आजची शेकोटी

Submitted by महेश सावंत on 1 November, 2011 - 02:40

रो़जच्या प्रमाणे आजचा विषय काहि खास नाही होता .प्रमोदने मला विचारले की तुजे कूट पर्यन्त आले .मी समजलो नाही .मग तो बोंला तुजा लग्नाचे यार त्यावर मी त्याला म्हणालो की पौष महिना आहेना अजुन काहि बोलणे नाही झाले आहे . पौष महिना संपले त्या नंतर समजेल .मग माझ्या गाडीचा विषय आला. त्याने मला विचारले तुजी गाड़ी कधी येते मी म्हणालो त्याचेच काम चालू आहे .मग हळूहळू कट्टावर सर्वजण जमू लागले विनायक ,हरेश,विलास,विकास,खोचरे काका, श्रीनिवास,सावंत काका, आणि सर्व बेवडे मण्डली ही मी इथे कुणाची नावे नाही लिहिणार .माझ्य मित्त्रना माहित असतीलच ती नावे.

दादा खोचरे :- पुण्या वरून कधी आलस ?

मी :- म्हणालो रात्रि ११:०० ला .

दादा खोचरे :- मग दिवस भर दिसला नाहीस ?

मी :- झोपलो होतो .सकाळी लेट उठलो आणि सायबर मध्ये गेलो होतो .

खोचरे काका :- तुजा प्रवास कसा झाला ?

मी :- छान झाला .

खोचरे काका :-तिकडे थंडी होती का ?

मी :- हो भरपूर होतीना.

हरेश :- माझे पुस्तक नाही घेउन गेलास ?

मी :- नाही आठवण नाही झाली .

त्याने माझा कडील कॅमेरा घेऊन फोटो पहाण्यास सुरवात केली. मग सर्वांना शेकोटीची आठवण आली .

खोचरे काका :- आज शेकोटी नाही केली ?

प्रोमोद :- लाकुड दिसत नाही आहे कुठे ?.

खोचरे काका :- शाळेच्या मागच्या बाजूला फेकले आहे कुणी तरी

मी :- मला माहित आहे . माझ्या शिवाय इकडे कधी शेकोटी होणार नाही मी दोन दिवस नाही होतो
ना इकडे यामुळे कोणी तरी ते लाकुड शाळेच्या मागे फेकले असणार

खोचरे काका :- हे तू बरोबर बोलस तू नाही होतास ना मग शेकोटी कोंण करणार ?

मग काय प्रमोद लगेच म्हणाला महेश आपण जाउन ते लाकुड घेउन परत येऊ .मी ही तयार झालो. मग ते लाकुड परत आपल्या मूळ जाग्यावर आले . मग काय माझे रोजचे काम लाकडाला पेटवायला सुरवात केली .

हरेश :- महेश तू काढलेले फोटो छान आहेत . मला पण घेउन चल ट्रेकला मला पण आवडेल

तुझ्या बरोबर यायला आता परत जाशील तेव्हा मला नक्की संगा हा .

मी :- हो नक्की सांगेन तुला

मग मी जेवायला गेलो . प्रवास जास्त झाल्या मुळे थकवा जाणवत होता .जेवण झाल्यावर लवकर झोपायचे होते . पण कट्टावर जायचा मोह काहि आवरला नाही . मी तिकडे गेलो तेव्हा सर्वजण जेवण करुन आले होते .

खोचरे काका :- जेवण झाले का ?

मी :- हो जेवण झाले

मग थोड्या इकडे तिकडेच्या गोष्टी झाल्या मग एक एक करुन सर्वजण झोपायला जाऊ लागले .

खोचरे काका:- महेश शेकोटी विझवायला पाणी घेउन ये आपण पण जाउया झोपायला .

मी :- हो मी पाणी घेउन येतो तुम्ही जरा थांबा मी आलो .

मी पाणी घेउन आलो आणि ती शेकोटी विझवली . मग दोघे जण ही आपापल्य घरी निघून गेलो. अशा तरेने आजची शेकोटी विझली .

रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशिबवान तर सर्वच असतात, नशिबालाही बदलवणारा एखादाच असतो. जिँकणारे बरेच असतात पण हरुन जिँकणारा एखादाच असतो. (आनंद)

महेश सावंत

गुलमोहर: 
शब्दखुणा: