जागतिक कंटाळा दिवस !

Submitted by A M I T on 4 May, 2012 - 02:53

वासूचँप यांना निरनिराळ्या गडांवर भटकंती करण्याचा शौक आहे. ते जेव्हा भटकंतीवरून परत येतात तेव्हा त्यांची दाढी हातभर वाढलेली असते. मिलींद गुणाजी म्हणे त्यांचच अनुकरण करतात, असं खाजगीत म्हटलं जातं.
रात्रीच्या वास्तव्यात त्यांनी बरेचदा 'अमानवीय' प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहीलेले आहेत. अशावेळी त्यांचे सहकारी सदैव 'पिवळ्या' बरमुड्यात वावरत असतात, अशी कबुली मागे त्यांनी दिली होती. असो.

तेव्हा ते असेच कुठेतरी भटकत असताना त्यांना काही जुने दस्तावेज सापडले. ते दस्तावेज म्हणजे इसवी सन पुर्व ४२० सालातील गप्पागोष्टी नावाच्या धाग्यावरील तेथल्या आयडींच्या दिवसभरातील गप्पांचं पान होतं. ते लेखन @मिट नावाच्या आयडीने संग्रहीत होते. त्याचे शुद्धलेखन इतके गिचमिड होते, की वासूचँप त्याला चक्क "स्वतंत्र लिपी" समजले. मग त्यांनी ते पान अनुवादीत केले. ते जसेच्या तसे इथे देत आहोत.

*

@मिट इसवी सन पुर्व ४२०
नमस्कार सज्जनहो Happy

झुंजार_दोशी इसवी सन पुर्व ४२०
अ‍ॅडमिट सक्काळी सक्काळी शिव्या का देतोएस?

आर्या_पार इसवी सन पुर्व ४२०
णमस्कारम Happy

प्रिया इसवी सन पुर्व ४२०
गुड मॉर्निंग एव्हरीबडी

कुश्या इसवी सन पुर्व ४२०
हाय प्रिया Happy

बर्फीखीर इसवी सन पुर्व ४२०
तुमचं हाय बाय झालं की मला बोलवा.

मीटू इसवी सन पुर्व ४२०
कुश्याला फक्त प्रियाच दिसली. आम्ही नाय दिसलो.

कुश्या इसवी सन पुर्व ४२०
प्रिया जीटॉकवर आहेस का?

प्रदक्षिणा इसवी सन पुर्व ४२०
आर्या काल मी डुबूकवड्यांची आमटी बनवली होती.

झुंजार_दोशी इसवी सन पुर्व ४२०
डुबूकवड्यांची आमटी !! कसले भयंकर पदार्थ बनवता तुम्ही बायका !

मागे हिने 'कोबीचे श्रीखंड' बनवले होते.

बर्फीखीर इसवी सन पुर्व ४२०
झुंझार सांभाळ. एक दिवस तीने तुला भोपळ्याचे पापड बनवून दिले नाही, म्हणजे मिळवली.

@मिट इसवी सन पुर्व ४२०
माझ्या बायकोने पण काल वटाण्याची उसळ बनवली होती. वाटीत उडी मारून शोधले तरी शेवटपर्यंत त्यात वटाणे सापडले नाहीत.

गिरीचंद इसवी सन पुर्व ४२०
बादवे, वटाण्याची उसळ कशी लागते?

झुंजार_दोशी इसवी सन पुर्व ४२०
पंचक लागते, तशी लागत असावी.

@मिट इसवी सन पुर्व ४२०
नाही. यश्टी लागते, तशी लागते.

आर्या_पार इसवी सन पुर्व ४२०
अम्या, तिने वटाणे मिक्सरला लावले असतील.

@मिट इसवी सन पुर्व ४२०
कधी कधी तर कांदा-पोह्यात कांदाच नसतो. आता म्हणू नकोस, त्यावर कांदा पिळला असेल म्हणून.

झुंजार_दोशी इसवी सन पुर्व ४२०
अम्या Rofl

गिरीचंद इसवी सन पुर्व ४२०
मला विनोद कळला नाही... मी हसणार नाही.

@मिट इसवी सन पुर्व ४२०
ठीक आहे. मग तू टरफलं उचल.

गिरीचंद इसवी सन पुर्व ४२०
कंटाळा

उद्या.ये इसवी सन पुर्व ४२०
गिरी पाव किलो कंटाळा इकडे पाठवून दे.

कुश्या इसवी सन पुर्व ४२०
प्रिया कुठे आहेस?

मीटू इसवी सन पुर्व ४२०
हे कुश्याचं काय सारखं सारखं प्रिया प्रिया चाल्लयं? आम्ही काय इथं मिस्टर इंडीयाची घड्याळं घालून फिरतोय का?

@मिट इसवी सन पुर्व ४२०
"प्रिये"वीण वाचाळता व्यर्थ आहे ||

प्रिया इसवी सन पुर्व ४२०
अमिताभ बच्चनच्या घरी चोरी झाली. चोराकडे फक्त ८००० रूपये सापडले.

झुंजार_दोशी इसवी सन पुर्व ४२०
मला वाट्टं, अभिषेकच्या नवीन चित्रपटाची ती सायनिंग अमाउंट असावी.

प्रिया इसवी सन पुर्व ४२०
मंत्रालयाला आग लागली.

@मिट इसवी सन पुर्व ४२०
मंत्रालयात जर सगळ्या बायकाच असत्या तर त्याला आपण काय संबोधलं असतं?
.
.
.
'मंथरालय'..!

मीटू इसवी सन पुर्व ४२०
अ‍ॅडमिट तुझ्याकडचा विनोदाचा कोटा संपला असेल तर कृपया गप्प बस. पण असे पीजे करू नकोस.

आर्या_पार इसवी सन पुर्व ४२०
प्रिया, तु झी २४ तास मध्ये कामाला आहेस का?

झुंजार_दोशी इसवी सन पुर्व ४२०
गप्पागोष्टीवर इतर चॅनल नाही लागले तरी स्टार प्लस आणि स्टार वन ही चॅनल लागतात.
आज मी आपणाला या इथे 'स्टार प्लस' दाखवू इच्छितो.
.
.
.

* +

स्टार वन उद्या दाखवेन.

@मिट इसवी सन पुर्व ४२०
हे तर काहीच नाही. मी आपणाला "बोल्ड" करीना दाखवू शकतो.

कुश्या इसवी सन पुर्व ४२०
दाखव पाहू.

@मिट इसवी सन पुर्व ४२०
करीना ( आहे की नाही बोल्ड!! )

प्रदक्षिणा इसवी सन पुर्व ४२०
झुंझार, तू कुत्र्यावर पण कविता करतोस?

@मिट इसवी सन पुर्व ४२०
ते काहीच नाही.. शाळेत असताना त्याने गाईवर निबंध पण लिहला होता.

गिरीचंद इसवी सन पुर्व ४२०
मी पण एक कविता केली होती, त्याच्याच दोन ओळी सादर करतोय. वाचकांनी दाद द्यावी.

_____________________

_____________________

धन्यवाद.

प्रिया इसवी सन पुर्व ४२०
याला सर्वांनी ओळीने फटके द्यायला हवेत. Angry

गिरीचंद इसवी सन पुर्व ४२०
मी तयार आहे. पण माझी एक अट आहे... मला 'मुका' मार हवाय.

आर्या_पार इसवी सन पुर्व ४२०
गिरी घरी हक्काची बायको आहे ना..!

गिरीचंद इसवी सन पुर्व ४२०
दुसर्‍यांचे मोबाईल आणि बायका पाहील्या की, आपल्याला उगाच वाट्टं आपण खुप घाई केली म्हणून.

कारण...

दुसर्‍यांकडे नेहमीच त्यांचे "लेटेस्ट मॉडेल" असतात.

चहाटाक इसवी सन पुर्व ४२०
कुठला चॅनल लागलाय?

@मिट इसवी सन पुर्व ४२०
तू आलास ना... आता "अ‍ॅनिमल प्लानेट" लागेल.

चहाटाक इसवी सन पुर्व ४२०
आमट्या गाढवा

@मिट इसवी सन पुर्व ४२०
चहाटाक उंटा
(संदर्भ : चहाटाक हा सौदीच्या कुठल्याशा परीसरात राहतो. याचा पुरावा म्हणून मागे त्याने मला त्याच्या परीसरातली वाळू कुरीयर केली होती. आजही आम्ही दिवाळीत त्या वाळूचे किल्ले बनवतो.)

चहाटाक इसवी सन पुर्व ४२०
वयभव पानघोडा कुठं गेला?

उद्या.ये इसवी सन पुर्व ४२०
वयभ्या, चहाटाक तूला पानघोडा म्हणाला. :काडी

वयभव इसवी सन पुर्व ४२०
तो मला विजय मल्ल्या म्हणाला, म्हणून मी विजय मल्ल्या थोडीच होणारेय.

झुंजार_दोशी इसवी सन पुर्व ४२०
देवाने मला पुढल्या जन्मी झुरळ करावं.
कारण..
माझी बायको झुरळाला फार घाबरते. (जितकी मला नाही.)

शहाणी इसवी सन पुर्व ४२०
हायला , चुकीच्या धाग्यावर आलो की कै?

@मिट इसवी सन पुर्व ४२०
माझी "ब्लु फिल्म" फ्लॉप गेली.

बर्फीखीर इसवी सन पुर्व ४२०
तू "ब्लु फिल्म (सचित्र)" असं शिर्षक टाकलं असतसं तर हीट झाली असती.

आर्या_पार इसवी सन पुर्व ४२०
कसली फ्लॉप झालीय. चांगले ५० प्रतिसाद आलेत की.

@मिट इसवी सन पुर्व ४२०
त्यातल्या प्रत्येक प्रतिसादामागे १ याप्रमाणे २५ प्रतिसाद माझेच आहेत.

गिरीचंद इसवी सन पुर्व ४२०
कं

टा

ळा

झुंजार_दोशी इसवी सन पुर्व ४२०
स्न्च्मोक्ल्ग्ज्क्ज्ल्र्ग्ज्क्ल्चन्क्ल्त्ग्द्क्क्ल्सेर्ज्च्ग्ज्क्र्ल्क्ज

चहाटाक इसवी सन पुर्व ४२०
स्न्च्मोक्ल्ग्ज्क्ज्ल्र्ग्ज्क्ल्चन्क्ल्त्ग्द्क्क्ल्सेर्ज्च्ग्ज्क्र्ल्क्ज << सेम टू यु.

गिरीचंद इसवी सन पुर्व ४२०
इथे गंमत पहा.

प्रिया इसवी सन पुर्व ४२०
ए, मला कुणी सांगेल का? विपू म्हणजे काय?

मीटू इसवी सन पुर्व ४२०
विपू = विचारपूस

@मिट इसवी सन पुर्व ४२०
विपू = विचारपूस
<<
या अर्थाने

शेपू = शेजारपूस

म्हणायला हरकत नाही.

प्रिया इसवी सन पुर्व ४२०
धन्स. बाय लोक्स. सी यु.

@मिट इसवी सन पुर्व ४२०
सी यु << याचा मराठीतील अर्थ "तुम्हांला बघून घेईन" असा होत अभिप्रेत आहे का?

कुश्या इसवी सन पुर्व ४२०
काय बोअर मारताय लोक्स.

गिरीचंद इसवी सन पुर्व ४२०
कुश्याच्या या वादग्रस्त पोस्टीनंतर आजचा दिवस मी "जागतिक कंटाळा दिवस" म्हणून जाहीर करत आहे.

... आणि तेव्हापासून सगळ्याच धाग्यांवर "जागतिक कंटाळा दिवस" साजरा होऊ लागला.

कालांतराने आम्हां इतर आयडींना कळालं की, 'प्रिया' हा कुश्याचाच डु-आय डी होता.

टिप : यातील आयडींची नावे 'काल्पनिक' आहेत, त्यांचा प्रत्यक्ष आयडी वा त्यांच्या स्वभावाशी दूर-दुरपर्यंत अजिबात कसलाही संबंध नाही. तरी कुठल्याही आयडीने उगाच आपला संबंध लेखातील आयडींशी जोडून स्वतःहून स्वतःच्याच भावना दुखावून घेऊ नयेत, ही विनंती.

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

गुलमोहर: 

.

अमित Rofl
Lol
Biggrin

मेले मी
आईईईईए ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग!
Lol
Biggrin

बरेच आयडी मिसलेस पण तू
एयू द्ते अजुन Lol

अम्या ते मंत्रालयावरुन गगो वर एक किस्सा झालेला... काही जणींनी मंत्रालय पुण्यात आणि संसद मुंबई स्थापन केलेली........:हाहा:

:हहगलो::फिदी::खोखो::हहगलो:

मागे हिने 'कोबीचे श्रीखंड' बनवले होते Lol

>>याचा पुरावा म्हणून मागे त्याने मला त्याच्या परीसरातली वाळू कुरीयर केली होती. आजही आम्ही दिवाळीत त्या वाळूचे किल्ले बनवतो. Proud Rofl

कस्लं भन्नाट आहे...आणि शागं... _______/\____________________________________ Wink

<<अशावेळी त्यांचे सहकारी सदैव 'पिवळ्या' बरमुड्यात वावरत असतात, अशी कबुली मागे त्यांनी दिली होती. असो.<< Rofl

<<आर्या_पार इसवी सन पुर्व ४२०
गिरी घरी हक्काची बायको आहे ना..!<<< हे राम! गिरी असा कधीपासुन झालास तु! Lol

आम्ट्या... पाय कुठे आहेत तुझे? ___/\___ Proud

अ‍ॅडमिट -------------------------------/\------------------------- Rofl

Pages