----------------------------------------------------------------------------------------
गटचर्चा = ग्रूप डिस्कशन
गटघटक(गघक) = पार्टीसिपंट्स
------------------------------------------------------------------------------------------
चर्चेचे नियम (गटघटक घटना)
१) प्रत्येक गघकाने आपला मुद्दा एकाच शेरात सांगायचाय . संधी एकदाच मिळेल.
२) शेर स्वत्तःची गुणवैशिष्टे, नाम / तखल्लुस , व्यवसाय,स्वानुभव यास साजेसा असावा.
३) चर्चेअंती अक्खी गझल पूर्ण झालीच पाहिजे
४) माबोवरील काही परमप्रीय गझलकारांस त्यासाठी मुद्दामच गटपास दिले आहेत. तत्पूर्वी गघक क्र .१ ते ५ यांची पूर्वपरवानगी घेतली आहे, नियम १ ते ३ यांचे पालन केले आहे ,तरी गटपासधारक मिळालेल्या पासांचा मोठ्या दिलाने ( ते त्यांच्याकडे आहेच ) स्वीकार करतील अशी खात्रीच आहे मुळी
५) इतराना प्रवेश हवा असल्यास हार्दिक स्वागत , फक्त शीर्षकास अनुरूप असे स्वतःचे काफिये (अप्पान्त) सोबत आणावेत. नियम १ ते ३ आणि ५ काटेकोरपणे पाळणे बंधनकारक.
--------------------------------------------------------------------------------------------
चर्चा सुरू -
(गघक क्र. १= कु नेहमिका रिकामटेकडे )
परवाच संस्कृतीच्या भरवू दुपारगप्पा
ठरवू तिलाच मोहें-जोदरो हडप्पा
(गघक क्र. २= सदा एकलकोंडे )
गेलीय कोणत्याशा किटिपारटीत मम्मी
भलत्याच टूरवरती गेलाय काल पप्पा
(गघक क्र. ३ = कु. कलिका उतावळे :एक स्वानुभव)
ना एकवीस-अठरा ; तारुण्य हाक देई-
-पौगंड 'पाक' होई, तो वेगळाच टप्पा
(गघक क्र. ४ = रडतकुमार राउत)
इथले भविष्य आता विरले अरासपानी
उरले कठोर कोटा तांडूर अन् कडप्पा
(गघक क्र. ५ = कवींद्र कवाडे )
काव्यात गोठवुन घ्या त्या कोवळ्या फुलांना
नाचून घ्या सुरांनो तो भांगडा -हिडिप्पा
गटपासधारक विभाग --------------------------------------------
(गपाधा क्र.१ =बेफिकीर )
माबोस भूषणावह तो कटककर कशाला
मारून घेत आहे 'मी बेफिकीर' ठप्पा
(गपाधा क्र.२ = कणखर )
कणखर उगाच ना त्यां दिनकरसुतास म्हणती
कणखर अशाच गझला करतात हो विदिप्पा
(गपाधा क्र.३ = टोकूरिका )
निःशंक अम्ची टोकू नित साईना ठरावी
इतरेण गुट्ट ज्वाला अन् आश्विनी पुनप्पा
(गपाधा क्र.४= सौ'प्रिया')
बे-नेमके तखल्लुस नाजूक (सॉरी सॉरी -साजूक) से प्रिया ते
काव्यात भेळ ओली गझलेत गोलगप्पा
(भेळ ,गोलगप्पा... तोंडाला पाणी सुटतंय ना ? प्रियातैच्या रचनांचे रसग्रहण करताना आमचं अगदी असंच होतं)
(गपाधा क्र.५ = डॉक. कैलास )
कानात डिंगरी(स्टेथेस्कोप) अन् ओठी गझल झुलावी
डॉक्टर तुझा असावा ऐसाच देवबाप्पा
(गपाधा क्र.६ = ह.बा. शिंदे )
फुकटात ना ह. बा. रे गटपास हा तुला रे
दे विठ्ठलास माझ्या ; हृदयात एक कप्पा
( चर्चा समाप्त सामुदाईक अफसोस )
ड्याश्ड्याश अय्यो अप्पा टिम्ब्टिम्ब अय्यो अप्पा
ड्याश्ड्याश अय्योअप्पा टिम्ब्टिम्ब अय्योअप्पा
>>> वा मास्तुरे, यमक
>>> वा मास्तुरे, यमक आणलत
उपकृत आम्ही तुमचे, कटक्कर आप्पा,
असेच प्रोत्साहन द्यावे, आम्हा तुम्ही बाप्पा
वैवकु मारिती आम्हा, फटके सप्पा सप्पा
काव्य ना जमे म्हणून, त्यांची मर्जी खप्पा
मास्तुरे: नियम क्रमांक १) चे
मास्तुरे: नियम क्रमांक १) चे पालन कारा
तुम्हाला प्रवेश मिळाला आहे आता नवीन मुद्दा मांडायची गरज नाही तरी असो ........तुम्ही अनावधानाने(?) काही नवीन काफिये सुचवले आहेत त्यांचा योग्य तो वापर योग्य वेळी केला जाईल
सुचवल्याबद्दल धन्यवाद
केलेत शेर सांचे, खाऊन
केलेत शेर सांचे, खाऊन गोलगप्पा
टोकूस ठाव नाही, ही संस्कृती हिडीप्पा>>>>इति टोकूरिका............ व्वा!!
टोकूच्या प्रतिसादावरून;आम्ही तिला साईना आणि इतराना ज्वाला/अश्विनी का म्हटले ते समजले का माय्बोलीकारानो ?
गंध ना आम्हा वॄत्त-छंदांचा ना
गंध ना आम्हा वॄत्त-छंदांचा
ना मारीतो आम्ही गझल गप्पा
चप्पा चप्पा चरखा चले
चरखा चले चप्पा चप्पा
हे घ्याच.

वैवकु साईना मीन्स
वैवकु साईना मीन्स व्हॉट???

अभ्यास फार झाला, चर्चेत अय्यो अय्यप्पा
ताणून द्याच आता, मारू थोड्या गप्पा
टोकू म्याडम : साईना नेहवाल
टोकू म्याडम : साईना नेहवाल ,ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनाप्पा या तीघी अनुक्रमे १-२-३ नंबर च्या ब्याडमिंटनपटू आहेत भारताच्या .............ज्वाला /अश्विनी चा नंबर बदलतो पण साईना नेहमीच १ नंबर असते
मस्तं चाललयं
Pages