Submitted by नात्या on 29 March, 2012 - 19:56
मला आयफोन/आयपॅडवर सफारी ब्राउझर मध्ये मायबोलीवर देवनागरी लिहीताना जर काही लिखाण बदलण्याची वेळ आली आणी त्यासाठी जर बॅकस्पेस की वापरली तर काहीतरी गडबड होऊन सगळी अक्षरे विचित्रपणे एकत्र दिसतात आणी सगळे लिखाण परत करावे लागते. ह्यावर काही तोडगा कोणाला सापडला आहे का? धन्यवाद!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्रोमातही तेच होते. तिथे
क्रोमातही तेच होते. तिथे बॅकस्पेसऐवजी जे खोडायचे आहे तिथे कर्सर नेऊन एक स्पेसबार द्यायचा आणि मग डिलीट केले तर चालते आहे.
एखादा शब्द डिलीट केला की २-४
एखादा शब्द डिलीट केला की २-४ स्पेस मग परत बॅकस्पेस द्यायच्या व मग लिहायचे. मग नाही होत विचित्र शब्दांची रांग. वेळखाऊ व बोरिंग उपाय आहे. :|
क्रोमवर पण असंच करावं लागते.
मी पण स्पेस देउन अगोदर लिहुन
मी पण स्पेस देउन अगोदर लिहुन घेतो आणि नंतर स्पेस डिलिट करुन टाकतो. सवयीमुळे आजकाल चुका पण कमी होतात.
बर्याच वेळा आयफोन/ आयपॅड वर मी मराठी एडीटर अॅप वापरतो. मायबोली व्यतिरिक्त इतर ठिकाणी (फेसबुक) मराठीतून लिहायला खुप उपयोग होतो.
इतका त्रास कशाला करुन घेत
इतका त्रास कशाला करुन घेत आहे.. epic BROWSER वापरा...त्यात निट दिसते आणि लिहिता येते
धन्यवाद मंडळी. स्पेसेस
धन्यवाद मंडळी. स्पेसेस द्यायचा उपाय चांगला लागू पडतोय. हे मस्तच काम झालं.
उदय, हा एपिक ब्राउझर मला. एप स्टोअर मध्ये सापडला नाही.
ऑपेरा बघा मग
ऑपेरा बघा मग
मलाहि सध्या हाच त्रास होतोय.
मलाहि सध्या हाच त्रास होतोय. हे अचानक कसं व्हायला लागल तेच कळत नाहिये.
त्यामुळे कोणाच्या लिखाणावर
प्रतिसादही देता येत नाही.