एक प्रवास... कधीही न संपणारा...

Submitted by आयडू on 12 August, 2008 - 11:05

संध्याकाळी ६-६:३० ची वेळ तो नेहमी प्रमाण उलटा चालला होता भायखळ्याला. खरतर दादर वरून ट्रेन पकडण जास्त जवळ होत पण सोयीच नव्हत.. कारण दादरला गाडीत चढता येण म्हणजे पुण्यात गाडी चालवण्यासारखच होत एकवेळ पुण्यात गाडी चालवता येईलही... पण दादरहून गाडी पकडण म्हणजे नसलेल्या एनर्जीचा र्‍हास ( तरी तो दररोज संध्याकाळी निघताना एनर्जी प्यायचा ही..)

तर आजही नेहमी सारख तो स्लो लोकलने भायखळ्याला उतरला आणी उलट दिशेने जाणार्या जलद लोकलची वाट पाहात राहिला... तसा वेळ बराच होता आणी भूकही खूप लागली असल्यान हल्दीराम चिवडा विकत घेतला.. एक पाकीट खिशात टाकून एक त्यानं तिथच फोडल आणी खात सुटला.. तिथे एक गरीब लहान मुलगा आणी मुलगी त्याच्याकडे पैसे मागत होते खाण्यासाठी... झटकन त्याचा हात सवयीप्रमाणं पाकीटाकडं गेला आणी तो पैसे काढून त्यांना देणार इतक्यात त्यान विचार बदलला... [Banker to the Poor त्यान नुकतच वाचल होत. कॉलेज मधे पॉवरपॉइंटवर प्रेझेंटेशनही केल होत..] त्याचाच परिणाम असावा.. आता तो त्या मुलांना त्यांच नाव, गाव, शिक्षण वगैरे विचारत होता.. शाळेत जाता की नाही वगैरे प्रश्न विचारत होता मुलही सांगत होती जमेलतसं काही पैसे मिळतील ह्या अपेक्षेनं... आणी नेमक त्यानं काय केल तर त्या दोघांना दोन वडापाव खायला दिले... आणी दोन चॉकलेट्स सुद्धा! कदाचित त्या मुलांना हे सारं अपेक्षित नसावं एवढं सगळं झाल्यावर ती मुलगी रडवेल्या स्वरात त्याला म्हणाली काही पैसे द्या त्याशिवाय घरी जाता येणार नाही... त्यानं विचार केला आणी त्या दोघांना ५-५ रू. दिले.

एवढ्यात त्याची गाडी आली नेहमी प्रमाणं तो चालत्या गाडीत चढायला सोप जाव म्हणून लेडीज फर्स्टक्लास जवळ उभा राहिला... गाडी स्लो होत गेली आणी तो चटकन गाडीत शिरला आज मात्र कमाल झाली त्याला थेट आत पर्यंत पोहचता आलं बसायला जागा मिळणार नव्हतीच पण आज तो एकदम आत व्यवस्थित उभा राहू शकला.. गाडीनं वेग घेतला आणी तो स्थिरस्थावर झाला.. हल्दीराम चिवडा एका हातात आणी Puneet sriwastava च The "Path - Breakers"एका हातात अश्या स्थितीत तो उभा होता इतक्यात त्याच लक्ष लेडीज फर्स्टक्लास मधल्या एका अत्यंत सुंदर अश्या तरूणीकडं गेलं [सुंदर.. अस त्याच म्हणण प्रत्येकाच परसेप्शन वेगळ असतं..] ती ही त्याच्याकडेच बघत होती आणी अचानक त्याला आठवल की मगाशी ही तीच मुलगी होती जिनं त्या दोन लहान मुलांना 'चल हट भिकारी... न जाने कहॉं से आते है' असं उडवून लावल होत आणी आता ती त्याच्याकडे पहात होती... आणी तो ही पहात होता फार छान दिसत होती ती त्या संपूर्ण पांढर्या चुडीदारमधे.. सोनेरी वर्क केल होत आणी ते फारच उठुन दिसत होतं. त्यानं नीट बघीतल तिच्या हातात सानियाच 'आवर्तन' होत.. [तो मनात म्हणाला अरे वा ही मुलगी मराठी दिसतेय तर..] तिचा चेहरा अत्यंत गोड दिसत होता... एक तीळ होता नाकावर आणी तिच्या डाव्या गालाला खळी पडत होती.. एक बट येत होती चेहर्‍यावर ती ती सारखी उजव्या हातानं मागे करीत होती.. [ एकीकडे त्याला प्रश्न पडला की एवढी छान दिसणारी मुलगी त्या दोन गरीब मुलांना चल हट... असं कस काय फटकारू शकते?? केवळ पैसे मागितले म्हणून? की नेहमीच मुलींना असल्या लोकांकडून होणार्‍या त्रासामुळे? की फक्त आपल्याकडे आज पैसे आहेत आणी त्या दोघांकडे नाहीत म्हणून? की टिपीकल मुलींना असलेला फुकाचा गर्व??] त्याच्या मनातल्या प्रश्नांच वादळ काही संपत नव्हत आणी Banker to the Poor वाचल्यावर तो चुकुनही कुणाला रोख पैसे देत नसे जमेल तशी मदत तो करत होता... अजूनही तो भिकारी हा शब्द विसरला नव्हता... भिकारी केवढा भयानक अर्थ होता ह्या शब्दात अस त्याला वाटलं.. गरीब कोण नसत? नात्यांच्या बाबतीत, पैश्यांच्याबाबतीत, पण भिकारी?? असाच विचार करता करता त्याला बसायला जागा मिळाली.. नेहमीप्रमाण तो चार स्थानकं बसला आणी दुसर्‍याला बसायला जाग द्यावी म्हणून उठला... पुस्तक बंद करून उभा होता आज त्याला वाचायलाच जमल नाही सारख तोच विचार होता त्याच्या मनात कोण भिकारी नाही या जगात??

त्याच स्टेशन आल आणी तो उतरला.. बघतो तर काय ती मगाचचीच मुलगी ही उतरत होती एकदा त्याला वाटत होत की तडक जाउन विचारावच तिला पण नंतर विचार आला जाउदे जे तिला करायच होत ते तिनं केल आता विचारून काय उपयोग?? अश्या विचारात तो पुढे जात असताना मागून कुणीतरी त्याला हाक मारली excuse me... तो मागं व ळू न पहातो तो काय तिच मुलगी.. तिन बोलायला सुरूवात केली.. actually मगाशी तू जेंव्हा त्या मुलांना खायला दिलस नं तेंव्हा मी तिथच होते.. तू त्याना खायला दिलस आणी वर पैसेही?? का?? कशासाठी?? अरे हे भिकारी दररोज सगळ्यांना त्रास देतात..
तो: भिकारी नाही तुला गरीब म्हणायच का? आणी पैश्याचच म्हणशील तर मी ते देणारच नव्हतो पण त्यावेळी दुसरं काहीही देउ शकलो नसतो म्हणून दिले पैसे..

मग असच इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत असताना एकमेकांची ओळख झाली.. आणी त्यान तिला म्हटल की खूप मोठा प्रश्न आहे हा सध्यातरी इथंच थांबूया.
ती: बर चालेल पण आत्ता ते "पाथब्रेकर्स" देशील का रे वाचायला?
तो: हो नक्कीच माझं वाचून संपल की देईन.. तुला पाहिजे तर "Banker to the poor" वाच सध्या.. तुझ्या जवळ जवळ सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत ह्यात...

गुलमोहर: 

छान आहे लेख पण थोडं अजुन विस्ताराने लिहिलं असतं तर जास्त परिणामकारक वाटला असता.
"Banker to the poor" हे पुस्तक मी वाचलेले नाही. काय आहे या पुस्तकात?

धन्स्!
हं बरोबरच आहे तुझ सुप्रिया अजुन पुढची भेट बाकी आहे गं Happy

आणी Banker to the poor हे बांग्लादेशमधील Grameen bank वर आधारीत पुस्तक आहे! बाकी माहिती उद्या देतो.
दीपू द ग्रेट
"आज कल पाँव जमीं पर नहीं रहते मेरे"

कुलदीप,
पुढचे लेखन अजुन व्हायचे असेल तर लेखनाखाली क्रमशः असे टाक म्हणजे लोकांचा गैरसमज होणार नाही.

क्रमशः आहे तर. कारण, छान चाललय... अजून चालूदे असं वाटणारं. कुलदीप, मस्तं लिहितो आहेस.

सुंदर! पुढचे भाग लवकर टाका.

छान आहे!!!
आवडली.

त्रिवार धन्यवाद!!!
रूनी (रुपालीताई),
पुढचे लेखन अजुन व्हायचे असेल तर लेखनाखाली क्रमशः >>> अहो रूनी आलय लक्षात पण थोडसं उशीरा.. Sad पुढचा भाग टाकू की नको अश्या संभ्रमात होतो मी.. अन् क्रमशः टाकायच राहूनच गेल.

दाद(शलाकाताई),
छान चाललय... अजून चालूदे असं वाटणारं>>
फारच छान "दाद" दिल्येत तुम्ही Happy पुढचा भाग टाकतोय मी लवकरच...
मराठमोळी(म्हणजे रश्मीताई नं?) अन् साक्षी(साक्षीच का?)
धन्यवाद!

दीपू द ग्रेट
"आज कल पाँव जमीं पर नहीं रहते मेरे"

छान रे कुल्दीप्या..
--
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!

दिप्या लवकर टाक की पुढचा भाग.. नाही तर तुझी कथाही नंदूच्या कथांसारखी अर्धवट रहायची...
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

अरे नाही आजच टाकीन म्हणतोय... तत्पूर्वी Banker to the poor बाबत थोडसं... टाकतोय!

हा कालचा म.टा. तला लेख:
दुवा: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3374519.cms

जॉन कोलासो

स्वयंरोजगारासाठी तारणाशिवाय छोट्या रकमेची कर्जे दिल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्येचाही प्रश्न सुटू शकेल, असा विचार आता बळावू लागला आहे!
*********
बँकिंग क्षेत्रात सध्या बदल घडत आहेत. त्यामध्ये महत्त्वाचा बदल म्हणजे 'बँकिंग द अनबँक' असे नवे सूत्र अमलात येत आहे. त्यामुळे यापूवीर् उपेक्षित राहिलेल्या गरीब, दरिदी वर्गाला, विशेषत: ज्यांच्याकडे कर्ज घेण्यासाठी तारण नाही, अशा महिलांकडे बँका आता लक्ष देऊ लागल्या आहेत. अर्थात या नव्या संकल्पनेचे निर्माते आहेत नोबेल पुरस्कार विजेते आणि बांगला देशातील ग्रामीण बँकेचे संस्थापक प्रा. महमद युनुस.

बँका नेहमी ज्यांच्याकडे कर्ज घेण्यासाठी तारण आहे, म्हणजे कोणत्यातरी स्वरूपात मालमत्ता आहे, म्हणजे श्रीमंतांनाच कर्ज देतात. कारण, यामागे त्यांची संकल्पना अशी आहे की, कर्जदाराने कर्ज फेडले नाही तर त्याची मालमत्ता ताब्यात घेता येते. बँका आपली सोय पाहून कर्ज देत असल्यातरी, प्रत्यक्षात मालमत्ता तारण ठेवूनही कर्ज बुडविणाऱ्या कर्जदारांची संख्या मोठी आहे. कर्ज घेऊन ते प्रामाणिकपणे फेडण्याची प्रवृत्ती असणाऱ्या गरीब, निराधारांना, विशेषत: महिलांना कर्ज देण्याआड बँकांचे नियम आड येतात. या नियमांनाच आड करून दारिद्यात खितपत असलेल्या महिलांना कर्ज दिल्यास कर्जपरतफेडीचे प्रमाण ९८ टक्के राहते, असे सप्रमाण प्रा. युनुस यांनी 'ग्रामीण बँके'च्या माध्यमातून सर्व जगाला दाखवून दिले. इतकेच नव्हे तर आतापर्यंतच्या सर्व अर्थशास्त्रज्ञांनी बेकारी हटविण्यासाठी रोजगारनिमिर्तीवर म्हणजे नोकऱ्यांवर भर दिला आहे, स्वयंरोजगाराकडे दुर्लक्ष केले आहे, ही चूकही दाखवून दिली आहे.

अत्यंत गरीब महिलांना स्वयंरोजगारासाठी सूक्ष्म पतपुरवठा करण्याच्या या यशस्वी प्रयोगाची माहिती प्रा. युनुस यांनी 'बँकर टू द पुअर' या त्यांच्या आत्मचरित्रात दिली आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रा. शरद पाटील यांनी 'बँक गरिबाच्या दारात' नावाने उत्तमरीत्या केला आहे.

स्वयंरोजगाराद्वारे पोट भरणाऱ्या दरिदी वर्गाला कर्ज मंजूर करण्यास बँक व्यवस्थापकाने नकार दिल्याने प्रा. युनुस यांचा त्याच्याशी वाद झाला. या वादाची झलक पुस्तकात देण्यात आली आहे.

प्रा. युनुस यांनी या अधिकाऱ्यास सांगितले की, ''तुम्हाला कर्जाऊ दिलेले पैसे परत येण्याशी तुमचा संबंध आहे, जर पैसे परत मिळणार असतील तर तुम्हाला तारणाची जरुरी काय?''

'' अर्थात आमचे पैसे आम्हास परत मिळाले पाहिजेत, त्याचबरोबर आम्हाला तारणाची आवश्यकता आहे, कारण ते आमचे पैसे परत मिळण्याची हमी असते.''

'' मला तुमच्या म्हणण्याचा अर्थ कळत नाही. ते अत्यंत दरिदी लोक रोज बारा तास काम करतात, त्यांना पोट भरण्यासाठी व्यवसाय करून पैसा मिळवावा लागतो. तुमचे पैसे परत देण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही, कारण पुन्हा तुमच्याकडून त्यांना पैसे हवे आहेत. ते मिळाले नाहीत तर ते जगू शकत नाहीत आणि हेच तुमचं सर्वात उत्तम तारण आहे, त्यांचे जीवन.''

'' प्राध्यापकसाहेब, तुम्ही आदर्शवादी आहात. तुम्ही पुस्तकांच्या आणि सिद्धांताच्या जगात वावरता.''

'' जर तुमचे पैसे परत मिळणार असतील, तर तुम्हाला तारणाची गरज काय?''

'' तो आमचा नियम आहे.''

तर असा बँकिंग नियम प्रा. युनुस यांनी बदलण्यास बँकांना भाग पाडले. दारिद्यात जीवन कंठणाऱ्यांना विशेषत: महिलांना स्वयंरोजगारासाठी छोट्या रकमेचे कर्ज दिले तर त्याद्वारे या महिला आपल्या कुटुंबास दारिद्यातून बाहेर काढतात आणि त्याचवेळी कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे करतात. त्यांच्या या सिद्धांतास पूरक असा लेख एचएसबीसी इंडिया बँकेच्या सीईओ नैना लाल किडवाई यांनी 'इकॉनॉमिक टाइम्स'मध्ये लिहिला आहे. 'फिनॅन्शियल इन्क्ल्युजन अँड डेमोक्रॅसी' या शीर्षकाखालील लेखात त्यांनी 'बँकिंग द अनबँक' सूत्र मांडले आहे.

किडवाई यांनी म्हटले आहे की, अर्थसाह्यापासून आतापर्यंत वंचित राहिलेल्या वर्गाला संघटित वित्तीय यंत्रणेचे भाग बनविणे आवश्यक आहे. असे केल्याने या वर्गाला मिळणाऱ्या फायद्याची माहिती करून देणे आवश्यक आहे. अर्थसाह्य मिळणाऱ्या वर्गात त्यांचा सहभाग झाला म्हणजे आथिर्क विकासाचा कार्यविस्तार अशा उपेक्षित वर्गापर्यंत पोचेल. त्यांच्याकडे अधिक पैसा आला म्हणजे तेही बचत करतील आणि ही बचत बँकेकडेच जाईल, परिणामी बँकेकडेच्या ठेवी वाढतील, त्यामुळे बँकांना उत्पादनासाठी अधिक अर्थसाह्य करणे शक्य होईल व त्याच बरोबर अथिर्क विकास साधण्यास मदत होईल.

यासंबंधी किडवाई यांनी गुजरातमधील गौरीबेन या महिलेचे उदाहरण दिले आहे. दारिद्य व उपेक्षित कुटुंबात असलेली ही महिला यापूवीर् नवऱ्याची पत्नी व पुढे मुलांची आई म्हणून ओळखली जात असे. परंतु, तिला बँकेचा हात मिळाला, स्वयंरोजगारामुळे चार पैसे मिळवू लागली आणि आज ती 'गौरीबेन' नावाने ओळखू लागली आहे, तिला स्वत:ची ओळख देण्यासाठी दुसऱ्याची गरज लागत नाही!

हाच धागा पकडून किडवाई यांनी या लेखात म्हटले आहे की, देशभर होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे मुख्य कारण म्हणजे त्यांना कमी व्याजदराने कर्ज न मिळणे हे होय. ग्रामीण भागात अद्यापही सावकरांचे वर्चस्व आहे, तर नाहक तरतुदी आणि कर्जवसुलीची अडचणीच्या जंजाळात बँका अडकलेल्या आहेत. यातून मार्ग काढणे आवश्यक आहे.

किडवाई यांच्या प्रमाणे सर्व बँकप्रमुखांनी आथिर्कदृष्ट्या मागासलेल्या वर्गाला स्वयंरोजगारनिमिर्तीसाठी छोटी छोटी कर्ज मंजूर करण्याचा विधायक दृष्टिकोन स्वीकारला तर देशातील गरिबी नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.

"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.

अन् साक्षी(साक्षीच का?)>>>>>>>>>>>>>>नाही, साक्षी(मंजुषा).

कुलदीप, छनच.
पुधच्या भागांची वाट बघतेय.
अनघा