घर कुठे घ्यावे - औंध, बाणेर, बालेवाडी की पाषाण?

Submitted by मिनू on 10 April, 2012 - 07:01

समस्त मायबोलीकरांना माझा नमस्कार.

मी सध्या मुंबईवासी असून लवकरच पुणेकर होणार आहे. मुलाला हिंजेवाडी मधल्या शाळेत प्रवेश घेत आहे. माझ्यापुढे प्रश्न असा आहे की औंध, बाणेर, बालेवाडी आणि पाषाण या भागांपैकी कोणत्या भागात घर बघावे? सध्या तरी भाड्यानेच घर घेणार आहोत.

कृपया खालील मुद्दे विचारात घेउन सल्ले द्यावेतः

१. शाळेपासून शक्य तेव्हड्या जवळ. शाळा हिंजवडीत असली तरी रहायला तो भाग अजून तरी चांगला नाही असं माझं प्रामाणिक मत आहे.
२. मुख्य मुद्दा हा की मुंबईत राहून टँकरच्या पाण्याची अजिबात सवय नाही... त्यामुळे निदान प्यायचं पाणी तरी कॉर्पोरेशनचं असावं. बाकी वापरासाठी टँकरचं पाणी ठीक आहे.
३. रोज लागणार्‍या वस्तू चालत जाता येईल एव्हड्या अंतरावर (दुचाकी नाहीये सध्या तरी) उपलब्ध असाव्यात.
४. रात्री उशीरा येणार्‍यांसाठी जास्त काळजी नसलेला भाग.
५. मुलाला सिमेंटची अ‍ॅलर्जी आहे त्यामुळे शक्यतो बांधकाम चालू असलेली सोसायटी नको आहे.

माझे आई-वडील अधून मधून तिथे येतील. दोघांचेही वय ७० च्या पुढे असल्याने त्यांना यायला जायला सोयीचा भाग हवाय. जस की संध्याकाळी फिरायला जाता आलं पाहीजे - रस्ता खडकाळ असेल तर पाठवता येत नाही.
ओसाड भागापेक्षा हिरवळ असलेला भाग असेल तर सोने पे सुहागा Happy

जाणकार पुणेकरांनी कृपया मार्गदर्शन करावे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बालेवाडी सर्वात जवळ आहे हिन्जवडीच्या.
पण तिथे राहण्याच्या बाबतीतला अनुभव किती चांगला हे नाही सांगु शकत.
राहण्यासाठी मी नेहमीच औंध येरीया प्रेफर केला असता पण मुलाचा प्रवास वाढेल.

आम्हाला आता (अमेरिकेतुन) बालेवाडीत रहायला येउन दोन वर्षे झाली आहेत. आता रस्ते, इतर सुविधा या बाबतीत हा भाग बराच सुधारला आहे. हिंजवडी ८ किमी वर आहे. माझी दोन्ही मुले हिंजवडीतच शिकत आहेत.
पिण्याचे पाणी कॉर्पोरेशनचे हवे असेल तर मात्र हा पर्याय आउट कारण इथे टँकर, बोअरवेल चे पाणीच आहे. पण घरी नसाका, अ‍ॅ॑क्वागार्ड लावुन हा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व करता येइल.
इतर भागही पहा, हा भागही पहा आणि स्वतः ठरवा.

Happy लाजरा, घेतले असते हो पण प्रत्येक ठिकाणी एक म्हणजे माणसांनासुद्धा प्रत्येक ठिकाणी एक असं विभागायला लागेल !!!
बालेवाडी मधे पार्क एक्स्प्रेस बघून आले पण तिथे प्यायचं पाणी रोजचं २० लिटर बिल्डर पाठवतो. ते जरा रिस्की वाटलं. दुसरं म्हणजे पक्का रस्ता नाही.

मुंबईमधे शाळा आणी घर यातील अंतर १ किमि आहे त्यामूळे पुण्यात शाळा आणि घर हे अंतर फार वाटतं. बावधन किती लांब पडेल याचा अंदाज नाही येत आहे. कोणी सांगू शकेल का?

बाणेर मधे घरं नाही मिळाली मला कोणत्याही वेबसाईट वरुन. मिळतात तिथे भाडं २२००० च्या पुढे आहे. जे बरोबर आहे का?

शाळेच्या जवळ हा निकष असेल तर वाकड मध्ये घ्या.. हिंजवडी-वाकड पुल ओलांडल्यावर बर्‍याच स्किम्स आहेत. किंवा शाळा दुसरी बघता येईल. पण या सर्व भागात बांधकाम चालु नसणारा असा कुठलाच भाग मिळणार नाही (सिमेंट्च्या अ‍ॅलर्जी संबंधात). अंतरं बघायची असतील तर गुगल मॅपवरुन डायरेक्शन्स घेता येतात ते बघा.

निगडी प्राधिकरण सुद्धा चांगला भाग आहे. शक्यतो सेक्टर २६ मधे बघा. हिंजवडी १० कि.मी. आहे. पण स्वच्छ, शांत परिसर, मुबलक पाणी (मपालिकेचे), सारखी वीज जात नाही, गजबज-रहदारी फारशी नाही तरीही सुरक्षीत. टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट ई. आहेत. बरिच उद्याने आहेत.

नात्या तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे. पण शाळेत दुसरीकडे प्रवेश मिळत नाहीये. अंतरं बघता येतायत गुगल मॅपवरुन पण शॉर्टकट असेल तर ते तिथून कळत नाही त्यामुळे बसला किती वेळ लागेल त्याचा अंदाज येत नाही.

त्यामुळे बसला किती वेळ लागेल त्याचा अंदाज येत नाही. >> जर शाळेची बस असेल तर ती ठरलेल्या मार्गावरुनच जाईल त्यामुळे त्या रुटवर बघता येईल.

पण त्या भागात खुप स्किम्स आहेत आणी मुख्य रस्त्यापासुन जवळच्या स्किम्स बघितल्यात तर येणे-जाणे, बाजारहाट यासाठी सोयीचे पडेल. जरा आत गेलात तर शांतता मिळेल. पण पुण्यात खाजगी वाहनाला पर्याय नाही त्यामुळे त्याची नक्कीच सवय करुन घ्या. शुभेच्छा!

किंचित लांब चालत असेल तर वारज्याला घर घ्या. मंडई, पुणे शहर, सिंहगड रस्ता, स्वारगेट हे सगळं सोयीचं पडेल. पाहुण्यांना यायला सोयीचं आहे. शाळा आहेत खाजगी. ब-याचशा आहेत. रिक्षा, स्कूल बस, पीएमटी बस या सुविधा आहेतच. शिवाय एक्सप्रेस वे मुळं हिंजवडीला जाता येतंच कि. कंपनीची बस, पिक अप सर्विस असेल तर उत्तमच. पण एका ठिकाणी अ‍ॅडजस्ट करायला काय हरकत आहे ? दहा मिनिटांचा रन वाढेल ..

बाणेर हा अतिमहागडा भाग आहे. तुम्ही बजेट दिलेलं नव्हतं आधी. बावधन मधे तुलनेने स्वस्त आहेत. पाषाणपासून पुणे शहर खूप जवळ आहे. शाळा आहेत भरपूर आणि इतर सुविधाही. भरपूर हिंडून माहिती घ्या आधी..

ह्या सगळ्या अरियात प्रचन्ड गुन्डगिरी आहे. स्थानिक रहिवाशातून हे गुन्ड तयार झालेले आहेत. त्यामुळे संध्याकाळ नन्तर सेफ नाही. यातले काही गुन्ड रिक्षा व्यवसायातही आहेत....

बाणेर मधे घरं नाही मिळाली मला कोणत्याही वेबसाईट वरुन. मिळतात तिथे भाडं २२००० च्या पुढे आहे. जे बरोबर आहे का?>>विपुत सम्पर्क केला आहे बाणेर मध्ये घर बघत असाल तर..

चिंचवड एरिया उत्तम आहे. हिंजवडी फेज ३ पासुन १० कि.मी. वर असेल. प्रसिद्ध मोरया गोसावी मंदिर व इतरही अनेक मंदिरे आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी उद्याने व मैदाने आहेत. पाण्याची उत्तम सोय. वाहतुक व्यवस्था चांगली आहे. रात्री अपरात्री सुद्धा सुरक्शित. आणि सर्वात मह्त्त्वाचे भाडे ही २२००० पेक्शा नक्कीच कमी असेल.