"गुल्म" आजाराविषयी माहिती हवी आहे

Submitted by मास्तुरे on 24 March, 2012 - 13:49

काही आठवड्यांपूर्वी "फॅमिली डॉक्टर" या साप्ताहिकात बालाजी तांबे यांनी "गुल्म" या आजाराविषयी बरेच लेख लिहिले होते. माझ्या एका नातेवाइक महिलेला या विकाराचा त्रास होत आहे. या विकारावर अ‍ॅलोपथीत उपचार नाहीत व त्यासाठी आयुर्वेदिक उपचारच घ्यावे लागतील, असे एका अ‍ॅलोपथी डॉक्टरांनी सांगितले.

या आजाराविषयी कृपया खालील माहिती द्यावी.

(१) या आजाराला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? (इंग्लिश नावामुळे नेटवर माहिती शोधता येईल)

(२) हा आजार नक्की काय असतो? हा कशामुळे होतो? याची लक्षणे काय असतात?

(३) यावर अ‍ॅलोपथी उपचार नसतात हे खरे आहे का?

(४) यावर कोणती उपचारपद्धती नक्की लागू पडते?

(५) हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का?

(६) या व्यक्तीला रक्तदाब व मधुमेहाचा देखील त्रास आहे. अशा व्यक्तीला "गुल्म" या आजारामुळे अजून काय त्रास होऊ शकतात?

(७) या आजारावर उपचार करण्यासाठी कोणाला पुण्यात चांगले डॉक्टर माहिती आहेत का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुल्मला बहुतेक Phantom Tumor असे म्हटले जाते. तरी कृपया खात्री करून घेणे.
जालावर ह्या काही लिंक्स मिळाल्या :
http://medical-dictionary.thefreedictionary.com/Phantom+Tumor
http://www.ayushveda.com/health/abdominal.htm
http://www.ayurvedaconsultants.com/cybershow.aspx?ivalue=772