चांदणरातीचं हितगुज

Submitted by चिमुरी on 9 March, 2012 - 05:15

तिला आवडतो तो
तिच्या कलेकलेने वागणारा
दुरुनच तिला भक्कम आधार देणारा
एखाद्या दिवशी तिला तिची हक्काची स्पेस देणारा
आणि तरिही सदैव सोबत असणारा
चांदण्यांच्या गराड्यात राहुनही
तिच्यात स्वतःचंच प्रतिबिंब शोधणारा

त्याला आवडतात त्या
एकच नाही, तर सगळ्याच
भावतं त्याला प्रत्येकीतलं वेगळेपण
त्यांचं एकत्र राहुन आभाळ उजळवुन टाकणं
तो जवळपास असला तरी त्याच्या मागेपुढे न करणं
लुकलुकत का होइना स्वतःचं अस्तित्व जपणं
कुठलाही मोठेपणा न मिरवता दुसर्‍याला मोठेपण देणं
त्याच्या दररोज बदलत्या रुपाला आपलं कोंदण घालणं
त्याला हवं तेव्हा त्याची स्पेस देणं
अन कधीतरी एखादीचं नकळत विझुन जाणं

पण चंद्र आणि चांदण्यांना माहितच नसतं की,
दुर कोठेतरी कोणीतरी त्यांचा हेवा करतयं...
आपल्याच तालात ते आभाळात मिरवत राहतात....
आणि त्यांचा मत्सर करत, त्यांच्यावर प्रेम करत,
रात्रीच्या निरभ्र आभाळासारखंच असावं म्हणुन,
आयुष्य लखलखवण्याच्या प्रयत्नात असतात, तो आणि ती

गुलमोहर: 

निंबुडा, रिलेट वगैरे काही नाहिये गं.. शेवटंच कडवं थोडं बिघडलंच आहे.. बरेच प्रयत्न केले पण जमलं नाही.. परत एकदा प्रयत्न करुन बघेन... धन्स Happy

मस्तच Happy