मराठी भाषेत रुढ झालेले इतर भाषांतील शब्द !

Submitted by भूत on 16 March, 2012 - 02:49

मायबोलीवरील एका धाग्यावर चालेल्या चर्चेत " मराठी भाषेत इतर भाषिक शब्द सामावणे " मराठी हिताचेच आहे असा एक सुर निघाला .

त्यावरुन सहजच विचार आला आजही अशे कित्येकशब्द आपल्या मराठी भाषेत असतील की जे मुळ मराठी नाहीत !

बघा तुम्हाला काही सुचतात का ?

( तटी : मराठी ही संस्कृतोभव आहे असे गृहीत धरले आहे तेव्हा "इतर भाषातील" म्हणजे संस्कृतेतर भाषातील शब्द असा अर्थ घावा Proud )

गुलमोहर: 

फारशी भाषेतुन मराठी भाषेत शब्द फार आलेले आहेत
>>> यावर दर रविवारच्या सकाळ पुरवणीमध्ये एक "यु. म. पठाण" नावाच्या सद्ग्रुहस्थांचा लेख असतो.

फारशी भाषेतुन मराठी भाषेत शब्द फार आलेले आहेत

>>>जवळपास सर्व "प्रसिध्द " शिव्या फारसीतुन आलेल्या आहेत Biggrin

तारीख उर्दू शब्द आहे>> मग मराठी काय?

हवा" पण मूळचा मराठी शब्द नाही.>> मग कोणता आहे.

बायको हा मूळ फारसी शब्द आहे. >> मराठी शब्द पत्नी असावा

अर्धी माहिती नकाहो देऊ, पुर्ण करा की Happy

यावर दर रविवारच्या सकाळ पुरवणीमध्ये एक "यु. म. पठाण" नावाच्या सद्ग्रुहस्थांचा लेख असतो.
>>>
मी ही हेच लिहायला इथे आले होते.

तसेच मध्यंतरी अर्निका नावाच्या आयडीने काही ललिते लिहिली होती. त्यात आणि त्यावरील प्रतिसादांमध्येही अशा शब्दांचा उहापोह झाला होता.

>>बायको>>>>>>>> फारसी त बायली का बायडी म्हणतात ना???

नन्ना Proud
ते पारशी लोक म्हणतात. ते पण गुजराथी स्टाईल.

@जेम्स
लूट, नीट ठीके कारण ते समान अर्थासाथी वापरले जातात.
पण फार?? इंग्रजीत फार म्हणजे दुर तर मराठीत खुप

झंपर, शिक (सिक=आजारी), व्हाया, टमरेल, मेल (टपाल),
डिलीव्हरी (बाळंतपण), खाट (कॉट)... हे ग्रामीण भागात सर्रास वापरात
असणारे शब्द, इंग्रजी आहेत.

तसेच ड्यांबिस आणी डामरट पण. (अनुक्रमे Damn Beast, Damn Rat वरुन आलेत.)

कागद (फारसी कागज)
जमीन (फा.)
जमीनजुमला (फा. जोडशब्द)
जमा (फा.)
खर्च (फा.)
जमाखर्च (फा.जो.)
दौलत (फारसी किंवा अरबी. मूळ मराठी नक्कीच नाही)

Pages