धाकल्या राजाची आठवण- काशीनाथ घाणेकर स्म्रुती दिन

Submitted by मोहन की मीरा on 2 March, 2012 - 05:29

आज काशीनाथ घाणेकरांची पुण्यतिथी.
काशीनाथ घाणेकर म्हंटलं की आठवतात संभाजी राजे. डेक्कन वरील संभाजी राज्यां चा पुतळा बनवताना डॉ. घाणेकरांचा फोटो समोर ठेवला होता, अशी अख्यायीका आहे.

अतिशय उत्कट, कधी कधी लाऊड वाटणारा अभीनय, प्रंचंड इन्टेन्सीटी, दाहक नजर, रुबाबदार व्यक्तिमत्व असे घाणेकर. लोकांनी खुप प्रेम केलेला कलाकार. खुप टाळ्या घेतलेला नट. गॅलरी साठी अभिनय करणारा कलाकार. अप्रतिम स्वगतांचा मालक. त्याच्या भुमिका त्याच्या होत्या. त्या इतरांनी करायच धाडस केलं नाही. ज्यांनी केलं त्यांना प्रेक्षकांनी स्वीकारलं नाही. या सम हा.

पुढे रंगायन वगैरे चळवळीत मागे पडलेला नट. म्रुत्यु आलाच तर तो काम करता करता येवुदे, ही त्याची इच्छा देवाने पुर्ण केली. जे काही केलं ते मनस्वी पणे केलं. अभिनय, मैत्री, प्रेम, द्वेश... सगळंच मनस्वी पणे. एक वादळच जणु. सगळंच उत्कट. अभ्यास केला तो ही उत्कट. सहजतेने गोल्ड मेडल मिळालेला दंतशल्यविशारद.

त्यांच्या पत्नी कांचन घाणेकर अशा वादळा बरोबर जगल्या. त्यांच्या पती वरील चरित्रात त्यांनी पतीचे गुण, दोष, कच्चे दुवे सगळं फार प्रामाणीक पणे मांडले आहेत.

आजही त्यांच्या भुमिका लोकांच्या मनात आहेत.
"आणि......डॉ. काशीनाथ घाणेकर.." ह्या शब्दांनी प्रेक्षकात उमटलेल्या आनंद लहरी आजही सगळ्यांच्या लक्षात आहे.

त्यांच्या जर काही आठवणी, भल्या बुर्‍या...कशाही , जर तुमच्या कडे असतिल, तर इकडे शेअर कराव्यात. तेवढीच आपली त्यांची आठवण.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मी त्यांची काही नाटके बघितलीत.
गुंतता हृदय हे (सोबत आशा काळे, आशालता )
आनंदी गोपाळ ( सोबत सुहास जोशी )
गारंबीचा बापू ( सोबत उषाकिरण )
अंधार माझा सोबती ( सोबत फैयाझ - हे नाटक वेट अनटील डार्क वर आधारीत होते. )
संभाजीच्या भुमिकेत मात्र नाही बघितले. स्टेजवर प्रभावी ठरणारा हा अभिनेता,
चित्रपटात मात्र शोभला नाही.
स्टेजवरचा अभिनय बराचसा आक्रस्ताळी, मेलोड्रामाटीक असायचा. पण त्या काळात
तो चालून जायचा. शिवाय अफाट लोकप्रियता होतीच. (माझ्या आजोळी त्या अफाट माणसाचे बरेच किस्से सांगितले जात. आजीचा मित्र होता तो.)

वरचे कुठलेच नाटक, बाकि कुठल्याच अभिनेत्याने केले नाही, यातच घाणेकरांचा
करिष्मा दिसतो. (नाही म्हणायला गारंबीच्या बापूचा रोल, किरण भोगले करणार,
अशी जाहिरात वाचली होती. पण ते बहुतेक नाही घडले.)

आजच सकाळी - रात्रीस खेळ चाले हा खेळ सावल्यांचा ..... हे गाण कानावर आल आणि आठवली ती
प्रंचंड इन्टेन्सीटी आणि ह्रुदयाचा ठाव घेणारी दाहक नजर .......

आणि हा लेख पाहीला, माझ्या कडे आठवणी काहीच नाहीत पण हा योगायोग मात्र लिहावासा वाटला. Happy

स्मॄतीस अभिवादन

खरे आहे... चित्रपटां मध्ये त्यांचा करिश्मा चालला नाही. पण तरीही "मधुचंद्र", "एकटी", "मराठा तितुका मेळवावा"आणि "पाठलाग" मध्ये त्यांचा वावर खुपच छान होता.

मला घेवुन माझ्या आई बाबांनी त्यांची खुप नाटके पाहिली. मला "गुंतता ह्रदय हे" आणि "आनंदी गोपाळ" आठवते आहे.

नंतर सातार्‍याच्या एका हॉटेल मध्ये तर्र अवस्थेत त्यांना पाहिले होते. ते रुप मनावर ओरखडा उठवुन गेले.

पण त्यांच्या बद्दल एक जबरदस्त आकर्षण मात्र वाटत राहिले.

'मधु इथे अन चंद्र तिथे.... झुरती अंधारात
झुरती अंधारात ...... अजब ही मधुचंद्राची रात"
लहानपणी, दूरदर्शनवरती हा सिनेमा पाहीलेला होता. आणि काशीनाथ घाणेकर दिसायला एकदम आवडलेले होते.

माझ्या आईचा अतिशय आवडता अभिनेता...आई मितभाषी होती पण कधी त्यांचा विषय निघाला तर भरभरून बोलायची..तिने बरीच नाटक पाहिली होती त्यांची....