बाळ गणपतीची पितळेची मूर्ती कुठे बनवून मिळेल?

Submitted by सेनापती... on 31 March, 2012 - 14:36

नमस्कार मायबोलीकरांनो...

मला खालील फोटोमध्ये आहे तशी बाळ गणेशाची पितळेची मूर्ती बनवून हवी आहे.

गेल्या २ वर्षापासून शमिका आणि मी, शामिकाच्या मावशीकडे दिड दिवसाचा गणपती बसवत आहोत. यंदाच्या वर्षापासून मूर्ती विसर्जित न करता कायम स्वरूपी एकच मूर्ती घेण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला आहे. त्यासाठी मला वर फोटो दिल्याप्रमाणे पितळेची मूर्ती बनवून हवी आहे.

हुबेहूब अशीच मूर्ती बनवूनही देणारे कोणी कलाकार असतील तर मला कळवा. पुण्यामध्ये असे कारागीर आहेत का? दक्षिणेतील राज्यात तांब्या-पितळेच्या मूर्तीचे काम अजूनही मोठ्या प्रमाणावर होते. तिथे कुठे अशी मूर्ती बनवून मिळेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यातील तुळशी बागेत तांब्या पितळेचे व्यवसाय आहेत हे माहीत आहे. पण पुण्याबद्दल पुणेकरच अधिक चांगला सल्ला देतील. रायगड जिल्हयातील रोहा, माणगाव ह्या शहरांमध्येही तांबा, पितळेचे व्यवसाय जोरात चालतात.

कोल्हापूरला रेल्वे स्टेशनसमोर एक दुकान आहे, त्यांच्याकडून मी नेहमी मूर्ती घेतो. बर्‍याच माध्यमातल्या मूर्ती असतात त्यांच्याकडे.

सांगलीत गणपतीच्या देवळामागे पितळेच्या कामाची खूप दुकाने आहेत. तिथे विचारता येइल. जर कायम स्वरूपी हवी असेल तर चांदीची पुण्याच्या सराफांकडे मिळेल. त्याला नंतर सोन्याचे पाणी देउन घेता येइल. वन टाइम खर्च आहे पण चांगले काम होइल.

@ दिनेशदा : +सहमत.

रोहन ~ कोल्हापूरचे हे दुकान म्हणजे "गणेश आर्टस". गेली ६० [साठ] वर्षे ते या व्यवसायात असून निव्वळ गणेशमूर्तीच नव्हे तर विविध प्रकारच्या अनेकविध देखण्या टिकावू अशा मूर्त्या करण्यात या टीमचा हातखंडा आहे. भारतातच नव्हे तर सार्‍या जगभर यानी केलेल्या मूर्त्या गेल्या आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरीस, मार्बल, दगडी आणि पितळी अशा सर्व प्रकारच्या मूर्त्या करण्यात इथले कारागिर वाकबगार आहेत.

[माझे आणि माझ्या मित्रांचे बालपण याच परिसरात गेल्यामुळे तेथील कारागिरी मी वेळोवेळी पाहात आलो आहे.]

तुम्ही आणि शमिका माझ्याकडे कोल्हापूरला आला होता त्यावेळी हा विषय बोलण्यात छेडला असता तर मी लागलीच तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन गेलो असतो. रेल्वे स्टेशनसमोरच फॅक्टरी आहे.

"गणेश आर्टस कोल्हापूर" विषयी माहिती देणारी खालील लिंक पाहा

http://www.indiamart.com/ganesh-art/

दिलेल्या फोनवरून श्री.प्रशांत काळे यांच्याशी थेट संपर्क साधावा म्हणजे त्यानुसार तुम्ही योग्य ती कार्यवाही करू शकाल.

अशोक पाटील

धन्यवाद... अशोकदा.. ती साईट बघतो आणि फोनवरून श्री.प्रशांत काळे यांच्याशी थेट संपर्क साधतो.. Happy

वा, तुमचा प्रश्न सुटलेला दिसतो, तरी इतर कुणाला माहीती म्हणून सांगते - बंगलोरला पितळेच्या मूर्ती अतिशय सुरेख मिळतात. सर्व देवांच्या, देवतांच्या लहान मोठ्या अगदी सर्व आकारतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती मिळतात. कावेरी एंपोरीयम एम जी रोड ला तर आहेतच, आणखी ही कॉटेज एंपोरीयम्स किंवा इतर दुकानांत त्याहूनही स्वस्त मिळतात. पितळेचे वॉल हँगिंग्स, घंटा, पंचारती, दिवे वगैरे देखिल सुरेख मिळतात.

मवा.. प्रश्न अजून सुटलेला नाहीये... एक संपर्क मिळाला आहे. तिथून काम झाले तर उत्तमच..

मी धाग्यात म्हणालो आहेच की दक्षिणेकडील राज्यात हे काम खूप मोठ्या प्रमाणावार होते. मलाही केरळ-कर्नाटक मधील संपर्क हवे आहेत. तुम्ही बंगलोरला असता ना? की आधी होतात?

बंगलोर मधील संपर्क हवा असेल तर मला सांगा. अ‍ॅक्चुअली माझ्या स्वतःकडे 'आपल्या घरात रहायला गेलो तर' म्हणून घेतलेल्या गणपती, सरस्वती, लक्ष्मी, बालाजी या सर्व मूर्ती होत्या, मला प्रचंड आवडतात पितळेच्या मूर्ती म्हणून घेतल्या होत्या. तर इकडे येताना त्या मला योग्य व्यक्तीला द्यायच्या होत्या. तेव्हा माहीत असते तर आईबरोबर पाठवल्या असत्या. :).

कावेरी एंपोरीयम नावाचे एम जी रोड वर मोठे दुकान आहे, तिथे मी तुम्ही फोटोत दाखवली आहे तशी बैठी बाळ गणेशाची मूर्ती , ती ही झोक्यावर बसलेली, अतिशय सुरेख अशी पाहीली होती ३ महीन्यापूर्वी. आता स्टॉक बदलला असेल तर कल्पना नाही. तिथले दर काहींना जास्त वाटतात, पण मला ते दुकान फार आवडते, प्रचंड वरायटी आहे. तुम्ही फोटो घेऊन कुणाला पाठवले तर कदाचित ते बनवून पण देतील.
जरा कमी दरात हवे असेल तर एम जी रोड वरच आणखी दुकानांत फिरुन पहावे लागेल किंवा चिकपेट वगिरे मधे कोणी जाऊन आणू शकते, पण मला तिथली क्वालिटीची कल्पना नाही.

कावेरी एंपोरीयम नावाचे एम जी रोड वर मोठे दुकान आहे, तिथे मी तुम्ही फोटोत दाखवली आहे तशी बैठी बाळ गणेशाची मूर्ती , ती ही झोक्यावर बसलेली, अतिशय सुरेख अशी पाहीली होती ३ महीन्यापूर्वी.

>>> तिथे ओळखीचे १-२ जण आहेत. त्यांना कळवतो. तिकडुन जमले नाही तर तुम्हाला कळवतो... माहिती करिता धन्यवाद.