चिकन व सुरणाचे वडे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 September, 2008 - 04:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो बोनलेस चिकन
२०० ग्राम सुरण
आल, लसुण, मिरची, कोथिंबिर वाटण,
हिंग चिमुटभर,
हळद अर्धा चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
अर्धे लिंबु
चवी पुरते मिठ
बेसन व कॉर्नफ्लॉवर प्रत्येकी अर्धा वाटी.
तळण्यासाठी तेल.

क्रमवार पाककृती: 

प्रथम चिकन व सुरण वेगवेगळे वाफवुन शिजवुन घ्यावेत. नंतर ते पाणी काढुन कुस्करावेत. नंतर चिकन, सुरण, वाटण, गरम मसाला, अर्ध्या लिंबाचा रस, मिठ, हिंग हळद सर्व एकत्र करावे.

आता बेसन व कॉर्नफ्लॉवर एकत्र करुन त्यात चवीपुरते मिठ हिंग हळद घालुन पाणी टाकुन भज्यांच्या पिठाप्रमाणे जरा घट्ट कालवावे.

आता वरील सारणाचे लिंबापेक्शा थोडे मोठे गोळे करुन ते भिजवलेल्या पिठात बुडवुन काडुन गरम तेलात मध्य आचेवर तळावेत व सॉस बरोबर वाढावेत.

वाढणी/प्रमाण: 
५ जणांसाठी / १० ते १५ नग
अधिक टिपा: 

हे वडे अतिशय चविष्ट लागतात. लहान मुले आवडीने खातात. चिकन व सुरणामुळे एनर्जि मिळ्ते.
लहान मुल नसतील तर सारणात लाल मसाला घालुन अजुन तिखट बनवू शकता.

माहितीचा स्रोत: 
स्वत:
पाककृती प्रकार: 

अरे व्वा !! सुरन आनि चिकन मि पहिल्यांदाच वाचल .. मस्त वाटत आहे.. केले पाहिजे. आनि या धाग्यावर एक पन प्रतिकिया कशी नाहि ? कमाल आहे. !!!

सृष्टी, दिनेशदा धन्स.
ही रेसिपी मी २००८च्या गणेशोत्सवाच्या पाककला स्पर्धेसाठी लिहीली होती.

हो ... जुन्या रेसीपि परत फोटो सकट टाका. ..

आज ऑफिस मध्ये काम कमि आहे म्हणुन तुमच्या कथा/ रेसिपी जुन्या पासुन वाचत आहे.;) Wink Wink