झपाटलेला वाडा-३

Submitted by सचिन७३८ on 30 October, 2011 - 04:14

झपाटलेला वाडा-१ http://www.maayboli.com/node/30160
झपाटलेला वाडा-२ http://www.maayboli.com/node/30174
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
असेच दिवसामागून दिवस जात असतांना एके दिवशी गावकऱ्यांना विश्वास घोटेवार आणि त्यांचा मुलगा सुनील दोघे वाड्याबाहेर पटांगणात मृतावस्थेत गावकऱ्यांना आढळले. दोघांचेही विस्फारलेले उघडे डोळे, त्यात साठलेली मूर्तिमंत भीती, खांद्यापासून निखळलेले दोन्ही हात, कमरेपासून खाली शरीराचा तुटलेला अर्धा भाग आणि मानेजवळ विशिष्ट टोचल्याच्या खुणा. हे सर्व बघून गावकऱ्यांच्या काळजात चरर्र झाले. सर्वांनी हळहळ व्यक्त केली. आता अरुणाचे कसे होणार ह्याचा विचार सर्व गावकऱ्यांच्या मनात आला. अरुणा? ती कोठे आहे? कारण दोघांचे प्रेत सापडल्यापासून अरुणा गावकऱ्यांच्या दृष्टीस पडली नव्हती. मग गावकऱ्यांनी वाड्यात शोध घेतला असता, एका खोलीत त्यांना त्यांना अरुणा सापडली.

अरुणा? नव्हे. काळाकुट्ट खवीस असाच तिचा अवतार होता. चेहरा काळाठिक्कर, डोळ्यांत पाशवी भाव उतरलेले, अस्ताव्यस्त केस, शिवाय एका मोठ्या वाडग्यात ठेवलेले रक्त, एका बाजूला असलेली उभी आक्राळविक्राळ मूर्ती, त्या मूर्तीच्या जिभेवर विशिष्ट मंत्राचा उच्चार करत ती त्या वाडग्यातील रक्त चढवत होती. या स्थितीत गावकऱ्यांनी अरुणाला पाहिले. झालेला प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. गावकऱ्यांनी तत्क्षणीच अरुणास तेथल्या तेथे लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ठार केले आणि त्या खोलीस कडी-कुलूप लावले.

आता प्रश्न होता घोटेवार पिता-पुत्रांच्या अंत्यसंस्काराचा! घाईघाईने त्यांचे अंत्यसंस्कार उरकून गावकऱ्यांनी शहरातील विश्वास घोटेवारांच्या बहिणीच्या सासरी कळवून जाधव कुटुंबियांना कळवून बोलावून घेतले. अर्चितच्या आई-वडिलांना सुनील आणि अरुणाच्या लग्नाबद्दल जरी माहिती असली तरी खोलीतल्या अघोरी प्रकारची गावकऱ्यांनी त्यांस काहीच कल्पना दिली नव्हती. शेवटी त्यांनी अरुणाबद्दल गावकऱ्यांकडे अरुणाबद्दल विचारणा केल्यावर "ती बेपत्ता आहे" असे मोघम उत्तर देऊन तो विषय तेथेच संपवला. अंत्यसंस्कारानंतर वाड्याचा मालक कोण? याबाबत कोणासही निर्णय घेता येईना. शेवटी गावकऱ्यांच्या पुढाकाराने वाड्याची चावी जाधव कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली.

जाधव कुटुंबीय परत आपल्या गावी गेले. पण येथे गावात "त्या" दिवसापासून खळबळ उडाली. कारण कोणत्याही ठिकाणी गावकऱ्यांना अरुणा दिसे आणि त्याच रात्री गावातील एकाचा तरी मृत्यू "त्या" विशिष्ट पद्धतीने पडलेला असे. अनेक अंगारे-धुपारे, देवर्षी, साधू, तांत्रिक-मांत्रिक झाले पण उपाय झाला नाही. शेवटी उरलेल्या गावकऱ्यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आणि एका दिवशी गावकऱ्यांनी गाव सोडले. मध्यंतरी दोन वर्षे गेली. पण गावात येण्यासाठी कोणीहि गावकरी धजावत नव्हते.

आणि २ वर्षांनी वाड्याची परिस्थिती पाहण्याच्या उद्देशाने अर्चित त्या गावात(?) नव्हे वाड्यात येऊन दाखल झाला होता.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

झटकन खिशातून रुमाल काढत अर्चितने तोंडावर ठेवला. "वाड्याची निगा ठेवणारी व्यक्ती ठेवायला हवी होती आपण", मनाशीच बोलत अर्चितने आपले सामान एका खोलीत ठेवले. खोलीत अतिशय धूळ साचली होती. त्यामुळे अर्चितने खोलीची साफ-सफाई केली आणि तो आपल्या जेवणाची व्यवस्था करू लागला. सोबत आणलेला डब्यातील जेवण जेवून वाड्याच्या पाठीमागे शेतीजवळील विहिरीतून त्याने पोटभर पाणी पिले आणि थोडे वाड्यात आणले. दिवाबत्तीच्या सोयीसाठी त्याने सोबत आणलेली मेणबत्ती बाहेर काढून ठेवली. रात्रीच्या जेवणासाठी थोडी डाळ आणि आणलेले तांदूळ त्याने बाजूला ठेवले. "च्यायला, विकून टाकायला हवा आपण वाडा. नाहीतरी ठेवलाय काय ह्या वाड्यात? राहायला यावे तर खेडेगावात राहावे लागते. आईने पण फार हट्ट करून वाडा कसा आहे हे पाहायला लावलाय. काहीच सोय नाही इथे. जाऊदे उद्या सकाळीच आपण निघणार आहोत इथून. एका रात्रीचा तर प्रश्न आहे इथे राहण्याचा." स्वत:शीच असे बडबडत अर्चित बोलत होता. पण खोलीच्या बाहेरही कोणीतरी होते कि जे त्याचे बोलणे ऐकत होते. बाहेर आता हळू-हळू सूर्य मावळत होता आणि अंधाराचे साम्राज्य दाटू लागले.

क्रमशः

गुलमोहर: 

अहो पटापट अन जरा मोठे टाका..आम्हाला म्हणजे कीमान मलातरी आवडतेय तर!!! एक वाचक आहे तुम्हाला.

चान्गली उत्सुकता निर्माण झाली आहे. लवकर लवकर भाग टाका. जरा मोठे मोठे टाका हो. आज शनीवार आहे. आजचा भाग मोठा असुदे

"आज शनीवार आहे. आजचा भाग मोठा असुदे"
:-)) मायबोलीवर प्रतिक्रीया वाचणे हाच एक मोठ्ठाआआअ आंनद्सोहळा असतो
मला तर प्रतिक्रियामहर्षी १, २, ३ असे पुरस्कार सुरू करावेसे वाटताहेत... :)))

उत्सुकता आणखी वाढविलात. पण
कथा पुढे सरकत नाही.
मोठे भाग लिहा. लहान भाग वाचण्यात मजा नाही.

JARAA LAVKAAR ANI MOTHA...LIHAA HO.....ADHI KAAY ZALE TECH AATHAVAAT NAAHI..PATKAN..

PARAT 1 LYA PASUN VAACHAVE LAGTE..:)

लिहा. आणि पूर्ण करा.. नाही तर इथे एक कथा अपूर्णच पडली आहे.. भयानक का कुठलीतरी
>>>>>>>>>> जामोप्या, ग्रहण पण सुटले नाही अजुन Wink

YAAA SAGALYAA KRAMASH: VALYAAN VAR BANDI GHATALI PAAHIJE......

NUSATHAA BAUDHIK CHHAL MAANDALA AAHE.. Happy

काहो भाऊ खूप कंटाळा येत असेल तर लेखनिस पाठवतो. पण हे क्रमशः नको.रहस्य कथा पूर्ण असेल तर मजा नाहितर लेखकाचा पराभव.
आमचा अंत पाहु नका व लवकर गोष्ट पूर्ण करा.

मस्तच. उत्सुकता वाढते आहे. सुंदर लिहता. लवकर पुढचा भाग टाका.
काहो भाऊ खूप कंटाळा येत असेल तर लेखनिस पाठवतो..........:फिदी:

<असेच दिवसामागून दिवस जात असतांना एके दिवशी गावकऱ्यांना विश्वास घोटेवार आणि त्यांचा मुलगा सुनील दोघे वाड्याबाहेर पटांगणात मृतावस्थेत गावकऱ्यांना आढळले.>
<घाईघाईने त्यांचे अंत्यसंस्कार उरकून गावकऱ्यांनी शहरातील विश्वास घोटेवारांच्या बहिणीच्या सासरी कळवून जाधव कुटुंबियांना कळवून बोलावून घेतले.>

<शेवटी त्यांनी अरुणाबद्दल गावकऱ्यांकडे अरुणाबद्दल विचारणा केल्यावर "ती बेपत्ता आहे" असे >
<एका खोलीत त्यांना त्यांना अरुणा सापडली. >

जरा जास्तच झालं..........वाचताना अडखळायला होतं.

कथा छान चाललीय्.......वर्णनही सुंदर....भाग मोठे आणि जरा लवकर प्रकाशीत करण्याची तसदी घ्या कृपया.

धन्यवाद!!