागितले तरी देत नाहीये. बँकेत automatic deduction केले होते, त्यामुळे ते पैसे जाताच राहतात. शेवटी बँकेत पैसे ठेवण बंद केलाय. हे SIP बंद करण्यासाठी आम्हाला काय करता येईल? माबोलीकारांपैकी कोणी investment agent आहे का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या कडे ज्या कंपनीची Mutual Funds Units आहेत, त्या कंपनीच्या वेब site वरून redemption form download करून घ्या. आणि पूर्ण माहिती आणी आवश्यक कागद पत्रे जोडून पाठवून द्या/ किंवा प्रत्यक्ष जाऊन द्या. ही प्रक्रिया एकदम सोपी आहे.

१) http://www.camsonline.com/pdfdocuments/Stop%20or%20Cease%20SIP_SWP_STP.pdf. जर तुमच्या म्युच्युअल फंडचे रजिस्ट्रार्स CAMS नसतील तर वरचा त्यांचा लोगो उडवा.
या फॉर्मचे प्रिंट घेऊन (जर तुमच्या म्युच्युअल फंडचे रजिस्ट्रार्स CAMS नसतील तर वरचा त्यांचा लोगो उडवा) तो भरून तुमच्या म्युच्युअल फंडच्या जवळच्या शाखेत जमा करा, पोस्टाने/कुरियरने त्यांना पाठवा किंवा रजिस्ट्रारच्या शाखेत जमा करा.
म्युच्यल फंडच्या शाखांची माहिती त्यांच्यात्यांच्या वेबसाईटवर मिळेल.

२) तुमच्या प्रश्नावरून तुम्हाला फक्त SIP थांबवायचे आहे, पैसे काढून घ्यायचे नाहीत असे वाटते. त्यासाठी रिडेम्प्शन फॉर्म भरायची गरज नाही. रिडेम्प्शन फॉर्म भरून पाठवलात तर जमा झालेल्या युनिट्सचे पैसे बाजारभावाने (NAV) परत मिळतील, पण नवीन SIP चालूच राहील. तसेच गेल्या एका वर्षात खरेदी केलेल्या युनिट्सवर एक्झिट लोडही लागेल. जर तुम्ही ELSS मध्ये SIP केले असेल तर त्याला तीन वर्षांचा लॉक्-इन असतो. तोवर रिपर्चेस करता येणार नाही. मात्र SIP बंद करता येईल.

३) एक आगाऊ सल्ला: मार्केट वर येत नाही, स्कीमची NAV वाढत नाही, म्हणून SIP बंद करत असाल तर तसे करू नका. ही वेळ खरे तर SIP कायम ठेवण्याचीच आहे. मात्र तुम्हाला अन्यत्र पैसा वळवायचाय, तुम्ही निवडलेल्या म्युच्युल फंड स्कीमची कामगिरी अन्य स्कीम्सच्या तुलनेत कमकुवत आहे या कारणासाठी SIP थांबवायला हरकत नाही.