कवि ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार

Submitted by रेव्यु on 22 December, 2011 - 03:17

कवि ग्रेस यांचे अभिनंदन
तुला पहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायान्तुनी रंग गळतात, या वृक्ष माळेतले !

तुझी पावले गे धुक्याच्या महालात, ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा, न माझी मला अन तुला सावली .....
...
मनावेगळी लाट व्यापे मनाला, जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू तुझे दु:ख झरते, जसे संचिताचे ऋतू कोवळे .......

जशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून, आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे, दिसे कि तुझ्या बिल्वरांचा चुडा.......
- कवी ग्रेस

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

'वार्‍याने हलते रान' ह्या ललित लेख संग्रहाला 'साहीत्य अकादमी' मिळाल्याचे सकाळी वाचले. कामाच्या घबडग्यात विसरलो.

'ग्रेस' ह्यांचे अभिनंदन!!

वाह! २०११ च्या मळभलेल्या वर्षात या बातमीने जणू पुनः तांबडे फुटले असेच म्हणायला हवे.

ग्रेस यांचे अभिनंदन!(हे म्हणजे सूर्याला दिवे दाखावण्याचा प्रकार आहे, तरिही.). अजून अशा अनेक भारावून टाकणार्‍या, नि:शब्द करणार्‍या, अंतर्मुख करणार्‍या काव्य संग्रहांची निर्मिती करायला ईश्वर त्यांना निरोगी व दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना!
"ग्रेस" बस नामही काफीं है!

माझी ग्रेस यांची सर्वात आवडती कविता म्हणजे "पाउस कधीचा पडतो"

शाळेत असताना खिडकीजवळ मी कधी कधी रात्री अभ्यास करत असायची आणि धो धो पाउस पडत असायचा बाहेर. असा वेळी पानांची सळ सळ , कुत्र्यांचे रडणे. आणि जी शांतता बाहेर जाणवत असे.
जसे एखादे दु:ख्ख पसरले आहे.

ग्रेस यांची कविता नंतर वाचली आणि वाटले हा पहिल्या प्रहराचा पाउस किती अचुक पकडला या माणसाने. जशी ह्रुदयात हात घालुनच कविता बाहेर काढली.

नीटसे लक्षात आले नाही काय म्हणायचे आहे ते!

महाकवी ग्रेस हे 'एक्स मायबोली सदस्य' नव्हेत की 'ग्रेसांचे अभिनंदन'अशा प्रतिसादांची रांग लागावी.

त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या चार पाच द्विपदी लिहिलेल्या दिसत आहेत. त्या ऐवजी त्यांच्या पुरस्कारप्राप्त ललितावर भाष्य, काव्यावर भाष्य असे काही असते तर समर्पक वाटले असते (मला तरी)!

क्षमस्व!

-'बेफिकीर'!

आपल्या आवडीच्या कवीला, आपल्या भाषेला हा सन्मान मिळावा यासारखा आनंद नाही. मराठीचा, मराठी बोलणा-या प्रत्येकाचा, मराठी साहीत्यावर प्रेम करणा-या प्रत्येकाचा हा सन्मान आहे. कुणी त्री म्हटल्याप्रमाणे साहीत्य अकादमीला ग्रेस हे अगदी खरं आहे..

पुरस्काराचाच सन्मान आहे हा..

ग्रेसजींचे मनःपूर्वक अभिनंदन !

हा पुरस्कार केवळ त्यांच्या पुस्तकाचा नसून त्यांच्या साहित्यातील योगदानाचा असावा, त्यांची ह्र्दयस्पर्शी गीते आणि लेखन यांचा सम्मान आहे.

अभिनंदन ग्रेट ग्रेस

ग्रेस यांच्या साहित्यावर आधारित "साजणवेळा" या कार्यक्रमाचे रुपांतर मी बोलक्या पुस्तकात (audiobook) केले आहे. "पूर्वार्ध" आणि "उत्तरार्ध" अशा दोन भागात हे बोलके पुस्तक अॅपल आयफोन तसेच आयपॅड स्टोअरवर उपलब्ध झाले आहे.
जरुर पहा...
https://itunes.apple.com/in/app/sajanvela-part-1/id586514412?mt=8
https://itunes.apple.com/in/app/sajanvela-part-2/id586568619?mt=8