अलिप्त

Submitted by वैशाली अ वर्तक on 26 April, 2012 - 11:21

अलिप्तता
मनुष्याच्या स्वभावाचे अथवा वृत्तीचे अनेक पैलू असतात .हसतमुख वा
उदासीन मुखदुर्लभ अबोल वा बडबड्या ,समाधानी वा असंतुष्ट ,धीर गंभीर वा
खेळकर ,एककल्ली वा मोकळ्या स्वभावाचा तर कधी अलूफ अलिप्त प्रकृतीचा
अशी माणसे आढळतात .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण तो लहानाचा होतो
त्यावर व ज्या माणसात वावरतो त्यावर पण थोडी फार अवलंबित असते .अथवा
काही वृत्ती जन्मताच स्वभावात असतात .तर काही वृत्ती परिस्थितीने अंगीकारल्या
जातात . आता अलिप्त वृत्तीवर बोलावयाचे म्हणजे ही वृत्ती थोडी फार अंगी असते अथवा
वर म्हटल्या प्रमाणे परिस्थितीने स्वीकारावी लागते, अंगिकारली जाते .
परदेशात अगदी लहानपणापासून स्वतंत्र खोल्या असल्याने स्वतंत्र खोलीत
रहाणे झोपणे याची मुलांना सवय होते .त्यामुळे पुढे पण त्यांना आपल्या आपल्यातच
रमणे रहाणे याची सवय लागते .भारतीय लोक परदेशात जातात, तेह्वा त्यांना ही
अलिप्तता वृत्ती अंगीकारावी लागते .जवळ शेजारी कोण कोण रहात आहे ? त्याच्याशी
दोन-चार मिनिटे आपल्या अंगणातून दारातून वा बाल्कनीमधून गप्पा मारीत उभे आहेत
असे आढळत नाही . अपार्टमेंट मध्ये सकाळी लिफ्ट मध्ये कोणी भेटले वा सामोरे
आले तर गुड मोर्न्निग ,थांक्यू स्वोरी ,हाव अ नाईस डे या तीन चार शब्दांच्या पुढे काही
नाही .एकत्र गाडीत सहप्रवासी एकमेकात सहप्रवाशान बरोबर गप्पा मारत आहेत असे आढळत
नाही .आपापली पुस्तके ,वर्तमान पत्रे घेवून त्यात डोके खुपसून वाचणे .बस .त्या विरुद्ध परिस्थिती
आपल्या देशात दिसते . वर्तमान पत्र दुसर्याच्या हातात असताना त्यातच डोके घालून वाचणे वा पेपरातील
बातमी वरून चर्चा करणे ,एवढेच काय चहा अथवा नास्ता पण शेअर करणे असा प्रकार सहजतेने आढळतो.
परदेशात गेल्यावर भारतीय स्वत: वृतीने अलिप्त नसल्याने चार-पांच कुटुंबे एकत्र येऊन वीक
एंड एन्जोय करत असतात .कारण तेथील सुख वस्तूंनी भरलेले ,सर्वत्र हिरवळ असलेले ,पण स्वतः:चे
कुटुंब सोडून दुसरे कोणीच नसल्याने आठवड्याला वा पंधरा दिवसांनी एकत्र कार्यक्रम करून जी अलिप्तता
भासत असते ती दूर करण्याचा प्रयत्न करतात .
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे .त्याला माणसे ,समाज लागतोच .वर्षानु वर्ष एकाच गांवात राहून
"आह्मी कधी मंडळात, समाजात आलोच नाहीत ,आह्मी मंडळाचे सभासद नाही "असे म्हणणाऱ्या लोकांबद्दल
हसू येते व वाटते कसे काय राहू शकत असतील ? पण तसे नसते अशी मंडळी दुसरी कंपनी ,मित्र जमवून ,
जोडून रहात असतात .तर एकूणकाय अलिप्तपणाने रहाणे कोणासच आवडत नाही
सध्याच्या धावपळीच्या युगात थोडे फार अलिप्त रहाणे अंगीकारावे लागत आहे . वेळेचा अभाव त्यामुळे
आपल्या आपल्यातच रहाणे स्विकारावे लागत आहे .काही व्यक्ती आपली मने लिखाण द्वारे जरी चार माणसात
मिसळली नाहीत बोलली नाहीत तरी वर्तमान पत्र वा इतर लिखाण द्वारे इतरांशी संवाद साधतात.तसेच
आपल्या आवडी निवडी प्रमाणे पेन फ्रेंड्स बनविणे ही पण अलिप्तता दूर करण्याचा एक प्रकार आहे. आपल्या आवडी प्रमाणेमित्र शोधून थोडया वेळा साठी कां होईना अलिप्तता दूर करतात.
प्रौढत्वाकडे झुकल्यावर वाचनालये ,सोसायटीचे ,कॉमन प्लॉट मधील बाकांवर ,बागेत जावून वरिष्ठ
नागरिक त्यांची मंडळे काढून अलिप्तपणा दूर करत असतात .कारण संसारात मुले मोठी होवून
त्यांच्या त्यांच्या संसारात रममाण असतात अशा वेळी वरिष्ठ नागरिक आपली समवयस्क
मंडळी गोळा करून आपला अलिप्तपणा घालवीत असतात . अलिप्तपणा दूर करण्यासाठी सध्या
दूरदर्शन ,कोम्पुतर ही माध्यमे तर फारच उप्यागी ठरत आहेत. ज्याच्या साह्याने माणूस दिवसाचा
काही वेळ तरी एकाकी पणा दूर करू शकतो .
संतांनी जरी सांगितले की,जीवन चिकूच्या बी सारखे असावे .अलिप्त .तरी सर्व सामान्य माणसाचे
आयुष्य आंब्याच्या कोयी सारखे असते .कोय जशी आमरसात लडबडलेली असते ना? तसेच मनुष्याचे
जीवन संसारात लडबडलेले असते. संतांनाच तो अलिप्तपणा जमतो .पण सर्व सामान्य
माणसांना नाही. तेह्वा लेखन ,वाचन ,चित्रपट पाहणे दूरदर्शन चे कार्यक्रम पहाणे ,कोम्पुतरच्या माध्यमाने
अथवा आपल्या हॉबिज जपून,,कला क्रीडा वगैरे च्या साह्याने काही काळ तरी अलिप्तता
दूर करू शकतो . बाकी अलित्पपणा कोणासच पसंत नसतो .
द्वारा पोस्ट केलेले Vaishali Vartak येथे 4-44 am

गुलमोहर: 

वैशाली:

छान लिहल आहेस! मला वाटत की जी आलिप्तता तू इथे मांडली आहेस त्याला Isolation म्हणता येईल. संत किंवा योगी ,जी आलिप्तता आपल्याला अंगी बाणवायला प्रोत्साहित करतात ती वेगळी. त्याला तटस्थता वा detachment म्हणण जास्त योग्य ठरेल. जिवनातील सर्वच अनुभवांकडे तटस्थ वृत्तिने बघायला ते सांगतात. परंतु समाज प्रबोधनाकरता वा त्यांना जे उमगल आहे ते आपल्या सारख्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्या करता ते समाजात खूपच मिळून मिसळून रहातात. Socialization च म्हण ना.

लिहित रहा.

सुंदर लिहल आहे. आवडलं
अशी अलिप्तता माझ्यात सुध्दा येते कधी-कधी आणी मग मी मायबोलीवर १/२ वर्षानी पुन्हा प्रगट होतो !
आणी हो तुमच्या साठी.....
थोडा टायपो सुधारा म्हणजे....... {कोम्पुतरच्या नाही कंम्प्युटरच्या म्हणायचं असेल ना तुम्हाला ?)!

कल्पु खरच तटस्थता व Isolation फारच छान मांडलस थन्क्यु
जादुगर, टायपो सुधरवीते थन्क्यु