मर्यादा..

Submitted by मी मुक्ता.. on 30 December, 2011 - 06:06

"प्रमाणामध्ये सर्व काही असावे." या प्रमाणात असण्यामुळेच जग सुरळीत चाललय. पण तरीही सगळ्याच गोष्टी प्रमाणात नसतात. जसं की माझा राग... प्रमाणाबाहेर. मर्यादा सोडून. पण तुझ्या समजूतदारपणाला मर्यादा आहेत. त्यामुळे तूही कधी कधी चिडतोस. मग म्हणतोस, "माझ्याही ऐकून घेण्याला मर्यादा आहेत. काय गरज आहे हे बोलायची. तुझ्या आजूबाजूच्यांनी काय कमी केलं का तुझ्यासाठी? देन लूक अ‍ॅट पॉसिटीव्ह अ‍ॅन्ड बी हॅपी." पण मला हे ऐकू येत नाही. तुझ्या समजूतदारपणाला मर्यादा असल्याचं मला मुळीच आवडलेलं नसतं. आणि मला यावर अमर्याद चिडायचं असतं पण तुझी मर्यादा संपल्याने त्याचं रुपांतर अमर्याद रडण्यात होतं. हे मी तुला कळू देत नाही. आता कध्धीच तुला भेटायचं नाही असं मी ठरवते कारण हे रडणं अमर्याद चालू रहाणार आहे असं मला वाटतं. पण तसं नसतं. काही वेळाने ते संपतं.मला संपणार्‍या गोष्टी आवडत नाहीत. शाळेत असताना प्रत्येक वर्षी वर्ष संपायचं. खूपच्या खूप रडू यायचं तेव्हा. नव्याची ओढ वगैरे काही नाही.
पण अमर्याद असं काही नसतं म्हणे या जगात. जसं पूर्ण चांगलं आणि पूर्ण वाईटही काही नसतं. नथिंग इज ब्लॅक ऑर व्हाईट. एव्हरीथिंग इज ग्रे. पण मला ग्रे आवडत नाही. पण व्हाइट आवडतं. मला ब्लॅकही आवडतं. पण मला ग्रे आवडत नाही. त्यामुळेच कदाचित काहीच ब्लॅक किंवा व्हाईट नाही हे मला जास्त प्रकर्षाने जाणवतं. मला ब्लॅक किंवा व्हाईट ठरवणार्‍यांची अशा वेळी गंमत वाटते मग. मला अमर्याद व्हाईट व्हायचंय. ब्लॅकही चालेल. पण ते शक्य नसावं. तसं नसतं तर गोष्टी बदलल्या नसत्या. आधी भरघोस मिळायचा तो आता तुरळक मिळतो.. लिखाणाला प्रतिसाद. कदाचित आधी मी चांगलं लिहित असेन. पण आता नाही लिहित. म्हणजे माझ्यातल्या चांगलेपणाला मर्यादा होत्या. मला माझ्यातला चांगलेपणा आवडेनासा झालाय. मग आता काय आहे? वाईटपणा? की खरेपणा.. आणि जे काही आहे ते अमर्याद की पुन्हा मर्यादित?
सगळं काही अमर्याद असलं पाहिजे. प्रेम अमर्याद, विरह अमर्याद, रागही तसाच, लोभही तसाच आणि जन्मही तसाच.. जन्म अमर्याद नाही. म्हणून मला अवकाश आवडतो. कारण तो अमर्याद आहे. पण मला पृथ्वी आवडत नाही, तिला मर्यादा आहेत. मला अवकाशाचा भाग व्हायचंय म्हणजे मी ही अमर्याद होईन. मरणाचं अवकाश वेढून असलेल्या जन्मापासून माझी सुटका होईल जेव्हा मी अवकाशाचाच भाग होईन. मी मरणाचा भाग होईन.. भाग नाही, मी मरण होईन.. अमर्याद मरण..!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मुक्ता,
ह्या ललितामधील लिखाणाचं परिक्षण आणि मिळणारे प्रतिसाद हा भाग वगळला तर,
डिजीट्ल इलेक्ट्रोनिक्स सर्रकन डोळ्यासमोरुन गेलं- बायनरी!! आयदर झिरो ऑर वन...., तुळा राशी आठवली- दोन एक्स्ट्रीमस! तुझ्या लिखाणातून जाणवत इतकच गेलं यू (लेखक), वॉन्ट टू बी ओनली ऑन एक्स्ट्रीम्स....!
आय फील- ग्रे समटाईम्स इज बॅलन्स! ए बॅलन्स बीटवीन टू एक्स्ट्रीम्स.....
नो ग्रे शेड्स- वागताना असं असण्यात हरकत काहीच नाही- त्या ओघाने आलेले 'एक्स्ट्रीम' तोटे किंवा फायदेही मग अ‍ॅक्सेप्ट करत पुढे जाण्याची धमक जोपासायला हवी!

मला तू ह्या दोन एक्स्ट्रीम्स ची अमार्यादेपणाशी घातलेली सांगड फारशी लॉजिकली पटली नाही, राग मानणार नाहीस, हे गृहीत घरून हा अभिप्राय लिहीला आहे.

धन्यवाद किरण्यके.. Happy

बागेश्री,
Happy राग नाहीच. अजिबात नाही.
तुझ्या लिखाणातून जाणवत इतकच गेलं यू (लेखक), वॉन्ट टू बी ओनली ऑन एक्स्ट्रीम्स....!>> येस्स.. बरोबर ओळखलस..!

आय फील- ग्रे समटाईम्स इज बॅलन्स! ए बॅलन्स बीटवीन टू एक्स्ट्रीम्स>> आय फील म्हणायची गरज नाही. ते खरंच आहे. ग्रे बॅलन्स आहे. तो असलाच पाहिजे. किंबहुना निसर्गतःच तो असतो.

नो ग्रे शेड्स- वागताना असं असण्यात हरकत काहीच नाही- त्या ओघाने आलेले 'एक्स्ट्रीम' तोटे किंवा फायदेही मग अ‍ॅक्सेप्ट करत पुढे जाण्याची धमक जोपासायला हवी!>> कोणत्याही वागण्याचे फायदे तोटे असतातच. ग्रे चे पण. आपल्याला ते भोगावेच लागतात. इच्छा असो वा नसो. त्यामुळे ते सहन करायची तयारी वगैरे कोणताही थोडंफार विचार करणारा माणूस ठेवतोच असं मला वाटतं.

मला तू ह्या दोन एक्स्ट्रीम्स ची अमार्यादेपणाशी घातलेली सांगड फारशी लॉजिकली पटली नाही.>> बरोबर. लॉजिकली पटण्यासारखी गोष्ट नाहीच आहे ती..

ह्म्म.. लॉजिकली नाही पटणार पण इमोशनली कदाचित पटू शकते. दॅट टू जस्ट फॉर अ मुमेंट. हा असा दृष्टीकोन नाहीये. अ‍ॅटिट्युड नाहीये. तर कोणत्यातरी एका क्षणाला केले गेलेले विचार आहेत. ग्रे आहे. ग्रे च सत्य आहे याची पूर्ण जाणिव असतानाही ग्रे ची कॉम्लेक्सिटी पाहता एका क्षणी 'सगळम बायनरी असतं तर किती बरं' असं वाटल्यावाचून राहत नाही. त्या क्षणाचे हे विचार आहेत. तो क्षण गेल्यावर त्याचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही. रादर त्याही क्षणी आपण त्याचं समर्थन करत नाही हे माहित असतं तरीही ते आपल्या मनात येतं. आत्महत्येचा एक क्षण येतो तसा. ते मांडलय. दॅट्स इट..

वेळ काढून सविस्तर लिहिल्याबद्दल धन्यवाद.! Happy

ग्रे च सत्य आहे याची पूर्ण जाणिव असतानाही ग्रे ची कॉम्लेक्सिटी पाहता एका क्षणी 'सगळम बायनरी असतं तर किती बरं' असं वाटल्यावाचून राहत नाही. त्या क्षणाचे हे विचार आहेत. तो क्षण गेल्यावर त्याचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही. रादर त्याही क्षणी आपण त्याचं समर्थन करत नाही हे माहित असतं तरीही ते आपल्या मनात येतं. आत्महत्येचा एक क्षण येतो तसा. ते मांडलय. दॅट्स इट.. >> विचारात गुंतागंत. बायनरी आस्तित्त्वात नाही, असे का समजतेस? मी वरच्या पोस्टीत लिहीताना हेच म्हणत होते, बायनरी जगता येतं त्याचे परिणाम पुर्णतः भोगण्याची तयारी दाखवूनच, मग ग्रे ची कॉम्लेक्सिटी परमनंट घालवता येईलही.

आणि लेखाच्या लॉजिकबद्दल मला असं म्हणायचं होतं- बायनरीलाही शुन्य किंवा एक- अशी मर्यादा पडते, मग त्याला अमर्यादपणा लागू पडत नाही, इमोशनलीही नाही Wink

बायनरी आस्तित्त्वात नाही, असे का समजतेस?>> Rofl
कारण माणसाच्या वागण्यासंदर्भात बायनरी खरच अस्तित्वात नाही. कधीच नव्हतं. कधीच नसेल. तुझ्या पाहण्यात आलय का खरच?

मग ग्रे ची कॉम्लेक्सिटी परमनंट घालवता येईलही.>> कॉम्प्लेक्सिटी बायनरीलाही आहेच. नाही का? Wink

बायनरीलाही शुन्य किंवा एक- अशीच मर्यादा पडते>> माझ्या लेखी ही मर्यादा नाही. आय मीन, ज्या कॉन्टेक्ट्स मध्ये मी बोलतेय त्यात हे शून्य आणि एक म्हणजे अमर्याद चांगुलपणा आणि अमर्याद वाईटपणा आहे..

आणि विचारांची गुंतागुंत आहेच.. Wink रादर तीच आहे... Lol

कारण माणसाच्या वागण्यासंदर्भात बायनरी खरच अस्तित्वात नाही. कधीच नव्हतं. कधीच नसेल. तुझ्या पाहण्यात आलय का खरच?
>> हो आलं आहे. म्हणूनच म्हणाले, बायनरी अस्तित्वात नाही असे का समजतेस.
असो Happy

हो आलं आहे. म्हणूनच म्हणाले, बायनरी अस्तित्वात नाही असे का समजतेस.>> ह्म्म.. Happy लॉट मोअर टू सी देन.. व्हॉट एल्स कॅन आय से.. Happy

मला आवडलं..
एकातून एक निघालेली विचारांची साखळी छान मांडली आहे.

अवांतरः
निखिल खैरे, Lol