मायबोलीकर गटगः जिप्सीचे फोटो प्रदर्शन - ठाणे कलादालन

Submitted by भुंगा on 10 January, 2012 - 03:35

जाऊ की नको जाऊ की नको.... या विचारात ५.४५ ला गाडीत बसलो आणि थेट निघालो ठाण्याकडे. वाटेत पंत (प्रसाद गोडबोले) आणि त्याचा रूममेट प्रथमेश यांना आयाअयटीच्या जवळ गाडीत कोंबलं....

आज फॉर अ चेंज, पंत भयंकरच सभ्य पोषाखात आला होता..... डोक्याचा पार गझनी केला होता त्याने... त्यावर थोडे थोडे काळे तण उगवलेले होते. प्रथमेशची मिशी एकदा बघाच म्हणजे "मुच्छे हो तो नथुलाल जैसी" पार विसरून जाल ..!!
मजल दरमजल करीत टोल भरत गाडी थेट कलादालनापाशी पोचली... तिथे पोचताना आधी बिग बाझार, मग मारुती मंदीर आणि मग कलादालन अशी शोधमोहिम पार पडली.... या शोधमोहिमेत रस्त्यावरच्या समस्त भैयांनी मदत केल्याने त्यांचे मनःपूर्वक आभार..... म्हणून म्हणतो, त्या पुण्यात शे पाचशे भैय्ये पाठवा रे पाठवा Proud निदान पत्ते तरी अचूक शोधता येतील.

गाडी पार्क करेपर्यंत कोल्हापूरपासून सातार्‍यापर्यंत भैय्यांची पिलावळ कशी वाढलिये आणि कसा उपद्रव आहे हे एका पिसाळलेल्या मराठी माणसाचे मनोगत पंतांनी ऐकवले. पण पुण्यात मात्र त्यांना अजून थारा नाही याबद्दल पुणेकरांचे खास कौतूकही करण्यात आले. "अरे पुण्यात उर्वरित महाराष्ट्रातल्यांना थारा नाही तर भैय्यांचं काय घेऊन बसलास" असा टोला पंतांनी हाणलाच.

नेहमीच मागल्या दाराने आत शिरणार्‍या मी आणि पंत यांनी यावेळी फॉर अ चेंज मुख्य प्रवेशदारातून आत शिरत एकमेकांना एक सुखद धक्का दिला. इतक्यात समोर इंद्राचं दर्शन झालं....... हा माणूस झोपताना तरी पाठीवरची सॅक काढून झोपतो का, असा एक खाजगी प्रश्न मी याच्या घरच्यांना विचारणार आहे.

पायर्‍या चढत पहिल्या माळ्यावर पोचल्यावर आधी मायबोलीकरांकडे पाहावं की आधी फोटो अश्या विचारात छापा - काटा करत असताना हसतमुख जिप्सी (योगेश जगताप) आपल्या गळ्यात लटकवलेल्या बायकोसोबत (बायकोचं नाव "कॅनन" आहे हो) समोरच आला. त्याची गळाभेट घेतल्यावर आम्ही फोटो बघायला सुरुवात केली.

मायबोलीकरांचा घोळका हजर होताच. त्यात बरेच वरिष्ठ मायबोली आयडी हजर होते..... काश्मीरमधली सफरचंदं आपल्या मुंबईच्या मॉलमध्ये सुध्दा जितकी लालचुटुक टवटवीत दिसतात तसे दिसणारे दिनेशदा, मंजूडी, ललिताप्रीती, प्रंचड सात्विक मनोवृत्तीच्या अश्वीनी के, सेनापती, रोहित एक मावळा, प्रणव कवळे, मोनाली पी आणि तिचे अहो मंदार, निल्या, नीलवेद (सपत्निक) असे सगळेच हजर होते.

एक से एक चित्रांचा आस्वाद घेत आम्ही पुढे पुढे जात होतो. मुख्य म्हणजे सर्वात मोठा बोर्ड जिप्सीसाच असावा आणि तो अगदी सुरुवातीलाच होता हे विशेष. जिप्सीची चित्रं ही जास्त उजवी होती यात शंकाच नाही. हे म्हणजे "आपला तो बंडू आणि दुसर्‍याचा विटीदांडू" असं नाही हां..... जिप्सीचे आपण पूर्वी पाहिलेले फोटो होते पण तिथे खरेच उठून दिसत होते.... इतरही तरूण फोटोग्राफर्सचं कौतुक, काही फोटोज खरेच अप्रतिम होते.

नेहमीप्रमाणेच सार्वजनिक ठिकाणी फिरताना पंतांचे "एक सुंदर चेहरा दाखवा आणि १००० रुपये कमवा" हे घोषवाक्य सोबतीला होतंच.

आता फोटो पाहून झाल्यावर आम्ही आमचा मोर्चा मायबोली घोळक्याकडे वळवला. मंजूडी, ललिताप्रीती, अश्विनी के यांना साधारण दीड इंच लांबीचं स्माईल दिल्यावर अनुक्रमे त्यांनी अर्धा, पाऊण आणि एक इंच लांबीचं स्माईल प्रतिसाद म्हणून दिलं. दिनेशदांनी हाय भुंगा करत हस्तांदोलन केलं...... दिनेशदा फारच मृदूभाषी व्यक्तिमत्व आहे हे जाणवलं..... या सर्व धबडग्यात पंत उगाचंच भेदरलेल्या कोकरासारखा वावरत होता...... ते बहुधा त्याचं नाटकच असावं.... अन्यथा पंत आणि भेदरणे याचा सुतराम संबंध नाही.

ओळखा मी कोण?? अश्या आविर्भावात एक हँडसम व्यक्तिमत्व समोर आलं..... दुसर्‍या गेसमध्ये तो सेनापती उर्फ रोहन असल्याचं लक्षात आलं...... शेजारून जाणारी एक तरुणी "अरे हा, हे बंध रेशमाचे मधल्या अक्षर कोठारी सारखा दिसतो ना... सो क्यूट" असं कुजबूजून पुढे गेली.. Proud
पण उद्या फिल्मफेअरच्या धर्तीवर एखादा मायबोली पुरस्कार सोहळा करायचा ठरला तर सेनापतीला सुत्रसंचालन करायला हरकत नाही..... आवाजही भारदस्त आहे. .....!!!!

मी मुळात चित्रप्रदर्शनापेक्षाही "मामी" या आयडीला भेटायला एवढी "टायरपीट" करत करत गोरेगावहून ठाण्यात आलो होतो..... ती कुठेच दिसेना..... मग ओळख मी कोण असा पुन्हा प्रश्न विचारला एका लालचुटूक पोषाखातल्या आयडीने....... ललिताप्रीती यांनी ही "लालू" असं म्हटल्याने मी पुरता गोंधळलो. त्यावर "काय रे, माझ्या वर लेख लिहितोस आणि मलाच नाही ओळखत" असा प्रतिप्रश्न. झालं मी पुरता बॅकफूटवर...... लालू आयडीला कधी पाहिलेलं नाही आणि मी काय लिहिणार त्याच्यावर????
माझी दया येऊन त्या आयडीने "अरे २४ खून माफ लिहिलंस ना माझ्यावर" असं म्हटल्यावर हीच ती जिच्यासाठी मी इतके किमी टायरपीट केली....... द वन अँड ऑन्ली "मामी" हे लक्षात आलं.
श्या..... मी बिस्किटचा पुडा कसा विसरलो राव....... बिस्किटे कशी खावीत त्याचं प्रात्यक्षिकच घेतलं असतं लगे हाथ Proud

मायबोलीकरांचा अत्य्युच्च डेसीबलचा आवाज आणि येण्याजाण्याची वाट मावशीबाईसारखी अडवून ठेवायची पद्धत बघता रानवाटाचे "स्वप्नील पवार" स्वतः भेटायला आले...... काही फोटो काढून मग आता निघा असा अनुल्लेखित निरोप त्यांनी दिला असावा बहुधा...... Wink
लगेच जिप्सी आपण वरच्या काँफरन्स रूममध्ये बसूया असं सांगून बाहेर घेऊन आला आणि बाहेर आल्यावर अरे काँफरन्स रूम फूल आहे बहुतेक असे म्हणून आम्हाला सोडून पुन्हा आत शिरला..... किती तो समंजसपणा...!!!!
आपल्या नावाला जागत मायबोलीकर तिथेही गप्पांचा फड जमवून घोळक्याने होते..... मग दिनेशदांनी फ्लेवर्ड चॉकलेट्स आणि "माकडबिया" (हे कसले तरी नॉन्-ऑर्गॅनिक नट्स होते, ज्याला आम्ही माकडबिया म्हणत होतो) खायला घातल्या...... शेवटी शेवटी तर पाकीट संपावं म्हणून जिप्सी "घ्या रे घरच्या झाडाचे आहेत" अश्या आविर्भावात मुठी मुठीने त्या बिया वाटत होता.

आता ज्याने ह्या गटगचा धागा काढला तो या धाग्याचा नायक "आनंदयात्री" (नचिकेत जोशी) अजून ७.१५ झाले तरी बीकेसी मध्येच होता. त्याला लवकरात लवकर कसे यायचे ह्या इंस्ट्रक्शन्स देऊन आम्ही पुन्हा गप्पात रंगलो. आता कुणीतरी चहाची टूम काढली..... आणि सगळा घोळका खाली उतरला.

महिला आयडी तिथेच थांबले आणि इतर आयडी रस्ता क्रॉस करून चहा प्यायला म्हणून निघाले ते थेट मधूबन बार समोरच....... पंत यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकत हे नक्की कुठे निघालेत..... असा प्रश्न केला इतक्यात कोपर्‍यातली चहाची टपरी दिसल्याने आमचा जीव कपात पडला. पेल्यात पडण्याची ती वेळच नव्हती मुळी Wink

एक कटिंग राऊंड होईस्तोवर साक्षात "घारुअण्णा" हजर झाले...... ते सपत्निक बिग बाजार फिरून मग सौ. ना रिक्षेत बसवून आले होते..... थोडक्यात आता मोकाट होते.

दोन राऊंड चहाचे झाल्यावर सगळे पुन्हा एकदा कलादालनाकडे निघालो. मधेच बागेश्री आणि नचिकेत यांचे आम्ही पोचतोच असे निरोप आलेले होते. कलादालनाच्या आत पोचेपर्यंत एक शिडशिडीत अंगकाठीचा आयडी आम्हाला क्रॉस करून आमची दखलही न घेता एखाद्या टिटवीसारखा तुरूतुरू चालत मागल्या दाराने थेट दालनात शिरला..... एव्हाना मुख्य द्वार बंद झालेले होते, आणि आतले दिवेही बंद झाले तर मग जिप्सीला शोधायचे तरी कसे असा एक प्रश्न नचिकेतला पडला असावा.
सत्यनारायणाच्या पूजेला आल्यावर आधी सत्यनारायणाचे दर्शन घ्यायचे हा खाक्या असावा नचिकेतचा..... आल्या आल्या आधी सर्व फोटोज त्याने पाहिले आणि मग घोळक्यात घुसला.

नचिकेत गेटच्या आत शिरतानाच पार्किंग लॉटमध्ये श्री व सौ बागेश्री आपल्या गाडीतून उतरत होते...... हे म्हणजे एकमेकांच्या साहित्यावर एकामागोमाग प्रतिसाद देण्यासारखा प्रकार झाला Proud

पंतांच्या शंकांना आता पुन्हा ऊत आला...... अरे ही बागेश्री आहे???? फेसबूकवर कसली काकूबाई दिसते ही......!!!! प्रत्यक्षात एकदम शाळकरी मुलगी आहे रे Biggrin
"तिच्या अहोंना हे कळलं तर तिला खरेच एखाद्या ईंटरनॅशनल स्कूलमध्ये अ‍ॅडमिशन करून देतील तिची." माझी टिप्पणी.

तेवढ्यात धापा टाकत बागुलबुवा आला. त्याला या कार्यक्रमाची कल्पनाच नव्हती आणि अशी काडी मंजूडी यांनी त्याला भेटल्यावर टाकली होती..... पण तरीही शेवटच्या क्षणी तो आला, हे विशेष...... हीच तर खरी मैत्री ना दोस्त......!!!!

साधारण रानवाटा वाल्यांना आमचा कंटाळा येईपर्यंत आणि शुक शुक करत सिक्युरिटी हाकलेपर्यंत आम्ही तिथे होतो.... मग हळूहळू सगळेच खाली उतरलो........ नाही म्हणायला पंतांच्या घोषवाक्यानुसार १००० रुपये देण्यासारखे एक दोन चेहरे कधी नव्हे ते दिसले. अर्थातच ते मायबोलीकर्स नव्हते Rofl

मामी ने खाली येऊन पार्किंग लॉटकडे पहात एक शिट्टी मारली आणि लगेच एक ड्रायव्हर गाडी (त्याला काकाकाकाकार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र असे म्हणतात)....... घेऊन समोर आला..... त्याने दरवाजा उघडला आणि खाली उतरून सात वेळा मामीला, स्वत:च्याच कमरेत वाकून कुर्निसात करत पुन्हा स्टिअरिंगचा ताबा घेतला.......

तिथेच एक जुना आयडी "बाँबे व्हायकिंग" हा ही भेटला.

आता मामीपाठोपाठ बागेश्री आणि तिचे यजमान, आणि मग मी, पंत आपापल्या गाड्या घेऊन सर्वांना बाय करत निघालो.

थोडक्या वेळात ठरवून बर्‍याच जणांना भेटून काही आनंदाचे क्षण टिपायला खरोखर अशी गटग व्हायलाच हवीत. आयडी पलिकडचा माणूस खराखुरा भेटतो ते अश्या गटगमधेच.

जिप्सी धन्यवाद रे अशी संधी दिल्याबद्दल........ तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा आहेतच रे.

असेच वेगवेगळ्या निमित्ताने भरपूर गटग होत राहोत आणि आमच्यासारख्यांना आनंद लुटायची आणि सर्वांना भेटायची संधी मिळत राहो.

बाकी, मामी...... तुस्सी ग्रेटच हो... Happy

तळटीप:

सेनापतीचे बखर आख्यान , रोहित मावळ्याने "भुंग्या, खूप धुमाकूळ घालत असतोस" असे काढलेले उद्गार...... घारुअण्णाने भर घोळक्यात तारस्वरात "भुंग्या, कॉफी हाऊस का काढलेस??" असे अडचणीत आणणारे विचारलेले प्रश्न वेळेअभावी आणि "सोयिस्कररित्या" गाळण्यात आलेले आहेत.

लोभ आहेच तो असाच वाढू द्यावा.

आपला
भुंगा.

गुलमोहर: 

एक सुंदर चेहरा दाखवा आणि १००० रुपये कमवा>>>>> Lol रुपये की प्रतिसाद? Lol (दिवा)

मंजूडी, ललिताप्रीती, अश्विनी के यांना साधारण दीड इंच लांबीचं स्माईल दिल्यावर अनुक्रमे त्यांनी अर्धा, पाऊण आणि एक इंच लांबीचं स्माईल प्रतिसाद म्हणून दिलं.>>>>>

तरी बरीच लांबी म्हणायची ही Rofl

छान वृत्तांत!

फोटो?

भुंग्या... फारच वाट बघायला लावलीस रे... Happy तुझ्यासोबत पंतांना भेटून मला खूपच आनंद झाला हे नक्की.. Happy
बर वृतांतात माझ्याबद्दल 'ती' मुलगीच नाही तर सर्वच काल्पनिक आहे... हाहाहा... Lol

रोहन, आता नोकरी सोडूनच दिलीस तरी चालेल. तुला इथेच मराठी मालिकांमध्ये कामं मिळणार असं दिसतंय Proud

भुंग्या, छान वृत्तांत Happy :एक इंची:

शेवटी शेवटी तर पाकीट संपावं म्हणून जिप्सी "घ्या रे घरच्या झाडाचे आहेत" अश्या आविर्भावात मुठी मुठीने त्या बिया वाटत होता.>>>>>>> Lol

हायला मस्तच लिहिलयेस रे....:)

बेफी, सेनापती, दक्षिणा, अनिताताई, टोकू, पजो,

आणि अनुक्रमे मंजूडी, ललिता प्रीती, अश्विनी (डावीकडून उजवीकडे) Proud

सर्वांचे मनापासून आभार.....!!!! Happy

एक कटिंग राऊंड होईस्तोवर साक्षात "घारुअण्णा" हजर झाले...... ते सपत्निक बिग बाजार फिरून मग सौ. ना रिक्षेत बसवून आले होते..... थोडक्यात आता मोकाट होते.>>> मी यावर प्रकाश टाकू का घारुअण्णा? Wink

मस्त.

रच्याकने मी त्या "घरच्या" झाडाच्या बीया मिसल्या Sad

पण एकुण गटग मस्त. नी हा वृत्तांतही.

Biggrin सह्हीच आहे.

अरेरे पंतांचं घोषवाक्य माहित असतं तर प्रत्येक मायबोलीकराने सेनापतीला त्यांच्यासमोर पाठवून प्रत्येकी १००० रू. मिळवले असते.

धन्यवाद हं भुंग्या. पण मी काय ग्रेटपणा केला रे? Happy

मामी, वाक्य एडिट करू का???? Biggrin

इथे अभावानेच एखादा मायबोलीकर दुसर्‍याबद्दल चांगलं बोलतो (निदान मायबोलीवर) Proud तर तुला तेही सहन नाही होत Rofl कमाल आहे. Wink

तुला भेटून आनंद झाला तो व्यक्त केला. रच्याक, मी खरोखरीच तुला भेटायला टायरपीट केली होती. Happy

Lol
अरे मला सगळ्यांना भेटायची घाई झाली होती! म्हणून म्हटलं लवकर पोचून आधी फोटो बघावेत.


सत्यनारायणाच्या पूजेला आल्यावर आधी सत्यनारायणाचे दर्शन घ्यायचे हा खाक्या असावा नचिकेतचा
+१
(आता सवयीप्रमाणे हे वाक्य एडिट करू नकोस नाहीतर कचरा करशील माझा! :P)

मामी सुद्धा होत्या तिथे?? मी भेटलोच नाही! मला वाटलं सगळे माबोकर त्या घोळक्यातच आहेत! आणि उरलेले आधीच घरी गेले आहेत. रच्याकने, माझ्याकडे होता बिस्कीटचा पुडा! तुला पुडा मिळाला असता, मला मामींना भेटता आलं असतं!

तो हँडसम आयडी माझ्याकडे बघून (दोन्ही खांदे उडवत) म्हणाला - सेनापती!! (दुसरं कोण असणार अशा टोनमध्ये!)


आयडी पलिकडचा माणूस खराखुरा भेटतो ते अश्या गटगमधेच.

अणुमोदक!

तो हँडसम आयडी माझ्याकडे बघून (दोन्ही खांदे उडवत) म्हणाला - सेनापती!! (दुसरं कोण असणार अशा टोनमध्ये!)

>>>>>>>>>>>>>>>>

आया, सिरियल सुरू व्हायच्या आधीपासूनच फूटेज खातोय सेनापती Rofl
रिलीज झाल्यावर काय करेल हा Wink

धण्यवाद रे. Proud

आता तुला आतली बातमी सांगते. तु दालनात प्रवेश करायच्या दोन मिंटं आधी इंद्रधनुष्य मला लालू समजला होता. कारण मी लाल रंगाचे कपडे परीधान केले होते. त्या हिशोबाने अश्विनी सरळसरळ निल्या झाली आणि मग निल्या काळ्या झाला. आम्ही हसत असतानाच माझ्या नजरेस तु पडलास. लगेच सगळ्यांना दमात घेऊन सांगितलं की भुंगा आलाय आणि त्याच्याशी ओळख करून देत असताना मी लालू असणार आहे. तु फोटो बघेपर्यंत मी तुझ्यावर पाळत ठेऊन होते की जिप्सी चुकून तुला मी मामी हे सांगतोय की काय. पण तसं काही न होता तुला बरोब्बर बकरा बनवला!!! Proud

कलादालनातील माबोकरांची उपस्थिती बघता... प्रदर्शनासाठी गटग होतं की गटगच प्रदर्शन होतं हा प्रश्ण अजुनही उनुत्तरीत आहे. :p

भुंग्या... सही लिहिलयं... btw मामी की लालू यांच्यात माझाही गोंधळ झाला.

वृत्तांतल्या गटगवरून आणि देवकाकांच्या सचित्रं झलक मधून हे प्रदर्शन जोरदार झालेलं दिसतंय.

mast !

धम्म्माल भुंग्या ईष्टाईल वृत्तांत!
भुंग्या, माझ्या मनावर मी शाळकरी मूलगी असल्याचं अजून ८/१० वेळा बोलून बिंबवलंस की, मी बालभारती- कविता विभाग काढेन इथे Proud

संतूरची अ‍ॅड करण्याची खूमखूमी आलीये आता Biggrin

बादवे, वृ-तील पंचेस मस्त मस्त, मी असताना मामीही तिथे होत्या का? काय राव माझी पण भेट नै झाली, भुंग्या, तू जरा भेट तरी घडवून द्यायचीस ना, तूझं ईप्सित साध्य झालं की बसलास गप्प ते? Wink

टायरपीट Lol

आपल्या गळ्यात लटकवलेल्या बायकोसोबत (बायकोचं नाव "निकॉन" आहे हो)

जिप्स्या - बायको कधी बदललीस? च्यामारी आणि सांगितले पण नाहीस...का भुंग्याचा बायको ओळखताना गोंधळ झालाय?

भुंग्या - स्वप्नील अतिशय दिलखुलास आहे आणि त्याला अशा गडबडीची चांगली सवय आहे.

सेनापतीचे बखर आख्यान , रोहित मावळ्याने "भुंग्या, खूप धुमाकूळ घालत असतोस" असे काढलेले उद्गार...... घारुअण्णाने भर घोळक्यात तारस्वरात "भुंग्या, कॉफी हाऊस का काढलेस??" असे अडचणीत आणणारे विचारलेले प्रश्न वेळेअभावी आणि "सोयिस्कररित्या" गाळण्यात आलेले आहेत.>>>>

घारुअण्णांनी विचारलंच तर ... Biggrin

सॉल्लिड वृत्तांत.

Pages