"जन्मखुण" का येते? तिला काही अर्थ असतो का?

Submitted by चिन्गु on 22 April, 2012 - 09:35

"जन्मखुण" का येते? तिला काही अर्थ असतो का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>"जन्मखुण" का येते? तिला काही अर्थ असतो का?<<
???????????
तुम्हाला काय लिहायचे आहे ते थोडे सविस्तर लिहा.असे एकोळी धाग्याने काय समजणार! कि तुम्हाला माणसाच्या, जनावराच्या, की आणखी कोणाच्या जन्मखुणेचा अर्थ काय तो जाणून घ्यायचाय. Happy

आणि मला वाटते त्या जन्मखुणेच्या काही अर्थ (उपयोग) नसावा. (अर्थात मी कोणत्याही जोतीष्याला विचारले नाही), माझ्या डोळ्याच्या खालच्या पापणी वर एक तीळ आहे. त्याचा मला काहीच उपयोग नाही, पण लोकांना उगाचच वाटते की मी दररोज काजळ लावतो म्हणून.

जन्मखुणेला अर्थ असतो की नाही माहीत नाही , पण सरकारी कृपेने उपयोग मात्र असतो सरकारी (पासपोर्ट इ.) कागदपत्रात लिहिण्यासाठी.

तुम्हाला हिन्दुजनमानसात प्रचलित असलेली हिन्दू धार्मिक कारणे हवी आहेत कि अन्निसवाल्यान्ची शास्त्रिय/वैज्ञानिक कारणे?
तुम्ही म्हणाल ती सान्गू! फक्त आता आधी धार्मिक सान्गणार नाही, कारण हे वैज्ञानिक म्हणवणारे अन्निसवाले स्वतः उत्तर द्यायला जात नाहीत, अन दुसरा (म्हणजे आमच्यासार्ख्याने) उत्तर दिले, तर मात्र लगेच सन्शोधनात्मक(?) आकडेवार्‍या, रिपोर्ट्स, वगैरे सायन्टिफिक्क पुरावे मागत निषेधमोर्चेखटले वगैरे करायला येतात. एक प्रकारची सांस्कृतिक दहशतच पसरवतात म्हणा की! असो.
तर तुम्ही ठरवा, तुम्हाला कुठली कारणे हवेत. फक्त जन्मखुणेबाबत वैज्ञानिक/वैद्यकीय जगतात अजुनतरी "सिन्ड्रोम की फिन्ड्रोम" वगैरे जोडलेला शब्द कारण म्हणून सान्गत नाहीयेत बहुधा. Proud
(नैत काय? एखादी गोष्ट समजली नाही की अगम्य स्पेलिन्गच्या जुगवलेल्या इन्ग्रजी शब्दामागे सिन्ड्रोम लावले की यान्चा शोध पुरा होतो Wink )

असतो! डोळ्यानी दिसणारा मस असेल चेहर्‍यावर तर म्हणे नजरेसमोर पैसाच पैसा राहतो माणसाच्या. डाव्या हातात तिळ असेल तर मुठीत पैसा राहतो म्हणे. पायाळू असेल तर धनी होतो माणूस.

प्रचलित हिन्दुधर्मशास्त्रीय समजानुसार, जन्मखुणा काही विशिष्ट कारणान्नी येतात.
१) जन्मखूण ही पूर्वजन्मीच्या आयुष्यात घडलेल्या महत्वाच्या शारिरीक घटनेची खूण दाखवित असते. खास करुन घात अपघातातील जखमेच्या जागेच्या सम्बन्धित खूणा जन्मखुणेच्या रुपाने येतात.
२) पुनर्जन्मामधे, पूर्वजन्मीची काही शारिरिक वैशिष्ट्ये जशीच्यातशी जन्मखुणेच्या रुपाने उमटतात.
३) पूर्वसुकृत, पूर्वजन्मीच्या कर्मफलाच्या कमीअधिक तीव्रतेनुसार, विशिष्ट फलनिर्देश दाखविण्यार्‍या जन्मखुणा असतात, वरील तीळ अन पैका यान्चा उल्लेख अशा प्रकारच्या जन्मखुणान्चा निर्देश करतो.
४) आनुवन्शिकरित्या, मातुल वा पैतृक घराण्याकडून शरिरयष्टीसंबधातील वारशात्मक जन्मखुणाही असतात.
५) जन्मपूर्वकाली गर्भावस्थेत असताना, गर्भाची वाढ होताना काही शारिरीक व्यन्गसदृष बाबी तयार होतात, ज्या जन्मखुणा म्हणूनच "मानल्या" जाऊ शकतात. उदा. सहावे बोट, फाटका ओठ वगैरे. याबाबत अशा व्यक्तिन्चे कुन्डलीमधिल ग्रहस्थितीचा तौलनिक अभ्यास करणे आवश्यक आहे, तरच अशा व्यन्गान्ना जन्मखूणा म्हणता येईल का, व त्याचे भाकित काय हे ठरवता येईल.
६) याव्यतिरिक्त अजुन काही प्रकार असतात, पण मला पूर्ण ज्ञात नसल्याने लिहू शकत नाही, पण जन्मवेळेसची विशिष्ट ग्रहस्थिती, भूतपिशाच्चकरणी इत्यादिन्ची काळी छाया वगैरेच्या जन्मखुणाही उमटतात/असतात असा समज आहे. मला माहित नाही.

एखाद्याच्या अन्गावर असलेली जन्मखूण वरील नेमक्या कोणत्या प्रकारातली आहे हे समजुन घेतल्याशिवाय त्याबद्दल भाकित करणे अवघड असते.
सहसा सामान्य माणसाने याचे अर्थाबाबत फार खोलात न जाता आपापले विहित "सुकर्म" करीत रहावे हे उत्तम.

कीस पाडायला विषय मिळाला की सुटतात सगळे!

हिंदी सिनेमात होतो. लहानपणी हरवलेल्याना परत मोठेपणी एकत्र आणण्यासाठी.
>>> Biggrin

अरेच्च्या? धागाकर्त्याचा काहीच प्रतिसाद नाही?
जन्मखुणा शोधत बसलाय की काय पुढेमागे आरसे लावुन? Proud
अर्रे काय हे, वेळात वेळ काढून इतके इमानदारीत उत्तर द्यावे गम्भिरपणे अभ्यास करुन, तस साध धन्यवाद म्हणायला देखिल अवघड जावे का?
बाकी तेही खरच म्हणा, माणसे हल्ली शब्दान्ना देखिल महाग झालीहेत. शब्द देखिल कन्जुषपणे वापरतात असे माझे निरिक्षण आहे.

limbutimbu, माफ करा. मी आत्ताच हे प्रतिसाद वाचले. सर्वाना धन्यवाद Happy
माझ्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला एक जन्मखुण जी सहज दिसेल अशी आहे म्हणुन प्रश्न विचारला होता. आप ण खरेच इमानदारीत उत्तर दिले आहे. आजकाल "इमानदारी" शिल्लक आहे असे माझे निरिक्षण आहे. Happy

ठीके चिन्गू, उत्तराची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद Happy
मुलिचे जन्मखुणेबद्दल जास्त विचार करू नये, अशा जन्मखुणा "भविष्य निश्चित करीत नसतात" (अपवादात्मक केवळ तीळ वगैरे मोजक्या बाबीच भविष्यात काय वाढलेले असू शकेल याचे निदर्शन करतात) पण तरीही माझ्या पहाण्यात आजवर जन्मखूणेमुळे काळजी करावी असे आलेले नाही.
कित्येकदा, ठळक अशा जन्मखुणेबाबत धान्दोळा घेता, घराण्यातील आधीच्या मृत व्यक्तिशी येनकेनप्रकारेण संबंध लागतो असे बर्‍याचदा आढळते. जसे की तशीच्या तशीच जन्मखूण मृत व्यक्तिवर असल्याची आठवण सान्गणारे भेटतात, किन्वा कधी कधी मृत व्यक्तिच्या मृत्युचे कारण बनलेली जखम वा आघात सदृश बाबीशी संबंध लागतो. असो.
मायबोलीवर विश्वासाने विचारणाकेल्याबद्दलही आपणास धन्यवाद

लिम्बु भाउ...
माझ्या मुलाचे डोक्यावर भोवर्‍याजवळचे मोजकेच ५-६ केस पांढरे आहेत.
जन्मताच तसे आहेत ते. नाही ते कमी झालेत नाही वाढलेत. (केसांची संख्या म्हणतोय मी)
ह्याला जन्मखुण म्हणता येइल का???

Asto