दिवाळी पहाट-

Submitted by Manoj s joshi on 20 November, 2011 - 02:05

दिवाळी पहाट

" अव्या, तुला खर सांगतो हा पहिला घोट म्हणजे अगदी आ s s हा s s असतो. एकदम चार्ज करून टाकणारा". शशिकांत बियरचा ग्लास तोंडाला लावत म्हणाला. अविनाशने मान डोलवली अन् फारसाणाची एक फक्की तोंडात टाकली. आज बर्याच दिवसानंतर अविनाशच्याघरी शशांक राहायला आला होता. दोघ लंगोटी यार. आय.आय.टी. कानपुरहून बी.ई. (एलेक्ट्रॉनिक्स)केल. तेथेच शशिकांत आणि अनघाचं जमलं. अविनाश अमेरिकेत सेट्ल झाला अन् शशिकांत मुंबईत स्थाइक झाला. आज तब्बलदोन वर्षानंतर दोघं भेटत होते.

" शशिकांत पिहु कितवित आहे रे? "
" आव्या, अरे १२विची परीक्षादिली तिने " शशिकांतने लगेच मोबाइल काढून त्यावर तिच्या पिकनिकचे फोटो दाखवले.
" अरे केवढी मोठी दिसायला लागलीय पिहु ?. अन् एकप्रकारचा गोडवा आहे तिच्यात" अविनाशनी फोटो निरखत म्हटल.
" अरे ती गाते सुद्धा खूप गोड. 'सारेगमप' मधे तिच सेलेक्षन झालय."
वा! अरे गाणं तिच्यारक्तात आहे. तुला आठवतय कॉलेज च्या गॅदरिंग मधे तू अनघाला सर्वंसमोर गाण्यात प्रपोज़ केल होतास ' तुज़े देखतो ये जाना सनम ' अविनाश आवेषाने म्हणाला.
" अन् त्यानंतर आम्ही दोन गाणी लागोपाठ गायलो- ' दो लबज़ों की है दिल की कहानी.... माँग केसाथ तुम्हारा...' शशिकांतन पुष्टी दिली.
" वा! तब्ब्येत खुष केलीस मित्रा- त्यावेळी अन् आत्ताही" तेवढ्यात शशिकांतचाफोन वाजला अन् शशिकांतन फोन हातातघेताच ऑफ झाला.
" आव्या, माझा फोन ऑफ झालाय.अरे अनघाचा फोन आला आहे, तिला फोन कर बर."
" शशी, तू घरी सांगून आलाअहेस ना? की वाहिनीला चैन पडत नाहीए ? " अस म्हणत त्याने फोन लावला.
" काय अनघा, नवर्याशिवाय चैन पडतनाही वाटत ?"
" अविनाश, तू बल्कनित जाऊन फोनघे..."
" शशी, इथे सिग्नल येत नाहीएमी ...अस म्हणत तो बल्कनित गेला.

"काय ग अनघा काय झाल? "
" अरे पिहुला धन्वंतरी मधे अडमीट केल आहे. तिनेमनगटवर ब्लेड मारुन घेतल आहे."
"काय ... " अविनाश ओरडलाच.
तू शशिकांतला घेऊन लवकर ये.
"निघालोच" म्हणत अविनाश धावला.
" शशी चल, आपल्याला जायला हवमी माझी गाडी काढतो..... काहीही प्रश्न विचारू नकोस मुकाटयाने चल "
पंधरा मिनिटात दोघ धन्वंतरी हॉस्पिटल मधे पोहोचले. ओ.टि च्याबाहेर सर्वजण बसले होते.
शशिकांत एक्दम रड्वेला झाला. शशीच्या वडिलांनी त्याला बसवलं .
" शशी, शांत हो. पिहुला काहीहीहोणार नाही. शी विल बी ऑलराइट. तिला recover व्हायला वेळ लागेलपण ती नक्की बरी होईल"

ओ.टी. च्या आजूबाजूला दोन्ही रंगांमधे मोघे परिवार बसला होता.अनघा शांत होती. तिचा स्वभाव खूप प्रॅक्टिकल होता. साध्य परिस्थितीत टेन्शन घेऊन काही होणार नव्हत.नवर्याला सवरण
अन् पिहुला ह्या परिस्थितीतून बाहेर काढण महत्वाचं होत.....

त्या दिवशी संध्याकाळी पिहु आंघोळीला गेली अन् बराच वेळ झालातरी बाहेर आली नाही. घरी फक्त शशीचेवडील अन् अनघाचा भाउ विवेक दोघच घरी होते. शेवटी विवेकनी दार तोडल. बाथरूम मध्ये पिहु बेशुद्ध अवस्थेत पडली होती अन् सर्वत्ररक्त.......
दहाव्या मिनिटाला आंब्युलेन्स आली. विवेक स्वत: डॉक्टर असल्यामुळेआंब्युलेन्स येईपर्यंत प्राथमिक उपचार झाले.......

शशिकांतची मानसिकता ठीक नव्हती. अनघाच्या अगदी उलट. अनघा खूपभावानप्रधान असली तरी प्रसंग आला की तिच्यात शनीचा ग्रहाचा प्रॅक्टिकलपणा , परिस्थितीच गांभीर्य येत असे अन् ती पूर्ण आत्मविश्वासाने , मंगळ ग्रहाच्या जोमानं दु:खांच्या डोंगरांपुढे बळकटीने
अन् कणखरपणेउभी राहून परिस्थितीला तोंड द्यायची..
अत्ता देखील सर्व हवालदिल झाले असलेतरी ती खूप शांत होती.
काहीवेळानंतर पिह्युला ओ.टि मधून बाहेर आणल अन् आय.सी.यु मध्ये हलवलं .
विवेक अविनाशला म्हणाला,
" मनगटाला खूप डीप कट होता, नाडी तुटली होती, पण आता पुढे काळजीघ्यायला हवी. मी पिहु जवळ थांबतो तुम्ही सर्वजण सकाळचे अन्हिक आटपून या".

सर्वजण घरी परतले, शशिकांतला सर्वांनी जबरदस्तीने झोपवलं अन् शशीचे बाबा अन् अविनाश डाइनिंग हॉल मध्ये बसले. अनघा सकाळच्या न्याहरीच्या तयारीलालागली.

"बाबा हे काय झाल अचानक? पिहुने अस....कस.. ?" अविनाशने न राहून विचारल.
" तुझा मित्रच ह्याला जबाबदार आहे."
" म्हणजे...? काही प्रेमप्रकरण वगेरे..?"
" नाही रे, हे गेल्या दोन वर्षांपासूनचालू आहे. पिहुचि दहावी झाल्या पासून. शशीचा अट्टाहास आहे की पिहुने इंजिनियर व्हावं -अन् तेही आय.आय.टी पोवैई मधूनच, अन् पिह्युला पार्श्वगायिका व्हायचय-गाण्यात करीयर करायचय ."
शिक्षण न घेता?" अविनाशनी काळजीच्या सुरात विचारल.
" काही नाही रे, ती म्हणते 'आत्ता मी B.Sc करते, वाटलच तर B.Sc(Tech) करते पण मला करियर करायच आहे ते संगीतामध्ये.' अविनाश तुला माहिती आहे तिला संगीताच बाळकडू तिच्या आई वडीलाकडूनमिळाल आहे. तिचा गळा ही छान आहेअन् ती आता विषारद परीक्षेला बसते आहे"
" अरे वा! सर्व उत्तम चालल आहे. आजकाल टी व्हीवरच्या अड्समध्ये ज्या जिंगल्स असतात त्यात प्लेबॅकला स्कोप आहे."
" अरे पिहु तेच म्हणतेय, अन् ग्रॅजुयेशन नंतर वर्ष- दोन वर्षात जर कुठे ब्रेक मिळालानाही तर ती नोकरी करायला तयार आहे"
"मग अडलं आहे कुठे? पिहु हुशार आहे अन् तिचे ग्रेड्स पण उत्तम आहेत "
" ते तुला समजत पण ते शशीला समजत नाहीय- त्याचगायक होण्याच स्वप्न पूर्ण होऊ शक्ल नाही. त्याला योग्य ब्रेक्स नाही मिळाले म्हणून त्याचा विरोध. पिहुने, मी , अनघन शशीला खूप समजावलं , इतकच काय, मागच्या महिन्यात शशीच्याखातर पिहुने आप्टिट्यूड टेस्ट्स देखील दिल्या. तिचे सर्व विषयात उत्तम स्कोर्स आले. झालं शशी ईरेसपेटला अन् तिला म्हणाला ' तू जर आय.आय. टी ला गेली नाहीस तर मी तुझ गाणं बंद करीन अन् पिहु कायकमी हट्टी आहे- तिने काल अस केल...."

अविनाश्ला काय बोलावं ते कळेना. न्याहारी शांततेत झाली.
आपापल आवरून बाबा आणि अनघा हॉस्पिटल मध्ये गेले अन् अविनाश शशीबरोबर थांबला.
दोन दिवसानंतर पिहु घरी आली. प्रचंड अशक्तपणावाटत होता. पिहुच्या अनेक चाचण्या, सर्वांच चार दिवसांच जागरण, हॉस्पिटलच्या वार्या अन् पिहुची काळजी ह्यात सर्वजण हवालदिलझाले होते.

काही दिवसानंतर अविनाशच्या ऑफीसमध्ये शशी कामानिमित्त गेला होता.
"अव्या , मी येणार नाही. मलाकुठल्याही ज्योतीषाकडे जायच नाही"
" शशी, तू फक्त माझ्याबरोबरचल, पैसे मी देतो "
" अव्या , तुला माहीत आहे देवाच्याकृपेने पैश्याचा प्रश्न नाहीए. पण हे ज्योतिषी लोक लेकाचे खूप बढाया मारतात. एकतर तुम्हाला खूप घाब्रवुन टाकतात, अनेक खर्चिक उपायांची-यादी हातात टेकवतात नाहीतर उगाच खूप खोटी स्तुती करून आपला ईगो वाढवतात- अन् आपण तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी सांगितलेल्या चांगल्या / वाईट गोष्टी आपल्या मनात विनाकारणघोळत राहतात" शशी वैतागून म्हणाला.

" मी तुला ज्यांच्याकडे नेणार आहे, त्यांच्याबद्दल मी आत्ता काहीच बोलणार नाही. स्वानुभव हा खरा. and you don't have anything to loose - म्हणजे असं पहा , पिहुआता हळू हळू बरी होतेय- तिची औषध चालू आहेत- घरचा डॉक्टर आहे अन् गोसावी सांगतिल ते पटलं तर घे नाहीतरसोडून दे " अविनाश म्हणाला.
" ते ज्यावेळेस खोटं,भम्पक, न पटणारे बोलायला लागतीलतेव्हा मी तिथून उठून जाईन शशी ठामपणे म्हणाला.
" एकदम काबुल" अविनाश thumbs up करत म्हणाला.
दुसऱ्या दिवशी दोघे सकाळी दहा वाजता रद्धी-सिद्धीबिल्डिंग मध्ये पोहोचले. अविनाशने ७०२ न च्या फ्लॅटची बेल वाजवली.
एका मध्यम वयाच्या माणसाने दार उघडल. पांढरा शुभ्र झब्बा पयजामाअन् दिसायला प्रसन्न ,हसतमुख व्यक्तिमत्व.
" या" गोसावी म्हणाले. सर्वजण हॉल मध्ये बसले.
" हा मझा मित्र शशिकांत"
" नमस्कार " अविनाशने थोडक्यात सर्व हकीगतसांगितली.
" पिहु कशी आहे आता"?
" बरी आहे. recover होतेय"
" हल्लीच्या मुलांना फार जपावं लागत. त्यांच्याकलेने...अं ह.. त्यांना सारखच चूचकराव लागत"
तिघेही हसले.
" बोला कस येण केलत?"
" शशीला काही प्रश्न विचारायचे नाहीयेत पण मलादोन प्रश्न विचारायचे आहेत. एक- पिहु पूर्ण बरी कधी होईल अन् तिने कुठल करीयर निवडाव जे तिच्यासाठी योग्यठरेल ?"
गोसव्यांनी लगेच प्रश्न कुंडली मांडली. अविनाशनी पिहुचि जन्मकुंडली त्यांना दिली.

आल्यापासून त्यांच शशिकांतच्या हालचलींकडे लक्ष होते अन् थोड्यावेळानेते म्हणाले-

" शशिकांत मला माहितेय तुम्हीतुमच्या इच्छे विरुध इथे आलात. मी काय सांगतो ते मनाची पाटी कोरी ठेवून सर्व ऐका अन् पटल नाही तर सोडूनद्या."

शशिकांतने नाइलाजाने मान डोलवली अन् म्हणाला ,
" पिहु बरी होईल अशी मला खात्री वाटते आहे अन्तिच्या करीयर बद्दल मला काही विचारायचे नाहीए कारण मी तिच्या C.A.T (करीयर आप्टिट्यूड टेस्ट्स) करून घेतल्या आहेत अन् त्यातल्या७ ही विषयांमध्ये तिचे उत्तम स्कोर्सआले आहेत अन् ती आय.आय.टी लाच अड्मिशन घेणार. मी तिच्या स्कोर्सच्या शीट्स देखील आणल्या आहेत." शशी ठामपणे म्हणाला.
" हे उत्तम केलात. आता ते कागद बाहेर काढा अन्हातात ठेवा म्हणजे कुंडलीच रीडिंग अन् तुमचे स्कोर्स टॅली होता आहेत की नाही ते कळेल."

शशिकांतला त्यांचे हे उत्तर अनपेक्षित होत. कुठलाही ज्योतिषीनेहमी अपलच घोड दामटावत असतो. हे प्रकारण काहीतरी वेगळच होत.
"म्हणजे मी समजलो नाही " ?
"अहो मोघे अस पहा, तुमच्याकडे एक डेटा तयार आहे, अन् आता जन्म कुंडली,प्रश्ना कुंडली काय सांगते ते पहा अन् तुम्हीच ठरवा काय?" शशिन होकारर्थी मान हलवली.

"अधी पहूच्या तब्ब्येती बद्दल- ती लवकरच बर होईल ह्यात काही शंका नाही. तिलाजपाव
लागेल एवढच. अन् तिच्या करीयर बद्दल सांगायच तर - ज्योतिष , टॅरो किंवा भविष्याचाआढावा घेणार इतर कुठलही शास्त्रअसो त्यातले जाणकार भेटले तर योग्य दिशा मिळते.
कितीतरीवेळेला मला अस आढळून आलय की करीयरचीनिवड, शिक्षण शाखेची निवड करताना ज्योतिषशास्त्रालाजास्त प्राधान्य द्याव कारण ग्रह, राशी, नक्षत्र तुमच्या कुंडलीचेगुपित सांगतात , योग्य दिशा दाखवतात. अर्थातच कुंडलीची भाषा आपल्याला अवगत असली पाहिजे.
दुसर अस की एखाद्यनेठरवल की त्याला सचिन तेंडुलकर व्हयायच तर त्याची क्षमता, बुद्धी, पैसे, उत्तम शिक्षक हे असायलाहव पण हे सर्व जरी मिळाल तरी तो घेऊन आलेल्या भाग्याची झोळीच जर फाटकी असेल तर पैसा, परिश्रमाची ठिगळ कितीही लावली तरी सर्व निष्फळ ठरते.
ज्योतिषशास्त्राच्यामाध्यमातून आपल्याला एखाद्या प्रश्नच उत्तर चहु बाजून बघता येत. नशीबाची साथ-प्रयत्नांची जोड- इच्छा- क्षमता ह्या सर्व गोष्टी अभ्यासता येतात जेणेकरून आपल्याला योग्य उत्तर मिळू शकत अथवा योग्यउत्तरा जवळ होचण्यासाठी ह्या शास्त्राची मदत होते ". गोसव्यांचा हा मुद्दा अगदी योग्यआणि पटण्यासारखा होता.

" तुम्ही म्हणताय ते पटल मला पण पहूच्या पत्रिकेतह्या गोष्टींचा मेळ बसतो का?"
" शशिकांत मी तुम्हाला अगदी सोप्या अन् समजेलअश्या भाषेत सांगतो.

आपल्या सूर्यमंडलातील सातही ग्रहांचा,व मनुष्य स्वभाव- त्याच आयुष्य - मन - शरीर - कर्म ह्याचा योग्य संबंध प्राचीन ऋषिमूनीनी अभ्यासला अन्ह्या सर्वांचे नात प्रस्थापित केल. जस रवि हा आत्म्याच प्रतीक आहे- सूर्यप्रमाणे स्वयांप्रकाशित-चंद्र हा मनाचा कारक , मनाच्या अवस्था दर्शवतो व नेपच्यून हा अंतर्मानाचा कारक आहे. तसेच ग्रहांनी घातलेलापोशाख म्हणजे राशी अन् त्यांना राहायला बारा घर- ह्या अशा चौकटीत हे शास्त्र बसवल आहे.
तुमच्या मुलीच्या पत्रिकेतचंद्र हा एकीकडे तिला कलेत व एहिक सुखात मदत करणार आहे तिथेच अंतर्मानाचा कारक ग्रह नेपचून हा मानसिकदृष्ट्या वेळेप्रसंगी क्लेश देतो आहे. शुक्र हा स्त्री ग्रह तुमच्या मुलीच्या पत्रिकेत स्ट्रॉंग आहे.शुक्र म्हणजे कला-सौंदर्य-तारुण्य-प्रेम- नाव निर्मिती ह्या शुक्राला योग्य साथ देणारे ग्रह गुरू-रविह्यांची स्तिथि उत्तम आहे. तिला उत्तम बुद्धी- उत्तम आकलन शक्ति आहे अन् कार्य तडीस नेण्यासाठी मंगळाचा जोशव शनीची चिकाटी आहे हेपत्रिका हातात घेतल्यावर लगेचसमजत. तुमची मुलगी जे करीयर निवडेल त्यात तिला यश मिळेल पण मूळ कुंडली - नक्षत्र व इतर गोष्टीबघता तुमच्या मुलीने क्रियेटिव- कले मध्ये करीयर करव त्यात तिला उत्तम यश
आणि समाधान मिळेल अस रीडिंग येतय.. आता मि. शशिकांत तुमची आप्टिट्यूड टेस्ट्सकाय म्हणते ?"
"अं.....काय" शशी एकदम भानावर आला. एवढ सोप, सुंदर शब्दात कोणीही त्याला समजवल नव्हत.
" शशिकांत , अहो तिचा करीयर रिपोर्ट वाचा " गोसावी म्हणाले.
" पिहु has scored extremely good scoresin almost all ability tests . The carreer options that she can take are :-architechture, designing, performing arts & any other art faculty ".

" आपण तिच्या कुंडलीप्रमाणे तिच्या शाखेची निवड कोणती असावी ते मी तुम्हाला सांगितल. तुम्हाला तुमच्या मुलीला कुठे पाठवायच आहे?"
"आम्ही दोघे आय.आय.टी.यन आहोत अनघाचा भाउ सर्जन आहे. माझी अशी तीव्र इच्छा आहे की तिने आय.आय.टी. मधूनच इंजिनियर व्हाव ." शशी न 'च' वर जास्त भर दिला. गोसावी हसले.
" एक वडील ह्या नात्याने मला तुमच्या भावना काळतात पण तुमच्या मुलीला कशात करीयर करायच आहे?"
" तिला गाण्यात करीयर करायच, पार्श्वगायिका व्हायचय."
" मग बिघडल कुठे ? पैश्याची अडचणतर मला काही दिसत नाही."
" अडचण नाही पण..?"
"मुलांच शिक्षण झाल्यावर त्यांना २/३ वर्ष त्यांची वाट शोधायला आपण अवधी दिला पाहिजे त्यानंतर नाही. तोपर्यंत त्यांनी अपल्या पायावर उभ राहील पाहिजे. तिची जन्म कुंडली व प्रश्न कुंडली सांगते की तिचा कंठ (गाण्याचा गळा ) उत्तम आहे त्यातून आर्थिक उत्त्पन्न मिळणार आहे अन् सर्वात महत्वच म्हणजे तिला त्यातून समाधान मिळणार आहे. चढ उतार आहेत, ते तर सर्वांच्याच आयुष्यात असतात पण यश आहे एवढ मात्र नक्की."
"पण मग कुठेतरी अस ऑड वाटत की आम्ही उच्च शिक्षीत, अन् आमची मुलगी उच्च शिक्षीत नाही "
" अन् तिने अस बर-वाईट केल्यावर काय वाटत ? अहो शशिकांत, तुमच भाग्य समजा की अजून वेळ गेलेली नाहीए. वेळीच ह्या गोष्टींचा उलगडा झालाय म्हणून बर."
शशिकांत काहीच बोलला नाही.
"अहो तुमच्या म्हण्याप्रमाणे पिहु जर आय.आय.टी. ला गेली तर तिला आनंद, समाधान मिळणार आहे का?"
शशिकांतन नाकारार्थी मान हलवली.

" तुमच उत्तर तुम्हाला मिळालाय मिस्टर शशिकांत. ह्याचा लवकर स्वीकार करा म्हणजे तुम्ही उगाच जो स्वता:ला त्रास करून घेताय तो होणार नाही. तुम्ही मुलीचे वडील आहात तसेच उत्तम पालक व्हायला शिका. एक बाप ह्या नात्याने सांगतो तुम्ही अन् तुमच्या मुलीने आपापल्या रागाचे फटाके फोडण्यापेक्षा तीच उर्जा कलात्मकतेकडे वळवा, तुमच्या दोघांचा उत्कर्ष होईल. तुमच तुमच्या मुलीवर प्रेम आहे, तिची काळजी आहे म्हणूनच तुम्ही इथे आलात हे मी जाणतो , सगळ ठीक होईल काळजी करू नका.
अन् हो, आता सल्ला पुरे ...पिहुला ही मियाँ तानसेनच्या दुर्मिळ रागांची सीडी माझ्याकडून भेट. तुम्हा दोघांनाही सुभेच्छा अन् पिह्युला उत्तम आशीर्वाद. नमस्कार"
परत जाताना शशिकांत गप्प गप्प होता. फारस काही बोलत नव्हता. घरी पोहोचल्यानंतर नाहमीच्या आविर्भावात शशिकांतनी हाक मारली 'अनघा ss ' ' पिहु sss' ....
" कायहो, काय झाल ?"
" पिहुला बोलव "
पिहु हॉल मध्ये आली.
" अरे, ह्यावेळेस 'दिवाळी पहाट ' च्या कार्यक्रमाला जायचाय की नाही?"
" अं...? " दोघी उडाल्याच.
" काय ग, कुठल्या कार्यक्रमाला जायच पिहु?" शशिकांत न विचारल.
"......."अनघा
"......"पिहुने अनाघकाडे 'बाबा बरा आहे न?''' ह्या आविर्भावात बघितल.
" बर, मीच सांगतो.. ह्या वेळेस आपल्याच घरी दिवाळी पहाट चा कार्यक्रम अपण करू" शशिकांत म्हणाला
" म्हणजे ?" पिहुन विचारल.
" पिहु बेटा आपण तुझ्या गाण्याचा कार्यक्रम ठेऊ, तुझ्या सरांना बोलवू, जवळचे नातेवाईक अन् गोसावी काका" दोघी चक्रवल्या.
" अग अस काय करतेस? तुला पार्श्वगायिका व्हायचय न? मग किती तयारी झाली आहे ते नको का आम्हाला कळायला ?"
" बाबा ss " करत पिहून शशिकांतला मिठी मारली.
" बाबा, यु आर सिंप्ली ग्रेट . तू सॉलिड सर्प्राइज़ देतोस हं."
" मग, बाप कोणाचा आहे . अं s s ?"
सर्वजण जोरात हसले अन अनघाने देवघरात जाऊन देवासमोर साखर ठेवली अन् नमस्कार केला.

मनोज जोशी.

गुलमोहर: