वाच ग घुमा वाचु मी कशी ? वाच ग घुमा वाच

Submitted by वैशाली अ वर्तक on 27 December, 2011 - 05:48

वाच ग घुमा, वाचू मी कशी? वाच ग घुमा वाच.
बालपणी वाचली शालेय पुस्तकं ,
यौवनात वाचली स्टारडस न मासिकं
संगोपनात वाचली मुलांची पुस्तकं
वाचू मी कधी ?वाचू मी कशी?वाच ग घुमा वाच
सायंकाळ जाते मालिका पहाण्यात,
रात्री न पाहिलेल्या, दुपारी पहाण्यात,
इमेल वाचण्यात वा पत्ते लावण्यात
वाचू मी कधी? वाचू मी कशी? वाच ग घुमा वाच
समाजाचे वाचनालय आहे आज बंद,
ब्रिटीश लायब्ररीची मी नाही सदस्य ,
पुस्तकं आणू मी कशी ? वाचू मी कशी ?वाच ग घुमा वाच
नकोच वाटते ' ते ' पेपर वाचन ,
भरलेले नुसते हिंसा न राजकारण,
वारंवार दिसते हे तर "आजतक" वर ,
पेपर कशाला वाचू? वेळ कशाला दवडवू ?वाच ग घुमा वाच
वाचले पु. ल., व. पु .आणि वि. स.
वाचली विनोबांची गीता प्रवचन
पण शेवटी सांगते ऐका,वाचा नित्य गीता,
त्यातच दडलीय जीवनाची सत्यता (सफलता )
वाच ग घुमा, वाचू मी कशी ? वाच ग घुमा वाच

वा! व्वा! छान संदेश दिलात.... आणि.... चांगलेच अंजनही घातलेत, व, ...वास्तवही मांडलेत. गीता प्रत्येकाने वाचायलाच हवी.