मिरवणुक वीरांची

Submitted by pbs_2005 on 15 March, 2012 - 13:25

असे सभा उपायुक्तांची
हजर असती जनसेवक आणि अधिकारी
जाणुन घेण्या मते व सूचना
प्रभागातील जनसेवकान्च्या

सांगत असती जनसेवक सारे
अडचणी आणि सूचना त्यान्च्या

करी तक्रार जनसेविका
निष्कासनाची एका
माहिती विचारी तक्रारदाराची

'निष्कासन केले अनधिकृत बान्धकामाचे'
करी खुलासा उपस्थित अभियंता तेथे

खुलासा न पटुनि अभियन्त्याचा
दाखवुन बोट जनसेवकाकड़े एका
उडवी चप्पल त्या जनसेवकावरी एक
सांगूनी 'तक्रार त्याने केली एक'

नसे तो जनसेवकदेखील कमी
धावुनि जाई त्या जनसेविकेकड़े

नसे पड़ती जर मध्ये अधिकारी
ज़रूर होती हाणामारी

प्रसंग ओळखुन उपायुक्तानी
बरखास्त बैठक केली

काठ्या अन तलवारी घेवुनि
जनसेविकेचे कार्यकर्ते आले धावुनि

शोधू लागती जनसेवक तो कुठे दडला
परंतु जनसेवक तो न होता दड्ण्यासारिखा
समोरूनच जाई कार्यकर्त्यामधुनि त्याच्या

समजताच तेथिल तणाव सारा
पोलिस येती शोधण्या दोघा
पान्गुनि जाई जमाव सारा

रात्री येई बातमी दुरदर्शनी समेटाची
मिरवणुक निघे एकत्र त्या दोन्ही वीरांची

गुलमोहर: