ना हरकत बालवाडीला

Submitted by pbs_2005 on 15 March, 2012 - 13:27

आमदार करिती विनन्ती विभाग अधिकारी याना
दयावी ना हरकत बालवाड़ी बान्धण्या त्याना

जागा असे आरक्षित तलावाकरिता
म्हणोनि धाडला प्रस्ताव विकास नियोजनाकड़े

असे ते अमान्य आमदाराना
बोलावले बघायला जागा आयुक्ताना

मंज़ूरी घेतली विकास नियोजनाने आयूक्तांची
अट घातली भू भाग रेखावा वास्तु विशारदाने 
 
दिली खुश खबर आमदाराला आयुक्तानी 
मंजूर केला प्रस्ताव त्यान्च्या बालवाडीचा 
 
प्रस्ताव धाडला अभियन्त्याने मंज़ूरी प्रमाणे 
देण्या भू भाग रेखण्या वास्तु विशारदाने

तक्रार करिती आमदार पुन्हा आयूक्तांकड़े
दयावे आदेश योग्य ते अभियन्त्याना

धाड़िले बोलावणे आयुक्तानी
विभाग अधिकारी आणि अभियन्त्याना

केली विचारणा त्या दोघाना
का दिली नाही ना हरकत त्यानी आमदाराना

अभियन्त्यानी दाखविली कागदपत्रे सारी
दाखविले आदेश आणि मंज़ूरी आयूक्तांची

'प्रस्ताव वास्तु विशारदाकड़े पाठविला
आपल्या मंज़ुरीनुसार" सान्गितले अभियन्त्याने
पाहीले मंज़ूरी त्यानी त्यांची
पटले त्याना म्हणणे अभियन्त्याचे

परंतु त्याना होती द्यायची
ना हरकत बालवाडीची

सुधारले आयूक्तानी आदेश त्यांचे
नसे ज़रूरी भू भाग रेखणे
ना हरकत द्यावी सत्वर

गुलमोहर: