अजून एक बटवा

Submitted by अवल on 5 March, 2012 - 03:31

आज माझ्या भाचे सुनेचा कथ्थक नाचाचा कार्यक्रम आहे. तिला शाब्बासकी म्हणुन हा बटवा तिच्यासाठी केला.

DSC_0058 copy.jpgDSC_0060 copy.jpg

गुलमोहर: 

अगं कॉपी-पेस्ट कर आणि प्रिंट काढ ना... हाकानाका>>>>अग मला वाटलच होत, हे कोणीतरी सांगणार म्हणून Happy
अवल सॉरी इतक्या अवांतर प्रतिसादाबद्दल डोळा मारा>>>>अग काळजी करू नको. अवल चांगली आहे हो. Wink

शोभा Happy अजून सख्खी यायला खुप अवकाश आहे हो.
अन तू आधी चांगली म्हटल्या नंतर हा प्रतिसाद दिलास तेव्हा बटवा कॅन्स्ल ( धर्मेन्द्र स्टाईल "मरना कॅन्स्ल " ) Wink

अन तू आधी चांगली म्हटल्या नंतर हा प्रतिसाद दिलास तेव्हा बटवा कॅन्स्ल ( धर्मेन्द्र स्टाईल "मरना कॅन्स्ल " ) डोळा मारा>>>>थांब. थांब. थांब. प्रतिसाद एडीट करते. Uhoh Lol

सख्ख्या नाहीत<<<<<<सख्ख्या सुनबाईला ती उरलेल्या कापडाचा बटवा करुन देइल असं वाटलंच कसं तुला? Proud

काय काय करतेस ग तू? भारी!
तुला जपानी रुमालांचे बटवे शिकविन. (का येतात ऑलरेडी? Happy )

मस्त झालाय बटवा Happy
बटव्यावरती जरतारीचा........मोर नाचरा हवा........ गं अव्वल मला.......... बनवून दे बटवा नवा Wink

सुंदर रंग आणि मस्त बटवा.

बटव्याच्या नाडीच्या टोकांना बंद करून घुंगरू लावून देणार का? Happy

अवल, एकदम मस्त, रंग तर सुरेखच! बॉर्डरच्या वरच्या भागाला चुन्या घ्यायलाच पाहिजेत का?

.

.

अवल, छान आहे बटवा Happy ते चुण्यांचं माझ्याही मनात आलं. बेस केला असेल तर बेसला जोडल्या जाणार्‍या वरच्या भागाला चुण्या घालतात.

अवले.... तु माझी 'सासु' नसलीस तरी मला अगदी अस्साच बटवा हवा!!!
सुंदर गं!अगदी पेशवीण बाईचा असावा असा वाटतोय!
आणि त्यावरचे मोर काय सही दिसतायत! Happy

विद्याक, अश्विनी, नाही बेस नाहीये. खरं तर आयताकारच आहे. त्याला गोलवा यावा म्हणून पुढच्या भागाला लहान आकारातला काठ जोडला अन आतून अगदी लहान प्लेटच घातल्या. पहिल्या फोटोत दिसताहेत बघ.
आर्या Happy
धन्यवाद सर्वांना !

अजूनही कसले कसले बटवे करत असशील तर दाखव. जुन्या विरु लागलेल्या साड्यांचे जरीचे पदर वगैरे वापरुन सुंदर बटवे करता येतील.

परवा ऊल्हासजींनी विचारले होते, तेव्हा थोडे बोलणे झाले होते. जुन्या साड्यांचे असे बेडस्प्रेड छान करता येते. हे पहा एक मी केले होते.

sari_1.jpg

व्वा अवल, ही आयडिया सोप्पी तरीही भारी वाटली.
काठ, पदर मधल्या भागातसुद्धा जोडल्यामुळे शोभिवंत दिसतंय.
सौं.नादेखील आयडिया आवडली. आता बघुया, कल्पना कधी कृतीत येतेय ते.... Happy

Pages