भावनेने ओथंबलेले स्क्रॅप्स, खरडी, विपु इ. इ.

Submitted by Kiran.. on 22 April, 2012 - 08:49

ऑर्कुटच्या काळात जीमेल मधे जपल्या गेलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या पाऊलखुणा आज सहज चाळता चाळता हाती लागल्या. त्यात काही डॉक फाईल्स होत्या, एकमेकांना आलेले मेल, तर काही हेरगिरी करून सेव्ह केलेले स्क्रॅप्स, खरडी, विपु असा नजराणाच सापडला. त्यातलं सिलेक्टेड नमुने इथं पेश करतोय.

नमुना एक

तू मला हा मेल का पाठवलास कळेल का ?
तू रागावलीस का ? अगं मी गंमत म्हणून पाठवला हा मेल. आम्ही मित्र मित्र एकमेकांना जसे मेल पाठवतो तसाच तुला पाठवला. तुझ्याशी इथं बोलताना तू एक मुलगी आहे याचा मला विसरच पडतो बघ. माझ्या मनात तसं काही नव्हतं गं... तुला ते समजायला पाहीजे होतं. मी तुझ्याबद्दल असे विचार ठेवू शकेन असं तुला वाटलंच कसं दीदी ? सांग ना ?

नमुना दोन

काल तुझ्या फोनवरून मुलाचा आवाज कसा आला ?

अरे माझा फोन मा़झ्या भावाकडे असतो ना ! तू त्यालाच फोन केलास वाटतं ? तो कशाला मला फोन देईल ? तू असं कर फोन नकोच करूस.

मग आपण एकमेकांशी कसा संपर्क साधायचा ? Uhoh
आपण इथेच जीमेल वर बोलत जाऊ.

अगं पण मला तुझ्याशी बोलायचंय. तुझा आवाज ऐकायचाय मला. Sad
अरे असा दु:खी नको होऊस. मी तुला माझ्या मैत्रिणीच्या फोनवरून बोलत जाईन म्हणजे भावाला काहीच कळणार नाही.

बरं. आयडिया चांगली आहे तुझ्या त्या माठ भावाला गंडवायची . तुझी मैत्रीण कधी भेटेल तुला ? :हर्षवायु झालेली बाहुली:
ती सध्या गावाला गेलीये. आली कि लगेच फोन करेन हं. .. हा XXXX सारखा चॅट वर येतोय. त्याच्याशी जरा बोलते आता. बाय , टीसी Happy

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नमुना तीन

ताई,
तू मला चोर ठरवलंस. अगं मी तुझ्या कवितेचा मोठा फॅन आहे गं Sad म्हणून तर आवडीने ती कविता कॉपी करून दुस-या कम्युनिटीवर टाकली गं ताई . आणि तू मात्र....!!! तू माझ्या भावनांचा असा अपमान करशील हे स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मला ! :(:(
बघ ना, तिथं किती जणांनी वाचली तुझी कविता. इतक्या जणांपर्यंत ती पोहोचली ती कुणामुळं ताई ?
तू मला काहीही म्ह्टलं असतंस तरी चाललं असतं. पण चोर म्हटल्यामुळं मी खूप दु:खी झालोय. त्यातून तू असं म्हटलीस म्हणून मला आता जगावंसं वाटत नाही. माझा गुन्हा काय झाला? तुझ्या कवितेवर मनापासून प्रेम केलं हाच ना ? ताई, तुला समजत कसं नाही ? इतर सगळे वाहवा करणारे तुझ्या कवितेला नाही तर तुझ्याकडे बघून तसे रिप्लाय देत असतात. मी असं कधी केलं का ? उलट मी तुला काही न कळवता, कसलंही क्रेडीट न घेता तुझ्या कवितेला प्रसिद्धी मिळवून दिली. वरून तुला ताई पण म्हणतोय. आता कळ्ळा ना तुला फरक ? गेला ना राग ? मग हास बघू खुदकन !

हो का ? मा़झी कविता इतकीच आवडली होती तर खाली माझंच नाव ठेवायचं होतसं ना ! ते डिलीट करून तुझं नाव का टाकलसं ?
तुला इतकं समजून सांगितलं ते कळत नाही का ? स्वतःला काय मोठी कवयित्री समजतेस का ? टपोरी पोरांनी वा वा म्हटलं कि लगेच शेफारलीस वाटतं. तुझी कविता गेली खड्ड्यात. ढिगाने मिळतील मला दुस-या. आता त्रास देऊ नकोस जास्त.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नमुना चार

हे बघा, सुरूवात तुम्ही केली.

मी ???????डुक्कर कोण म्हणालं आधी ?

मग, मला माकड म्हटल्यावर मी काय आरती ओवाळू ?

पण मी काय नाव घेऊन माकड म्हटलेलं का ?

सगळं वर्णन माझ्याशीच जुळणारं होतं म्हटल्यावर कुणाला उद्देशून म्हणालास रे ?

ए SSSS ....तू स्वतःवर ओढवून घेतलंस त्याला मी काय करू ?

पण कशाला म्हणायचं म्हणतो मी ?

वा वा ! आमच्या श्रद्धास्थांनावर हल्ला झाल्यावर आम्ही काय हातात बांगड्या भरून बसायचं का ?

हो का ? आणि स्वतः फेक प्रोफाईलने आमच्या श्रद्धास्थानांवर गरळ ओकतोस तेव्हां चालतं का ?

कुणी बनवली फेक प्रोफाईल. सिद्ध कर नाहीतर गंभीर परिणाम होतील

अरे जा रे ! तुझ्यासारखे लै बघितलेत.

पण मला पहिल्यांदाच पाहीलंयस. मी सायबर सेल कडे तक्रार करीन.

कर कर. स्वतःच पकडला जाशील.

गुर्र

गुर्र गुर्र

गुर्रगुर्र गुर्रगुर्र

फुस्स..

चल चल. मला वेळ नाही तुझ्यासारख्यांशी भांडायला.

मला पण वेळ नाही वाया घालवायला. फुट आता

तूच फुट आधी..

फुट

फुट..

contd...

---------------------------------------------------------------------
नमुना पाच
(एकाच बाजूचे स्क्रॅप्स हाती लागलेत. पण काही बिघडणार नाही असं वाटतंय. Happy )

'तू इतकी वेडी कशी गं ? तुला काय वाटलं ? मी का आलो असेन तुझ्या जीटीच्या फ्रेंडलिस्टमधे ? तू डॉली नाव घेऊन माझ्याशी तासनतास चॅट करत होतीस तेव्हांच मी ओळखलं होतं. मी मुद्दामच रोमॅण्टिक बोलत होतो गं.

मी फ्लर्ट करतो असा तुझा जो समज झालाय ना तो मी मुद्दामच होऊ दिलाय. म्हटलं बघू तरी तू केव्हां ओळख देतेस.

काय म्हणतेस, हा माझा आयडी तू कसा शोधून काढलास ? घरी मी गेल्यावर तू लॉगिन विंडो मधे कर्सर नेत असशील तेव्हां माझे सगळे आयडी तुला दिसत असतील हे मला कळालं नसेल का ?

हे बघ.. ये ग ग ग गलत है .. तुझा हा जुनाच आरोप आहे गं. घरी मी कशाला रोमॅण्टिक बोलेन ? त्याच त्या वातावरणात ते किती कृत्रिम वाटेल कि नाही ? म्हणून जेव्हां तू डॉली बनून आलीस तेव्हाच मी तुझ्याशी रोमॅण्टिक बोलायची राहून गेलेली हौस पूर्ण करायचं ठरवलं.

विश्वास ठेव, तुझा नवरा कधीही कुठल्याही मुलीशी फ्लर्ट करत नाही.

तुझा उगाच गैरसमज झाला आणि तुला मनःस्ताप झाला हे माझ्या लक्षात आलं नाही हे मात्र कबूल करतो.

आज संध्याकाळी पिक्चरला जाऊयात ?

----------------------------------------------------------------------

नमुना सहा

काका,

मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्ह्ती. तुम्ही माझ्या भावनांशी क्रूरपणे खेळलात. माझ्या मनात तुमच्याबद्दल किती आदर होता आणि तुम्ही ? तो धुळीला मिळवलात. एखादी चांगल्या घरची मुलगी संगीत शिकायचं ठरवतेय असं प्रोफाईलव्रून वाटलं म्हणून मी मदत करायला गेलो. माझा स्वभावच मदत करण्याचा आहे. म्हणून मी तिला स्क्रॅप टाकला. तिने पण रिस्पॉन्स दिला म्हणून मी ते पुढचं सगळं लिहीलं. प्रोफाईलवरचा सुंदर फोटो हा साऊथच्या हिरॉईनचा आहे याचा मला संशयसुद्धा आला नाही. मी किती स्वप्नं पाहिली होती. आणि ती प्रोफाईल तुमची निघावी ? काका , का केलंत असं ? माझ्या मनातल्या नाजूक भावना मी ती समजून तुम्हाला कळवत गेलो आणि तुम्ही तिकडे मजा घेत होतात ? कुठं फेडाल हे पाप ? मला प्रचंड धक्का बसलेला आहे काका... Sad Sad Sad

-------------------------------------------------------------------------------------------------------------
नमुना सात

पक्या , आग लागली तुज्या आय्डियाला. कशापायी मला इंग्लीश मारायला लावलंस मर्दा ? आरं आता ती फाडफाड इंग्लीश हाणतीय अन मला सारखा याला त्याला फोन करायला लागतोय ना .. इंग्लीश मधी मला कळणार नाय असलं बरंच काय काय हाय हे ध्यानात येतंय. अन ती तिकडं माज्या रिप्लायची वाट बघत बसतिय ना मित्रा. तिला काय सांगू कि तु काय बोलती मला काईच कळत नाही असं ? का सांगु सरळ तिला आईच्या भाषेत बोलं म्हणून ? लैच परिस्थिती झालिय मर्दा. आता तूच माज्या नावानं तिच्याशी चाट करत जा म्हणजे मी सुटलो बघ..

( डिस्क्लेमर : पूर्णपणे काल्पनिक. जर कुणाला या संभाषणात कसलही साधर्म्य आढळून आलं तर तो निव्वळ योगायोग समजावा )

Kiran

गुलमोहर: 

..

डिस्क्लेमर : पूर्णपणे काल्पनिक. जर कुणाला या संभाषणात कसलही साधर्म्य आढळून आलं तर तो निव्वळ योगायोग समजा
>>>> किरण...::खोखो: हे काल्पनिक नाहीये... Wink ओर्कुटचे दिवस आठवले.. Happy

कुणाला तरी घाबरल्यामुळे..

वर्षुतै आणि दिनेशदा... गुगली टाकलेत दोघांनी Wink
इतर सर्व मित्र मैत्रिणींचे आभार Happy

भारीच.