अजब पाठपुरावा तक्रारीचा

Submitted by pbs_2005 on 15 March, 2012 - 13:30

तक्रार जसेची त्यांच्या
विभागामधील अनधिकृत बांधकामांची
"माहिती द्यावी त्या ठिकाणांची"
विनंती केली त्यांना सअनी

यादी मिळते सअना पांच कामांची
दिले आदेश कार्यवाही करण्याचे
यादीतील बांधकामांवर
परंतु नाव गुपित ठेवुनी तक्रारदाराचे

होते सुरू कार्यवाही निष्कासनाची
अनधिकृत बांधकामे तोडण्याची

पडताच हातोडा पहिल्या ठिकाणी
जसेचा येतो फोन सअना
बांधकाम जुने असल्याची
करण्यात येते बतावणी

पण बतावणी असते खोटी
म्हणून तुटे बांधकाम

परत फोन त्याच जसेचा
दुसरे बांधकाम वाचविण्याचा
बांधकाम असते कार्यकर्त्याचे
परंतु त्याला नसते परवानगी

तिसरे बांधकाम निघते
त्याच जसेच्या नातेवाईकाचे
परवानगी घेतली नसे त्यानी
मग कसे वाचणार बांधकाम तयांचे

मग पाळी चौथ्या बांधकामाची
सहायक अभियंत्याना अपेक्षा
फोन येण्याची जी नाही होत खोटी

विना परवाना बांधकाम
निघते जसेच्या बहिणीचे
ते ना रहात तुटण्याचे

अंती पुन्हा फोन जसेचा
सअना विनंती शेवटचे

बांधकाम वाचविण्याची
आता मात्र सअनी माहिती
दिली जसेना की त्या दिनिची
असती सर्व बांधकामे
त्यांच्या तक्रार यादीतील

न फोन या जसेचा पुन्हा
कधीही आला त्या सअना

गुलमोहर: