काहीच्या काही लेखन असा विभाग नसल्याने विनोदी लेखन मधे टाकत आहे.
कोण बनेल करोडपती मायबोली स्पेशल.
*********
आपल्या समोर सादर करत आहोत कोण बनेल करोडपती मायबोली स्पेशल स्पर्धा. स्पर्धेचे नियम तर आपल्याला माहीतच आहेत. परंतु यामध्ये एक खास बदल करण्यात आलेला आहे. या स्पर्धेत तुम्हाला पर्याय देण्यात येणार नाहीत कारण या ठीकाणी एकापेक्षा अधीक उत्तरे बरोबर निघण्याची शक्यता आहे. त्याचसोबत बरोबर बरोबर उत्तर आमच्याकडुन मिळेल अशी अपेक्षाही ठेउ नये कारण ते आम्हालाही ठाउक असण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर या स्पर्धेत तुम्हाला स्पर्धा सोडुन जाण्याचा म्हणजे क्वीट करण्याचा अधिकार नाही. कारण तुम्ही ते करुच शकणार नाही.
सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे दिल्यास आपणास एक करोड मिळाल्याप्रमाणे आनंद होईल त्यामुळे त्या आनंदात आम्ही पैशाचा उल्लेख करुन आपल्या आनंदात विरजण घालु इच्छीत नाही त्यामुळे रोख बक्षीसाची अपेक्षा ठेउ नये.
या ठीकाणी सुत्रसंचालक म्हणुन तुम्ही अमिताभ बच्चन आथवा शहारुख खान कोणालाही गृहीत धरु शकता.
तर चला तर तुम्ही आणि आम्ही मिळुन खेळुया कोण बनेल करोडपती मायबोली स्पेशल :
प्रश्न पहीला :
मायबोलीवर एकाच अर्थाचे किती ID आहेत ?
प्रश्न दुसरा :
एकुण किती मायबोलीकर मायबोलीवर विरंगुळा म्हणुन येत नसुन केवळ एखादी मायबोलीकरीण मैत्रीण गटवावी म्हणुन येतात ?
प्रश्न तिसरा :
मायबोलीवर नव्याने येणार्या ID साठी ठिकठिकाणी देवनागरीत कसे लिहावे अश्या सुचना असताना ते नेमके चुकीचे मराठी कसे लिहू शकतात.
प्रश्न चौथा :
एखादा नवा ID कोणत्याही चुका न करता एखादी आख्खी कथा गुलमोहोरवर कशी लिहू शकतो?
प्रश्न पाचवा :
मायबोलीवर एकंदरीत किती बाफ़वर वाद घालता येउ शकतो ?
प्रश्न सहावा :
नेमक्या IDच्या साहीत्या नंतर नेमके त्याच्यावर चिखलफ़ेक करणारे IDहे बाकी वेळेस नक्की कुठे असतात?
प्रश्न सातवा :
मायबोलीवर नवनवीन बाफ़ उघडून आत्महत्या करण्याची धमकी देणारे ID खरोखर आत्महत्या करत असावेत का ?
प्रश्न आठवा :
मायबोलीवरील एकाद्या बाफ़ वर वाद झाल्यास ते निस्तरण्यासाठी ज्या ऍडमीन ना आर्त हाक मारली जाते ते तोपर्यंत झालेला वाद पहात किंवा वाचत नसावेत काय?
प्रश्न नववा :
मायबोलीवरील मराठीत लिहा मराठीत लिहा अश्या घोषणा देणारी मंडळी म्हणजे पक्ष स्थापनापुर्वि एका राजकीय नेत्याने पुढे पाठवलेले कार्यकर्ते असावेत काय ?
आणि अंतीम प्रश्न ( म्हणुनच अशक्यकोटीतला ) :
मायबोलीवरील एकुण ID मधले किती ID डुप्लिकेट असावेत ?
विशेष सुचना : या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडल्यास आम्हालाही कळवावीत.
मस्तच
मस्तच
सर्व प्रश्नांची उत्तरे आली नाहीत तरी सुद्धा एक करोड मिळाले 
एकुण किती मायबोलीकर मायबोलीवर विरंगुळा म्हणुन येत नसुन केवळ एखादी मायबोलीकरीण मैत्रीण गाठावी म्हणुन येतात ? >>> गाठावीचा अर्थ गटवावी असा होतो का ?
(No subject)
सिंडरेला
सिंडरेला
चाफ्फ्या.... नेहमीप्रमाणे मस्तं. हे डुप्लिकेट आयडीज कोणत्या ना कोणत्या झाडावर त्या वेताळासारखे बसून असतात, बहुतेक..... ऍडमिन्स ना वाईट्-साईट स्वप्नं पडत असतिल काय रे, ह्या डुप्सची?
>> प्रश्न
>>
प्रश्न तिसरा :
मायबोलीवर नव्याने येणार्या ID साठी ठिकठिकाणी देवनागरीत कसे लिहावे अश्या सुचना असताना ते नेमके चुकीचे मराठी कसे लिहू शकतात.
प्रश्न चौथा :
एखादा नवा ID कोणत्याही चुका न करता एखादी कथा गुलमोहोरवर कशी लिहू शकतो?
>>
ए.भा.प्र. :

तुला नक्की अपेक्षित काय आहे?.... नविन आयडीने संपुर्ण चुकीचे मराठी न लिहता आपला नवखेपणा सिध्द करण्याइतक्याच चुका करत लिहावे असे का?
पण झकास लिहलयस.... वाचुन मजा आली
या सगळ्या
या सगळ्या प्रश्नांचं मूळ कॉपीराइट दुसर्याच कोणाचं तरी आहे बर्का! जवळ जवळ दहा वर्षांपूर्वी ' हितगुजवर किती मेधा' नावाचा बी बी सुरु केला होता कोणी तरी .....( बहुतेक कार्टा - यू नो यू हॅव अ मराठी गर्ल फ्रेंड नावाच्या बी बी चा ही जनक )
मस्तच प्रश्न आहेत. कार्टा वूड बी प्राउड......
घोषा नाही,
घोषा नाही, धोशा
***
Has the LHC destroyed the world yet?
(If you are not satisfied, please check out the source code.)
शोनू, तो
शोनू, तो बीबी मिल्याने सुरु केला होता.. तेव्हा ५ मेधा होत्या.. तू त्यातलीच एक ना?
तू अन् रांगणेकरांची इतक्याच मला ठाऊक आहेत..
चाफ्फा
मस्त प्रश्न आहेत सगळेच!
-----------------------------------------------

शरीर बारीक अन् मन मोठं करायला कधी जमणार????
धन्यवाद
धन्यवाद सर्वांनाच, आणि सिंड्रेला तु सुचवलेला बदल आवडला म्हणुन करुन टाकला, स्लार्टी आपल्या सुचनेवरुन घोषा शब्द बदलला आहे.

आता स्वरुप, माझी मुळीच अपेक्षा नाही की नव्या आय. डी. ने चुकत माकत लिहावे परंतु संपुर्ण कथा जेंव्हा न चुकता गुलमोहोर वर येते म्हणजे विनोदच नाही का ? असो यातल्या पाचव्या प्रश्नातला प्रकार इथे घडू नये ही अपेक्षा
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **
चाफ्या
चाफ्या मस्तच .....
उत्तरे
उत्तरे दिल्यास आपणास एक करोड मिळाल्याप्रमाणे आनंद होईल>>>>>>>
खरे पैसे मिळाल्यावरच मला खरा आनंद होईल.
पयले पैसे दे. मग सगळी उत्तरं कशी घडाघडा सांगतो, बघ मी..
चाफ्या ...
चाफ्या ... मस्त प्रश्न आहेत सगळे....
पण 'अमिताभ' आणि 'रोख बक्षीस' ह्या दोन्ही गोष्टी इथे आभासी असल्याने माझी उत्तरेही आभासीच आहेत
चाफ्या......
चाफ्या...... नेहमीसारखाच फुललास रे..........
चाफ्या
चाफ्या

सगळीकडे फटकेबाजी करत सुटालाहेस
चाफा बोलला
चाफा बोलला ...
चाफा हालला.....
चाफा प्रश्न करी....किती किती फुलला.....
मायबोलीवर
मायबोलीवर नवनवीन बाफ़ उघडून आत्महत्या करण्याची धमकी देणारे ID खरोखर आत्महत्या करत असावेत का ?
>>>>>
id कसा आत्महत्या करेल ?
निलेश
चाफ्फ्या!!
चाफ्फ्या!! लय भारी! मजा आली..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल , पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!
पकाव एकदम
पकाव एकदम पकाव
>>>>>नेमक्या
>>>>>नेमक्या IDच्या साहीत्या नंतर नेमके त्याच्यावर चिखलफ़ेक करणारे IDहे बाकी वेळेस नक्की कुठे असतात <<<<<<<<<
खदखदुन हसलो बघ
मस्त रे चाफ्फ्या
>>नेमक्या
>>नेमक्या IDच्या साहीत्या नंतर नेमके त्याच्यावर चिखलफ़ेक करणारे IDहे बाकी वेळेस नक्की कुठे असतात <<<
चाफ्या, सही रे. एक करोड आमच्यातर्फे तुलाच बक्षिस लेका
मला फक्त
मला फक्त पाचव्या प्रश्नाचे उत्तर माहित आहे. ते म्हणजे, "सर्व" बा. फ. वर वादविवाद करता येतो. अगदी दु:खद घटना या बा. फ. वर पण.
आहे काय त्यात, नेमके वरच्या माणसाने लिहीले त्याच्या विरुद्ध लिहायचे की झालाच वाद सुरु. त्यात आपण पुढे काही लिहीलेच पाहिजे असे नाही. त्यातून चार पाच पाने भरली की लिहावे 'माझे चुकले', की झाले!
तर आता एका करोडमधले किती देणार मला? डॉलरमधे दिल्यास बरे.
माझी मुळीच
माझी मुळीच अपेक्षा नाही की नव्या आय. डी. ने चुकत माकत लिहावे परंतु संपुर्ण कथा जेंव्हा न चुकता गुलमोहोर वर येते म्हणजे विनोदच नाही का ?>>>> अशाच प्रश्नाच उत्तर शोणूने हल्लीच कुठल्याश्या बीबीवर दिलय. हे नवीन आयडी मनोगत, मिसळपाव व. चे मेंबरपण असु शकतात. हल्ली बर्याचश्या साईट्वर मराठी लिहायची सोय आहे. गुलमोहरवर लिहिलेली कथा तुला दुसर्या साईटवर पण सापडेल. त्यांच्या वैयक्तीक ब्लॉगवरपण...
काढ माझे १० लाख..