वेग - एक सत्यकथा

Submitted by _सचिन_ on 21 November, 2011 - 11:17

गाडीने १३० चा स्पीड ओलांडला तसा बसल्या जागीच रियाने खुर्चीच्या मुठी घट्ट आवळून घेतल्या आणि तिरप्या नजरेने तिला बघणारा आदित्य अजूनच खुष झाला. त्याच्या नजरेतली खुन्नस स्पष्ट दिसत होती. आज बर्याच दिवसांनी त्याच्या हातात त्याची लाडकी मॅकलारेन होंडा आली होती. तीच्या त्या निळ्या रंगाच्या स्कीन वर तो जाम फिदा होताच पण तीचा एकंदरीत लुक त्याला वेड लावत होत. त्यात आज शेजारी रिया बसलेली. एकंदरच आज सगळच आदिच्या मनासारखा जुळून आल होत.
आदिच गाडी चालवायच कसब खरच अफलातून होत. कसल्याही अवघड वळणावर सुद्धा त्याची गाडी हवेशी स्पर्धा करायची. ह्या अशाच वळणांवरुन त्याने भल्या भल्या गाड्यांना मागे टाकले होते पण आज त्याला दोन हात करणारा भेटला होता.
भन्नाट वेगात त्याला थोडी तंद्री लागली आणि थोडासा निर्धास्त झाला असतानाच अचानक एक लाल फरारी बघता बघता त्याच्यापुढे सुसाट निघुन गेली. क्षणभर त्याला काहीच कळल नाही. रिया समोरच अस झाल्याने तो पुर्ण इरेला पेटला होता. काहीही करुन त्या फरारीला मागे टाकायचे हेच आता त्याचे एकमेव उद्धेश्य होते. त्याने बघता बघता वेग १५० च्या पुढे नेला. आजूबाजूला काय घडतय ह्याची त्याला आता काहीच तमा नव्हती
आणि तेवढ्यात त्याचे डोळे चमकले.
समोरच एक छानस वळण होत. वळण म्हणजे आदिची हक्काची दुसर्या गाड्यांना खिंडीत पकडायची जागा. ह्याच वळणावर त्या फरारीवाल्याला मागे टाकता येइल ह्यात आदि ला काहीच शंका नव्हती. तो आता नीट सावरून बसला होता. रियाच्या सुचनांकडे आणि ओरडण्याकडे पुर्ण दुर्लक्ष करून त्याने सगळे लक्ष त्याच्या वेगावर केंद्रित केल. बघता बघता काटा १८० ला स्पर्श करु लागला, फरारी आणि त्याच्या गाडीतल अंतर क्षणाक्षणात कमी होत होत. फरारी आता फक्त काही फुटांवरच होती. दोन्ही गाड्यांचे टायर अक्षरशः आग ओकत होते. तेवढ्यात..
"आदिइइइइ " रियाच वाक्य पुर्ण होण्याच्या आतच घात झाला. फरारी ला ओलांडायच्या नादात शेजारचा पोल आदिकडून पुर्ण दुर्लक्षीत झाला होता. गाडी पोल ला लागून १५ फुट हवेत उडाली आणि २-३ कोलांट्याउड्या घेउन शांत झाली.
सगळच संपल होत. काट्याला १८० वरुन ० ला यायला एकच सेकंद पुरेसा होता. फरारी तर केव्हाच दिसेनाशी झाली होती.
-------------
"आदि !!" मागून आईच्या आवाजाचा आदि ला भास झाला
"आदि !!!" दुसर्यावेळेस मात्र आईच्या आवाजा बरोबर पाठीत धपाटा बसला तसा आदि पुर्ण भानावर आला. "गधड्या! लाज नाही वाटत. परिक्षा येवढी तोंडावर आलीये आणि सरळ दिवसभर गेमा खेळत बसतो". आदि ला आता पीसी बंद करण्यापसून पर्यायच नव्हता.

गुलमोहर: 

Happy सचिन, अरे अ‍ॅक्सिडेंटच्या पुढे काही सनसनी नाट्य असेल असं वाटलं तर अगदी फुस्स करुन टाकलास शेवट. का अनपेक्षित म्हणु? Wink बाय द वे, ही सत्यकथा तुझीच वाटते आहे मला.

मस्त..

खरच काय वेग घेतला होता कथेने. उत्कंठा वाढली होती आणि एकदम मध्ये स्वप्न. आता उत्सुकता लागून राहिली आहे, कि कथा कशावर असेल.
गेमिंग वर आहे का काय..

छान

Happy Happy

जबरी Happy

वा मस्त Happy