प्रश्न अनेक

Submitted by खमंग चिवडा on 12 April, 2012 - 00:43

१ भर रस्तावर एका ठीकाणी गर्दी दिसली, एक माणुस पडलेला होता आणी त्याच्या आजुबाजुला दोन चार स्त्रिया बसुन त्याच्या चेहयावर पाणी शिंपडत होत्या, काय झाले होते कोणालाच माहित नव्हते बहुतेक जण दुरुन बघुन गाडीचा वेग कमी करुन त्या कडे बघुन पुढे जात होते तेव्हढ्यात एक जोडपेही गाडीवरुन जात होते, माणुस गाडी थांबंवुन तिकडे जावु लागला तसे त्याला मागे खेचण्यात आले, अहो आजकाल काही खर नसते, कोणी दारु पिउन पडते, कोणी भांडणात जखमी हौउन पडते, तुम्ही कशाला नसत्या फ़ंदात पडता, चला लवकर....

हा शहरात मध्यवस्तीत घडलेला किस्सा.......

२ शिक्रापुर चाकण टोलनाका, एक विक्रेता, बजाज एम ८० वरुन जात होता, अचानक चक्कर येउन पडला, कोणीतरी फ़ोन केला,अ‍ॅम्बुलंस आली आणी माणूस दवाखाण्यात पोहचला.........

३ पुणे नगर हायवे, एका भिकायाच्या अंगावरुन ट्र्क गेलेला, कमरेखालचा पुर्ण भाग चपलेला, माणुस मरुन पडलेला, कोणी पुढे जायला तयार नाही,

४ रस्त्याच्या कडेला आटो उभा करुन आटोतच पडलेला माणुस. (दारु पिउन होता की काय माहित नाही)

या सर्व घटना कश्या नार्मल वाटायल्या लागल्या का?
एक माणुस गेल्याचे दु:ख आता कोणाला राहत नाही का?.
चालायचच म्हणून लोक कोणासाठी थांबत नाही का?
जिथे घटना घडली तेथील लोक सुध्दा समोर यायला तयार का नसतात.?

अनेक प्रश्न आहेत. उत्तर नाहीच
बघा सापडले तर मनापासुन

गुलमोहर: 

माझे मत - सर्व-सामान्य गॄहितके चुकीची ठरतात असा अनुभव/वाचन्/श्रवण सर्वानी घेतला/केले आहे. त्यामुळे आपली मदत अनाठायी ठरून आपणच त्यामधे अडकले जाउ हि भिती न मदत करण्यास प्रवॄत्त करते.