नंतर

Submitted by ठमादेवी on 21 November, 2011 - 02:02

नंतर... या शब्दाचीदेखील एक गंमत असते नाही? तुझ्याशी नंतर बोलतो, नंतर सांगतो, नंतर कधीतरी... असं आपण अनेकांना अनेकवेळा अनेक निमित्तांनी सांगत असतो.

तसं बघायला गेलं तर आत्ता नाही... एवढाच या शब्दाचा अगदी जवळचा अर्थ. पण त्याचे छुपे अर्थ खूप वेगवेगळे निघतात. काहीजण नुसतेच सवय म्हणून नंतर बोलू असं म्हणतात. पण हा नंतर त्यांच्या आयुष्यात कधी येतच नाही. समोरचा माणूस नंतर म्हणजे कधी, याचा विचारच करत बसतो. नंतर म्हणजे कधी नेमकं कधी? एक तासानंतर, एका दिवसानंतर, एखाद्या महिन्यानंतर की आणखी कधी, हे सर्व कुणी कशासाठी कधी नंतर म्हटलं आहे यावर ठरत असावं बहुधा.... पण नंतर म्हणजे कधीच नाही असंही काही लोक सूचित करत असतात. ही देखील यातली गंमत आहे.

एखाद्याला एखादी गोष्ट कधीच करायची नाहीये, त्यावेळी करायची नाहीये, नुसतीच वेळ मारून न्यायचीय, एखाद्याला टाळायचं आहे... अशा विविध कारणांसाठी नंतर करू, नंतर बोलू, नंतर बघू... असे शब्दप्रयोग वापरले जातात. नंतर बोलू असं सांगून ते कधीही न करणारी माणसंही मी पाहिली आहेत. त्याऐवजी लोक मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये किंवा अमुक एक काम करायचंच नाहीये असं थेट का सांगून टाकत नाहीत असा मला नेहमी प्रश्न पडतो. माणसं अशी पारदर्शक का नसतात? असा मला पडणारा दुसरा प्रश्न...

परत कधीतरी, भेटू एकदा, जमेल तेव्हा करू, सध्या नाही, केव्हा जमतंय पाहू, असे या नंतर या शब्दाचे अनेक भाऊबंद... त्यांचा वापर केल्याने माणसं बिझी असल्याचं तर दिसतंच पण त्याचबरोबर त्यांना तुमचं किंवा तुमच्या कामाचं तितकंसं महत्त्व वाटत नाही हे ही दिसतं का?

असो, सतत नंतर करतो, असं बोलणार्‍या माझ्या एका मित्राला ही पोस्ट समर्पित आहे. अर्थात त्याचा टाळण्याचा हेतू नसतो. तो खरंच बिझी असतो इतकंच... पण तो यानिमित्ताने किमान या नंतरला आयुष्यातून हद्दपार करेल अशी आशा आहे...

म्हणतात ना, कल करे सो आज कर...

पण त्यावरही त्याचं उत्तर नंतर करतो, असंच असणार याची मला खात्री आहे...

बाकी, लिहू नंतर कधीतरी... Happy

गुलमोहर: 

"मी आहे" हे दाखवण्यासाठी काहीही विषय घेऊन चार ओळी खरडायच्या हे काही बरोबर नाही. काहीतरी विचार करायला लावणारे लेखन लिहा नाहीतर लेखणी म्यान करा ठमादेवी

माणसाच्या पळपुटेपणाचं उदाहरण आहे हे... डु आय घेऊन इतरांवर चिखलफेक करणे, आपल्या लेखावर तिखट प्रतिक्रिया आल्या की तो अप्रकाशित करून पळून जाणे हे आणि इतर अशा अनेक गोष्टी करणार्‍या लोकांच्या घाणेरड्या वृत्तीचं दर्शन घडवणारी वरची पोस्ट आहे... हे मी खवीस यांच्या पोस्टला अनुसरून म्हणते आहे...

असो... आता तीही उडवली जाईल अशी मला खात्री आहे... Happy

"मी आहे" हे दाखवण्यासाठी काहीही विषय घेऊन चार ओळी खरडायच्या हे काही बरोबर नाही. काहीतरी विचार करायला लावणारे लेखन लिहा नाहीतर लेखणी म्यान करा ठमादेवी>>> Lol

=====================================================

पण हा नंतर त्यांच्या आयुष्यात कधी येतच नाही>>>

एखाद्याला एखादी गोष्ट कधीच करायची नाहीये, त्यावेळी करायची नाहीये, नुसतीच वेळ मारून न्यायचीय,>>>

आपण म्हंटलेल्या 'अनेक छुप्या अर्थापैकी' दोन उतार्‍यांमध्ये आपण जे अर्थ दिले आहेत ते सेमच आहेत. वेगवेगळे अर्थ कोणते हे कृपया सांगावेत.

==============================

माणसाच्या पळपुटेपणाचं उदाहरण आहे हे... डु आय घेऊन इतरांवर चिखलफेक करणे, आपल्या लेखावर तिखट प्रतिक्रिया आल्या की तो अप्रकाशित करून पळून जाणे हे आणि इतर अशा अनेक गोष्टी करणार्‍या लोकांच्या घाणेरड्या वृत्तीचं दर्शन घडवणारी वरची पोस्ट आहे... >>>>

काहीसा सहमत, अगदी अस्सेच अनुभव मलाही येतात. Lol (अर्थात, खवीस यांच्याकडून नव्हे)

-'बेफिकीर'!

मी फोन केला की मलाही सगळे 'ए हबा तुला नंतर फोन करू का?' असेच म्हणतात. आपलीच वैशी म्हणायची, दुसर्‍यांचा काय दोष.... बाकी लेखाचा विषय उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेसाठी छान आहे.

त्यांनीच लिहिलंय -

<<तसं बघायला गेलं तर आत्ता नाही... एवढाच या शब्दाचा अगदी जवळचा अर्थ. पण त्याचे छुपे अर्थ खूप वेगवेगळे निघतात>>

म्हणून विचारलं! Happy

खवीसांच्या प्रतिक्रियेचं हसू येणं यात काही चूक वाटत नाही मला तरी!

ह बा - Proud Happy

बाकी लेखाचा विषय उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेसाठी छान आहे.>>> परवा बापटांच्या घरी उत्स्फूर्तच्या बर्‍याच विषयांची चर्चा झालेली दिसतेय... Proud

एखाद्याला एखादी गोष्ट कधीच करायची नाहीये, त्यावेळी करायची नाहीये, >>> कधीच करायची नाहीये आणि त्यावेळी न करता नंतर करायची आहे असा तो फरक आहे...

परवा बापटांच्या घरी उत्स्फूर्तच्या बर्‍याच विषयांची चर्चा झालेली दिसतेय...>>> नाही गं खरोखरच चांगला विषय आहे. जाने. मधे आपली स्पर्धा होईल त्यात हा विषय देतो...

पोस्ट बिस्ट काही उडवणार नाहीये मी... जमत नसल्यास तुम्हीच उडवा हे जे काय आहे ते

हे काय ललित आहे काय? काहीतरी आपले भंपक विषय आणायचे आणि ते अडीच शब्दात मांडायचे. ह्यांना कोणीतरी टाळतो म्हणून आम्हाला का त्रास हे वाचायचा?

पोस्ट बिस्ट काही उडवणार नाहीये मी... जमत नसल्यास तुम्हीच उडवा हे जे काय आहे ते

हे काय ललित आहे काय? काहीतरी आपले भंपक विषय आणायचे आणि ते अडीच शब्दात मांडायचे. ह्यांना कोणीतरी टाळतो म्हणून आम्हाला का त्रास हे वाचायचा?

<<<

Lol

हे भारी आहे बुवा. हे वाचलंच नव्हतं नंतर! Biggrin

ठमादेवी - आता हलके घ्या, बरेच दिवस झाले.

त्याऐवजी लोक मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये किंवा अमुक एक काम करायचंच नाहीये असं थेट का सांगून टाकत नाहीत असा मला नेहमी प्रश्न पडतो. माणसं अशी पारदर्शक का नसतात? असा मला पडणारा दुसरा प्रश्न...

>> तुम्ही असं स्पष्टपणे किती लोकांना सांगता/ सांगु शकता?