चिंटूसंवाद स्पर्धा - १

Submitted by माध्यम_प्रायोजक on 30 April, 2012 - 01:48

चिंटूला आणि त्याच्या संवंगड्यांना खट्याळपणा करताना, चेष्टामस्करी करताना आपण नेहमी पाहतो. कधीकधी आपल्या मित्रमंडळींमध्ये किंवा घरी घडलेले संवाद चिंटूच्या मित्रांमध्ये किंवा घरात घडताना दिसतात, तर कधी आपल्या घरी हा प्रसंग घडला असता, तर आपण काय म्हटलं असतं, असा विचार आपण करतो. आणि म्हणूनच 'चिंटू'चं रुपेरी पडद्यावरचं आगमन साजरं करण्यासाठी तुम्हांला मिळते आहे 'चिंटू'चे संवाद लिहिण्याची संधी!

'चिंटू' चित्रपटातलं एक चित्र तुम्हांला दिलं जाईल आणि त्यावर तुम्ही लिहायचाय त्या चित्रातल्या पात्रांमधला चटकदार, खुमासदार संवाद, खास तुमच्या शैलीत! पथ्य फक्त एकच, संवाद लिहिताना जातिवाचक, धार्मिक किंवा कोणालाही दुखावणारं लिखाण टाळायचंय.

१. दिलेल्या चित्राबद्दल त्याच धाग्यावर प्रतिसादात संवाद लिहा.
२. एक आयडी एकापेक्षा जास्त प्रवेशिका देऊ शकतो.
३. विजेत्यांची निवड मतदानाने केली जाईल.

वि. सू. - ही स्पर्धा ’चिंटू’ या व्यक्तिरेखेवर आधारलेली आहे. चिंटूचा खोडकरपणा, त्याची निरागसता, त्याची मित्रमंडळी, त्याचं विश्व या गोष्टी संवादांतून उभ्या राहणं अपेक्षित आहे. चिंटूशी संबंधित नसलेल्या प्रवेशिका, त्यांना कितीही मतं मिळाली असली तरी, ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.

या स्पर्धेच्या विजेत्यांना मिळेल 'चिंटू' चित्रपटाच्या गाण्यांची सिडी Happy

चला तर मग... खाली दिलेलं चित्र पाहा, आणि चिंटू त्याच्या आईला काय सांगत असेल, ते लिहा...

Spardha1.jpg

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिंटु.: आई..! आई..!... बाबांचा मायबोली वर डुआयडी पण आहे..!
आई.: अरे देवा..! तरीच मी विचार करत होते की माझ्या पाककृतीच्या धाग्यावर "जळके, जमले नाही" असले प्रतिसाद कोण देत असेल..? Uhoh ते हे होते काय...:राग:. बघतेच आता..!!
.
आजोबा.: (मनातल्या मनात). डुआय माझा आहे ... नाव चिंटुच्या बाबांचे आले...:हाहा: ..!!

चिंटू : आई, आई आजोबांना ते नवीन "खेळिया" दुकान दाखवायला जाऊ ?
आई : (मनात : अरे देवा, आता अजून एका खेळाची भर पसार्‍यात! ) अरे आताच आलेत आजोबा, थकले असतील ते. त्यांना थोडं शांत बसू देत... ( मनात : की आजोबांचीच आयडिया आहे ही ? )
आजोबा : अगं सूनबाई मला काय धाड भरलीय ? हा चहा प्यायलो की झालो मी फ्रेश! चला चिंटोबा ...
चिंटू : (उडी मारत) य्ये.... !
आई : झालं.....

चिंटू : आई, आज जोशीकाकूंच्या खिडकीची काच फुटली आम्ही क्रिकेट खेळत असताना..
आई : अरे देवा! मग रे?
चिंटू : काही नाही ग, जोशीकाकू आल्या की आजोबांना दार उघडायला सांगितलं आहे.
आई : झालंच कल्याण! म्हणजे जोशीकाकू म्हणतील, 'माझी मी काच बसवून घेते पण आजोबांचे लेक्चर नको'..
आजोबा : ऐकतोय हा मी इकडून

आजोबा: चला आज सुनबाईने इतक्या झटपट दिलेला चहा संपवुन काहीतरी वाचन करुया.
चिंटु: ए आई, अग मी माझा बॉल गरम पाण्यात बुडवुन, धुवुन बाहेर वाळत ठेवुन आलोय ते पाणी फेकायला तर पाणी दिसत नाहीये कुठे. पसारा करुन ठेवतोस असे तु ओरडशील म्हणुन आलोये लगेच. तेवढ्यात तुच फेकलेस का?
आई: अरे देवा मी आताच चहाला इथले गरम पाणी वापरले, पण ते तर स्व्च्छ दिसत होते. तरि मी विचार करतच होते इथे गरम पाणी कोण ठेवुन गेले म्हणुन. Uhoh आता बाबांना कस सांगु चहा पिउ नका म्हणुन.

चिंटू : आई, आबा कुठेत गं ?
आई: का रे काय झालं ?
चिंटू: अग आम्ही क्रिकेट खेळत होतो , तर म्हणाले बरेच वर्षात बॅटीला हात लावला नाहीये , मी पण जरा चार हात मारतो, म्हणून बॅटींग करत होते आणि चक्क सिक्स मारली, तर दामले काकु पाणी घालत असलेली गॅलरीतली कुंडी फुटलीय त्यांची आबांच्या सिक्सर मुळे , म्हणून त्या येतायत आता खाली आणि आबा घरात आलेत बहुतेक
आई: बापरे आता हो आबा ? सज्ज व्हा तोफेच्या मार्‍या साठी.
आजोबा: (साळसूदपणे) अग सुनबाई, मी तर इथे चाहा पीत, पेपर वाचत बसलोय कधीचा, हा चिंटू काहीही सांगतोय. हल्ली गुढघ्यांमुळे चालता येतं नाही, क्रिकेट कुठला खेळायला मी ??

चिंटू : आजोबा का रुसलेत?

आई : आपल्या लाडक्या सचिनला सोनियानी पळवलं म्हणून.

चिंटू : मग मी उद्या सचिनसारखा क्रिकेट खेळलो तर मलाही राहूलबाबा पळवतील का?

आजोबा: चिंटु, उद्यापासून तुझे क्रिकेट बंद.. तुला फुटबॉल आणून द्यायला सांगतो बाबाना.

चिंटु: आई..आजोबांना सांग ना माझ्या सोबत खेळायला यायला...लवकर! प्लीजSS
आई: अरे हो...काय झालं? तुझे मित्र कुठे गेले सगळे?
चिंटु: अगं मगाशी खेळताना पोवळे आजींच्या घरात बॉल गेलाय. त्या विळीवर भाजी चिरत होत्या. आता बॉल देत नाहीत, तो पण चिरतील म्हणताहेत.
आई: जाऊ दे रे..बॉलच गेला ना.
चिंटु: अगं आई, आपला बॉल होता!
आई: गधड्या, आधी नाही सांगायचंस? बाबाsss
अजोबा(खुश होत): पोवळे बाईंकडे जायचंय? चला..चला Happy

३. विजेत्यांची निवड मतदानाने केली जाईल.

एखाद्याने डु आय डी काढून स्वतःलाच भरपूर पॉइंट दिले तर? त्यापेक्षा स्वतंत्र परिक्षकानी निर्णय घ्यावा.

चिंटू: आई ए आई, आजोबांना जोशीकाकूंनी बोलावलंय...त्या खूप रागवल्यात.
आई: का??
चिंटू: अगं क्रिकेट खेळताना त्यांची काच फुटली.
आई: अरे देवा!! चिंटू मी तुला किती वेळा सांगितले आहे कि जपून खेळावे.
बरं त्यांना म्हणाव बाबा आले कि ते येतील भेटायला.
चिंटू: अगं पण काच बाबांनीच फोडली आहे.

ही स्पर्धा ’चिंटू’ या व्यक्तिरेखेवर आधारलेली आहे. चिंटूचा खोडकरपणा, त्याची निरागसता, त्याची मित्रमंडळी, त्याचं विश्व या गोष्टी संवादांतून उभ्या राहणं अपेक्षित आहे. चिंटूशी संबंधित नसलेल्या प्रवेशिका, त्यांना कितीही मतं मिळाली असली तरी, ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.

धन्यवाद. Happy

चिंटू : आई... अगं आई.. ऐक ना...
आई : (मनात)आता काय घोळ करुन ठेवलाय ह्याने?
चिंटू : आजोबा मला सांगत होते की पपा लहान असताना त्यांनी पपाना कुत्रा आणुन दिला होता!!!
आई : आं??!

चिंटू : आई, काल आजोबा बाबांवर खूप रागावले होते...
आई : चिंटू , किती वेळां सांगितलं, मोठ्यांच्या गोष्टी अशा चोरून ऐकूं नये.
चिंटू : पण त्याहीपेक्षां अधिक वेळां ' मोठ्यांचं सगळं ऐकावं', असंही सागत्येस ना !
आई : बरं, कशाला रे रागावले होते आजोबा ?
चिंटू : तुझ्यावरुनच कांही तरी ....
आई : माझ्यावरून ?? काय, काय ...
चिंटू : आई, मग सागतो ना सगळं; आतां होमवर्क करून खेळायला जायचंय ..
आई : होमवर्क कर खेळून आल्यावर. आधी सांग ..
चिंटू : कांही विशेष नाही ग...
आई : आतां सांगतोस कीं...
चिंटू : ' खूप काम पडतं बिचारीवर; सुट्टीच्या दिवशींही तिला कुठेतरी घेऊन नाही जातां
येत तुला ? मला काय धाड भरलीय एखादा दिवस एकटा रहायला !' असं म्हणत होते आजोबा.
आई : काय म्हणतोस !!
चिंटू : बरं, मी जातों खेळायला. आणि हो, आजोबाना आत्तां आपणहून चहा दिलास तर ते माझ्या नवीन
सायकलबद्दल बोलणार आहेत बाबांशी !

चिंटू : आई आज आम्हाला ना शाळेत सुविचार शिकवले. मला फार आवडले ते.
आई: बाळ सुविचार हे आचरणात आणण्यासाठी असतात, नुसतेच शिकण्यासाठी किंवा आवडण्यासाठी नसतात. बर! सांग बर एखादा तुला आवडलेला सुविचार!
चिंटू : मुक्या प्राण्यांवर प्रेम करा Happy
अजोबा : (मनातल्या मनात) आता सुनबाईंना याला कुत्रा आणुन द्यावाच लागणार असं दिसतय

चिंटू : आईSSSSSSSSSSSSS ..... ऐक ना, मी आज एका पाठोपाठ एक सहा सिक्सर्स मारल्या. सहा बॉल्सवर सहा सिक्सर्स!!! आणि प्रत्येक वेळी नविन बॉल घ्यायला लागला.
आई : (खुश होऊन) अरे वा! सहा बॉल्सवर सहा सिक्सर्स. शाब्बास! पण काय रे, दरवेळी नविन बॉल का घ्यावा लागला?
चिंटू : (दु:खी चेहर्‍याने) बॉल फुटत होते ग प्रत्येकवेळी मारल्यावर....... म्हणून ......
आई : असे कसे बॉल फुटत होते? इतकं काही तू जोरात मारत नसतोस.
चिंटू : हो ग, नेहमीचे रबरी बॉल फुटत नाहीत. पण आज कोणाकडेच बॉल नव्हते म्हणून मग मी आपल्याकडचे सहा आंबे घेऊन गेलो होतो ना!!!!!!
(आई धक्का बसल्याने बोलण्याच्या पलिकडे पोहोचलेली)
चिंटू : अगं, आजोबांनीच आयडिया दिली ना .......