नवीन मिडीया

Submitted by चाऊ on 16 February, 2012 - 10:25

फ्लोपी आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांचा उपयोग टि कोस्टर म्हणून केला तर?

_MG_5280.jpg_MG_5281.jpg_MG_5282.jpg_MG_5283.jpg

गुलमोहर: 

ग्रॅज्युएट स्टुडंट असतानाचे दिवस.... प्लॉपी तेव्हा इतिहासजमा नसतानाही, आमचे काही मित्र तेव्हाही कामाच्या फ्लॉपीचा उपयोग टी-कोस्टर म्हणूनच करायचे ते आठवलं Happy
कालांतरानं प्लॉपी जाऊन त्याजागी सीडी आल्या, टी-कोस्टर म्हणून !!! Happy

मस्त.
माझाही तोच प्रश्न की रंग कोणते वापरले?

बादवे, फ्लॉपींपेक्षा गेलेल्या सिडींचे कोस्टर जास्त छान दिसते आणि स्टेबल रहाते. Happy

रंग बहूतेक अ‍ॅक्रॅलिक (आर्टिस्ट क्वालिटीवाले) वाटताहेत मला. ब्रशचे /बोटांचे स्ट्रोक जाड आहेत त्यामूळे ऑइल कलर्स वापरले तर त्या फ्लॉप्या वाळायला कितीतरी दिवस लागतिल ना?
छान रंगसंगती आणि डिझाइन. पण नी म्हणतेय त्याप्रमाणे सीडी वापरून अजून छान आणि स्टेबल बनतिल टी-कोस्टर्स.

@अल्पना>>अ‍ॅक्रॅलिक (आर्टिस्ट क्वालिटीवाले)<<
अगदी बरोबर.
आणि, ब्रशनेच रंगवलेय.
सीडी वर हि प्रयोग करुया म्हणतोय!
सर्वांना मनापासून धन्यवाद !

चाऊ, मी पूर्वी साधे स्टुडंट ग्रेडचेच अ‍ॅक्रॅलिक कलर्स आणायचे छोटं-मोठं काही रंगवायला म्हणून. गेल्या वेळी एक कॅनव्हास घेतला आणि त्यावर रंगवायला स्टुडंट अ‍ॅक्रॅलिक शिवाय काही आहे का विचारल्यावर मला आर्टिस्ट ग्रेडचे रंग मिळाले. इतके छान व्हायब्रंट कलर्स असतात ते. तुमच्या प्लॉप्या पण तश्याच व्हायब्रंट दिसत आहेत म्हणून ओळखू शकले. Happy