नावडतीचे मीठ अळणी!

Submitted by शशिकांत ओक on 14 March, 2012 - 07:52

नावडतीचे मीठ अळणी!

‘नावडतीचे मीठ ‘अळणी’ म्हण सहज आठवली...
पुरुषांना एक आवडती तर दुसरी नावडती असे असते. निदान खाण्याच्या बाबतीत तरी. एक आई व दुसरी पत्नी. पैकी कोणीतरी आवडते असेल तर दुसरे नावडते ठरते.
एकीचा स्वैपाक मिळमिळीत तर दुसरीचा चवदार वाटतो. नावडतीने कितीही मनलाऊन पदार्थ बनवला तरी त्यात काहीतरी उणे काढले जाते असे म्हण सुचवते. असो.
तीच गोष्ट अन्य ठिकाणीही लागू होते असे व्यवहारात दिसते. एखाद्या गोष्टीचा तिटकारा निर्माण झाला की त्याला नावे ठेवण्यासाठी मनात कल्पना विस्तार सुरू होतो. नाडी ग्रंथांना असेच नावडतेपण सहन करावे लागते.
नावडतीच्या स्वयंपाकातील मीठासारखा पदार्थ, जो तयार होण्यात नावडतीचा अजिबात संबंध नसतो, तरीही तिला बोल लावायला ते कारण सोईचे जाते म्हणून वापरले जाते. म्हणीत निदान पदार्थाची चव घेऊन म्हटले जाते असे सूचित होते. नाडी ग्रंथाबाबत (नावडतीच्या) कथनांची (चव) अनुभव घ्यायची तसदी न घेता नाडीतील संकल्पनांचे ‘मीठ अळणी’ म्हणून संभावना करताना पाहून ती म्हण अन्य कारणांना देखील कशी चपखल लागू पडते याचा प्रत्यय येतो.
नाडीग्रंथावर एक कार्यशाळा पुणे मुक्कामी झाली. इच्छुकांनी त्यात काय घडले हे माहिती करून घ्यायला काय हरकत आहे. निदान नाडीग्रंथांचे मीठ अळणी आहे का नाही याचा अनुभव येईल.

गुलमोहर: 

पुण्यात कार्यशाळा झाली का ? वाचल्यासारखं झालं...
हात दाखवून अवलक्षण हेच नाव होतं ना ?

युगा
----------------------------
नाडी सलामत तो पायजामाज पचास

>>> नाडीग्रंथावर एक कार्यशाळा पुणे मुक्कामी झाली. इच्छुकांनी त्यात काय घडले हे माहिती करून घ्यायला काय हरकत आहे.

तुम्ही या कार्यशाळेला उपस्थित होता का? असल्यास, त्यात काय घडले याचा वृत्तांत लिहावा ही विनंती.

नाडी ग्रंथ भविष्य मराठीतील लेख व पत्रव्यवहारांची नोंद
विविध नाडीग्रंथ केंद्रवाचकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या बद्दलची सामान्य माहिती गोळा करण्याचे काम कार्यशाळा 2011 मधे केले गेले. त्यातील एक मुलाखत...

पी बाबुस्वामीचे नाशिकला द्वारका भागात नाडी केंद्र गेले 7-8 वर्षे सुरू आहे. आपल्या कुटुंबासह ते नाशिकात राहतात. अनेक लोकांनी त्यांच्या नाडीकथनातून लाभ घेतला आहे. नाडी वाचक महर्षींच्या कथनातून लोकांच्या समस्या सोडवायला मानसिक आधार देण्याचे काम आनंदाने करतात. श्री श्री रविशंकरांनी आपले स्वतःचे कथन त्यांच्याकडून ऐकले आहे. त्यांच्यासारख्या जगप्रसिद्ध व्यक्तीपासून ते सामान्य लोकांना त्यांच्या कथनाने समस्यापुर्तीचे समाधान लाभले आहे.
मी नुसता नाडीग्रंथ वाचक आहे असे न मानता, ज्याअपेक्षेने लोक नाडी महर्षींकडे पहातात त्यामुळे आम्हाला या व्यवसायाचा बाजार करणे मान्य नाही. इतर काय करतात यापेक्षा मी या व्यवसायातील साधन शुचितेचे भान राखतो का याचा सतत विचार करून, ग्राहकाला परतताना आपल्याला काही नविन मिळाल्याचे समाधान नक्की करून देतो असे त्यांचे म्हणणे आहे.
तुटक हिंदीतून असले तरी त्यांचे कथन रसाळ व भावनिक आहे. असे त्यांच्या कथनातून जाणवते. लिंक खाली...
दिसत नसेल तर कळवा काय करावे लागेल ते....

मी गेल्या वर्षी एका ज्योतिष्याला पत्रिका दाखवली... तुझे सगळे भले होईल बेटा, असे म्हणून त्याने ताईत दिला आणि एका पुस्तकाचा १४ वा अध्याय वाचायला सांगितला.. त्यानंतर पंधरा दिवसातच मला अ‍ॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला..

लपे करमाची रेखा
माझ्या कुंकवाच्या खाली
पुशीसनी गेलं कुकू
रेखा उघडी पडली

देवा, तुझ्याबी घरचा
झरा धनाचा अटला
धन-रेखाच्या चरहानं
तयहात रे फाटला

बापा, नाको मारू थापा
असो खरया असो खोट्या
नही नशीब नशीब
तयहाताच्या रेघोटया

अरे, नशीब नशीब
लागे चक्कर पायाले
नशिबाचे नऊ गिरहे
ते भी फिरत रह्याले

राहो दोन लाल सुखी
हेच देवाले मांगनं
त्यात आलं रे नशीब
काय सांगे पंचागन

नको नको रे जोतिषा
नको हात माझा पाहू
माझं दैव माले कये
माझ्या दारी नको येऊ

-बहिणाबाई चौधरी

ओक साहेब लींक येऊद्यात वाचायला आवडेल.
एखादा मनुष्यप्राणी मेला तर डॉक्टरसुद्धा नाडी बघतात म्हणे,हस्तरेषा नव्हे!
ओक सरांचं मीठ अळणी आहे हे सिद्ध करने बहिणाबाईंच्या(_/\_) साक्षीने सुरू झालेलं दिसतं.

एखादा मनुष्यप्राणी मेला तर डॉक्टरसुद्धा नाडी बघतात म्हणे,हस्तरेषा नव्हे!
---- हस्तरेषा आणि नाडी परिक्षा या दोघांमधे थापा मारणे हे साम्य आहे असे त्यांना म्हणायचे असेल.

डॉक्टर अनेक तपासणी करतात... आणि मग निष्कर्ष काढतात. नाडी तपासणी त्या अनेकां पैकी एक असेल. निव्वळ नाडी बघुनच काहीच ठरवत नाही. ह्रदयाचे कार्य (pumping) व्यावस्थित सुरु आहे अथवा नाही याच्याशी संबंधात ते चाचपणी करतात. त्यांचे नाडी तपासण्याचे आणि वर उल्लेख केलेले नाडी तपासणी आणि निष्कर्ष यांचा दुरान्वयेही संबंध असेल असे वाटत नाही.

जाडॉप्या किंवा डॉ साती यावर अजुन प्रकाश टाकतील. Happy

हस्तरेषा आणि नाडी परिक्षा या दोघांमधे थापा मारणे हे साम्य आहे असे त्यांना म्हणायचे असेल>>>>
त्यांचे नाडी तपासण्याचे आणि वर उल्लेख केलेले नाडी तपासणी आणि निष्कर्ष यांचा दुरान्वयेही संबंध असेल असे वाटत नाही.>>>>
वरील दोन वाक्यांचा अर्थ इतकाच निघतो की नावडत्याने कितिही खरं लिहिल तरी त्याला ठोकून काढायचे,असो चालूद्यात.

डिस्क्लेमर- वैद्य लोक बघतात ती नाडी, दादा कोंडके ज्यासाठी प्रसिद्ध आहेत ती नाडी आणि प्रस्तुत लेखात अभिप्रेत असलेली नाडी यांचा काहीही संबंध नाही. आपण ज्याचे समर्थन करतोय ते नक्की काय आहे याची संबंधितांनी माहिती मिळवावी, कृपया.

ओकसाहेब- नाडीपट्टी काय आहे सांगा हो यांना जरा !

फलज्योतिष – एक बडवणे -
म.टावर बहुतांची अंतरे मधील श्रीनिवास मोडक यांनी सादर केलेले सुविचार की फज्यो. एक ठोकताळा म्हणून इच्छुक लोक वापरतात. हे फलज्योतिषाला नावे ठेवणाऱ्यांना पुर्णपणे माहित आहेत. परंतु एखाद्या घरातील खाष्ट सासू सोशिक सुनेवर डाफरायला जशी इतर काही कारण मिळाले नाही की ‘जेवणात मीठ कमी’ नामक केंव्हाही वापरता येणाऱ्या बडवण्याने सुनेचा उद्धार करायला सदैव तयार असते तसे बुद्धिवादी, निरीश्वरवाद्यांकडे “फलज्योतिष” हे एक “बडवणे” हत्यार तयार असते. त्याचा वापर ते व प्रसिद्धी माध्यमे त्यांना हवा तसा करून घेतात.

मात्र खाष्ट सासूच्या मुलाला आपलेसे करून सून तिला जशी चुप करते, तसे फलज्योतिषी नाड़ीग्रंथांच्या मदतीने विरोधकांना चुप करतात. आपल्याकडून माहिती काढून तीच परत आपल्याला नाडीभविष्य म्हणून सांगतात या पलिकडे विरोधकांकडे नाडीग्रंथांना नावे ठेवायला कारण मिळत नाही. आपण शोधकार्य केल्याचे ते म्हणतात. पण नाडी ग्रंथात व्यक्तीची नावे कोरुन कशी येतात? यावर भाषा-लिपीचे तज्ज्ञ मिळत नाहीत अशा सबबी सांगून ते नाडीग्रंथाकडे सोईने दुर्लक्ष करतात. नाडीग्रंथांकडे फलज्योतिषांनी सहानुभूतीने पहाण्यात त्यांचे हित आहे याची जाणीव त्यांना हळूहळू होत आहे.

नावडती, अळणी, सासू - सुन... यांचे माध्यम वापरुन झाले. तुम्हाला काय सांगायचे आहे ते मनमोकळे पणाने सांगा. भांडे लपवण्याची अवशक्ता नाही आहे.

नाडी ग्रंथात व्यक्तीची नावे कोरुन कशी येतात?
------ Happy हे मधेच कसे आले... ? विषयांतर होते आहे. कुठल्या व्यक्तींचे नांवे कोरुन येतात? कृपया थोडे विस्तृत करुन सांगा ना... भाषा कशी ठरवली जाते? ओसामाचे नांव मराठी मधे आणि ओकांचे नाव अरेबिकमधे येण्याची शक्यता असते का? नाडीग्रंथ हा user friendly असतो किंवा आधिच ट्युन केलेला असतो का?

किमान अवश्यक माहिती समोर येत नाही तोपर्यंत मला चक्क फसवाफसवी चा प्रकार वाटतो आहे Happy

आपल्याकडून माहिती काढून तीच परत आपल्याला नाडीभविष्य म्हणून सांगतात
----- याला नाडीभविष्य असे म्हणतात?

ओकसाहेब ,येऊ द्यात लेख नाडीपरीक्षेवर पुर्वग्रह बाजुला ठेवुन चर्चा करु या.

मित्रांनो,
याविषयावर अधिक लिहायची सध्या इच्छा नाही. आपण विचारता आहात म्हणून काही काळापुर्वी एक लेख टाकला होता. त्या नोडची लिंक
यावरून या बाबतचा शोध घ्यावा.
सध्या इतकेच...

मित्रांनो,

कुठल्या व्यक्तींचे नांवे कोरुन येतात? कृपया थोडे विस्तृत करुन सांगा ना... भाषा कशी ठरवली जाते?

बऱ्याच काळाने मायबोलीवर फिरायला आलो. काही नव्या धाग्यांच्या बरोबर जुन्या धाग्यांची पुन्हा ओळख करून घेतली. त्यात 'नावडतीचे मीठ' धाग्यात वरील प्रतिसादाला काही प्रतिसाद दिला गेला नसल्याचे जाणवले. नंतर इतका अवधी गेला की मी विसरून गेलो की व्यक्तिची नावे नाडी पट्टीत येतात का? असतील ती कशी येतात? त्यातील भाषा व लिपी कुठली असते? वगैरे प्रश्नांचे उत्तर द्यायचे राहून गेले आहे. म्हणून विलंब. असो.

आपणहून नाडी ग्रंथ विषयावर इथे लिहायला मी उत्सुक नाही. पण विचारलेल्या प्रश्नाला समाधान देणारे उत्तर सादर करणे ही गरजेचे म्हणून खालील फोटो सादर करत आहे.

भविष्य पहावे किंवा न पहावे, ज्योतिष शास्त्र आहे किंवा नाही या मधे न पडता नाडी ग्रंथातून जी माहिती मिळते ती त्यावर कशी कोरलेली असते त्यावर शोधकार्य 'असे असणे शक्य नाही!' या विचारांनी माझी सुरवात होऊन 'ते कसे खोटे असले पाहिजे!' अशा धारणेतून झाली. नंतर ती तशी कोरलेली असतात शिवाय अन्य सुसंगत कथन असते असे लक्षात आल्यावर भाषा व लिपीच्या अंगाने अभ्यास करायला हवा अशी मला प्रेरणा झाली व मला योग्य ते तज्ज्ञ लोक आपोआप मिळत गेले. मला आजही तमिळभाषेचा बिलकुल गंध नाही. काही अक्षरे सरावाने कळतात इतकेच. विविध महर्षींच्या नाडीग्रंथांतून मिळालेल्या प्रेरणेने मी ते करत राहिलो. नाडी भविष्य पहायला जा असा मी प्रचार करायला हे लेखन करत नव्हतो व आता ही नाही. कारण ज्यांच्यासाठी ते लिहिले गेलेले आहे ते योग्य वेळ येताच जातील व काहींना अनेकदा जाऊनही ते पहायसाठी विलंब लागेल. आपल्या प्राचीन ग्रंथातून ओळख होणाऱ्या वसिष्ठ, भृगू, कौशिक, अत्री आणि आपल्याला अज्ञात अनेक महर्षींनी ते ग्रंथ ताडपत्रावर तामिळ कूट लिपीतून लिहून ठेवले आहेत त्याची निदान आपणा भारतीयांना माहिती असावी हा या मागचा उद्देश आहे.
पण साधारणपणे अशा धाग्यांवर चमत्कार आदि शब्द आले की लगेच परस्पर विरोधी विचारांच्या लोकांच्या प्रतिसादातून कळत- नकळत नाडी ग्रंथांची निंदा व हेटाळणी घडते. ज्याला जे मत मान्य होते ते त्याने जरूर बनवावे. पण ज्याचा काहीही अनुभव घेतलेला नाही किंवा माहिती नाही त्याची अभ्यास न करताच संभावना करू नये अशी नम्र विनंती.
खालील फोटो हा प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. यात माझ्या नावाचा उल्लेख दोन वेगवेगळ्या नाडी पट्टीत पहाण्यात आला असून त्यात कमीत कमी ४ वर्षांचे अंतर आहे. या नाडी ग्रंथांच्या ताडपट्ट्या माझ्या नाडी कथनासाठीच्या नाहीत. माझ्या नावाचा उल्लेख हा अनुषंगाने आलेला आहे. फोटोतील वरच्या बाजूच्या पट्टीतील नाव हा अपवाद मानला पाहिजे. कारण साधारणपणे व्यक्तिच्या पट्टीत त्याचे, त्याच्या आई-वडिलांचे व विवाहित असेल तर जोडीदाराचे अशी चार नावे नोंदलेली आढळतात. मात्र या नाडीपट्टीत ज्यांची ती ताडपट्टी आहे त्यांच्या शिवाय हे भविष्य कथन होताना त्यांच्या बरोबर शशिकांत नावाची एक व्यक्ती असेल असा उल्लेख आहे. (ताडपट्टीत केलेले कूट लिपीतील लेखन केंद्रातील वाचक एका वहीत उतरवून देतात. त्याचे निरीक्षण केले तर ते श्लोकबद्ध असल्याचे जाणवते. त्यातील ओळी वाचून त्याचा अर्थ ग्राहकाला सांगून त्याची टेप किंवा आजकाल सीडी करून दिली जाते.) नंतर आम्ही त्या नाडीपट्टीचे फोटो घेतले व त्यातील माझ्या नावाच्या भागाचा फोटो हा आहे. त्या खालील दुसरा फोटो हा एका अन्य व्यक्तिच्या ताडपट्टीतील माझ्या नावाच्या उल्लेखाचा आहे.
वरील फोटो अनेक तमिल जाणकारांनी पाहिले पण त्यांना त्यातील नावांचा उल्लेख नीटपणे समजून न आल्याने काही समजत नाही असा निष्कर्ष काढून खाली ठेवला. नंतर यातील लिपीची फोड करून दाखवली की त्यातून नाव कसे लिहिले गेले आहे याचे विवेचन करून देणारे स्पष्टीकरण दिले की 'ओहो असे आहे होय! आता कळले' असे सर्वसामान्य तमिळ जाणकार लोक म्हणतात असा अनुभव येतो. असो.
मी मायबोलीवरील सदस्य मित्रांना अशी विनंती करतो त्यांचे कोणी तमिळ जाणकार मित्र असतील तर त्यांनी वरील फोटो त्यांना सादर करून त्यांचे मत विचारावे व काय म्हणाले ते सादर करावे. समजा त्यांना नाही कळले तर स्पष्टीकरण असलेला तक्ता नंतर सादर करीन.
हा फोटो प्रतिसादासाठी सादर केला आहे. ज्यांना नाडीग्रंथांची अधिक माहिती हवी असेल त्यांनी इथे ती वाचावी. ही आवृत्ती 4थी आहे. त्यानंतर पाचवी - वाढीव माहितीची - आवृत्ती सध्या बुक गंगावर उपलब्ध आहे.
आपली प्रतिक्रिया तेथील फलकावर जरूर लिहावी.

IMG_204484914822682.jpeg

नाडी पट्टी तो व्यक्तींचे नाव कोरून लिहिलेले असते तर पुरावा द्या असा पुकारा केला जातो. पुरावा सादर केला की त्या वर काही प्रतिक्रिया मात्र येताना दिसत नाहीत. कारण
पुरावा मान्य करावा तर नाड़ी ग्रंथ थोतांड म्हणून संभावना केली ते अयोग्य होते असे म्हणावे लागते. मात्र ते टाळायला मौनं सर्वार्थ साधनम असा पर्याय सोपा पडतो असे अनुभवावरून वाटते.

<नावडत्याने किति ही खरं लिहिल तरी त्याला ठोकून काढायचे,>

आज 3 महिने झाले... नाडीग्रंथाना नावे ठेवणारे, लोक नाडीग्रंथाच्या पट्टीचा पुरावा दिला की गप्प बसतात याचा आणखी एक पुरावा...

तिकडे एके ठिकाणी एका महाशयांनी नाडीपट्टीचा फोटो टाका, आत्ता चुटकी सरशी त्यात काय लिहिलेले असते याचा भांडा फोड करतो म्हणून लीलया टंकून फुशारले होते आता सहा महिने झाले अजूनही त्यांना व त्यांच्या मित्रांना तमिळ लेखनाचा पत्ता लागलेला दिसत नाही असे दिसते आहे.
बनाव दिसतोय अशी आणखी एका ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करताना फोटो टाकायची सोय नाही म्हणून वहीतील श्लोक सादर केले गेले. त्यामधील मजकुराबाबत न लिहिता हा सगळा बनाव असावा असा संशय व्यक्त करुन गप्प झाले गेले आहे.असो.
वर म्हटल्याप्रमाणे काहींना नाडी ग्रंथ नावाचा धसका इतका बसलाय की पुरावा तपासायची वेळ आली की ....