चर्चेचे फलित काय?

Submitted by दामोदरसुत on 25 October, 2011 - 06:31

या चर्चेचे फलित काय?
हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर !- लेखक : विशाल कुलकर्णी यांचा १२ ऑक्टोबर २००९ चा मायबोलीवर प्रसिद्ध झालेला लेख आणि त्यावरील चर्चा मी या महिन्यात वाचली. मुळात हा विषय समाजकारण/राजकारण या स्वरूपाचा आहे. महात्माजींनी भारतीय मुसलमान आपले नेतृत्व मान्य करतील या आशेने, तुर्कस्तानातील ’खिलाफती’सारख्या भारताशी असंबंधित धार्मिक चळवळीला कॉंग्रेसच्या दावणीला बांधून टाकले (त्याचा कांहीही उपयोग झाला नाही ही बाब वेगळी). मुसलमानांना खुष करण्याच्या त्यांच्या धोरणामुळे सहाजिकच मुसलमानांच्या मागण्या वाढत गेल्या. गांधिजींचा कलही त्यांना झुकते माप देण्याकडे होता असे खुद्द त्यांच्या अनुयायांनाही वाटत असे. अशा वेळी यात हिंदू समाजाच्या न्याय्य हक्कांचा बळी जाण्याचा धोका दिसू लागल्याने, पण सावरकरांना राजकारणात येण्यास त्याकाळी बंदी असल्याने त्यांनी ’हिंदुत्व’ ग्रंथ लिहिला. हिंदू समाजाचे न्याय्य हक्क राखले जावेत म्हणुन विस्कळीत समाजाला एकत्र बांधण्यासाठी केलेली ’हिंदुत्व’ ही व्याख्या होती. त्या व्याख्येत आस्तिक, नास्तिक, शैव, वैश्णव, सर्व जातीजमाती इत्यादी सगळेच सामावलेले होते. या व्याख्येला त्यावेळच्या राजकारणाचीही पार्श्वभूमी होती हेही लक्षात ठेवले पाहिजे. असे असले तरी मुसलमानांना त्यांचे न्याय्य हक्क देणेही त्यांना मान्य होतेच. मुसलमान/ख्रिश्चन त्यांच्या हिंदुत्वात नसले तरी त्यांच्या हिंदुराष्ट्रात त्यांना भारतीय नागरीक म्हणून त्यांची पूर्ण मान्यता होती.
कुलकर्णी यांच्या लेखावरील प्रतिसादांची संख्या ६०० च्या घरात पोचली आहे. बहुतेक सर्व विरोधी प्रतिसाद मन उद्विग्न करणारे आहेत. ते विरोधी आहेत म्हणून नव्हे, तर ’उचलली जीभ लावली टाळ्याला.’ या प्रकारचे आहेत आणि त्यामागील प्रेरणा मुख्यत्वे करून जातीय द्वेषाची किंवा आपले पुरोगामित्व दाखविण्यासाठी आहे. श्री. अक्षय जोगांनी कितीही पुरावे दिले तरी उपयोग होणार नाही. हे स्वच्छ दिसत असूनही कांही सावरकर चहाते आक्षेपांना उत्तरे देण्यात शक्ति घालवत आहेत असे मला वाटते. या चर्चेतील एकालाही मी व्यक्तिशः ओळखत नाही.
सावरकरांवर टीका करणार्‍यांमध्ये मुख्यत्वे करून कॉंग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट पक्षातील अनेक नामवंत आणि कांही दलित समाजसेवक होते आणि आजही आहेत. या सर्वांचे सावरकरांवरील आक्षेप आणि सावरकरांचे मूळ लिखाण यांचा अक्षरशः प्रचंड अभ्यास करून प्रा. शेषराव मोरे यांनी १५-२० वर्षांपूर्वीच लिहिलेल्या [अ] सावरकरांचा बुद्धिवाद व हिंदुत्ववाद, आणि [आ] सावरकरांच्या समाजकारणाचे अंतरंग या त्यांच्या पुस्तकांमध्ये असे म्हटले आहे की, "सावरकर विरोधकांनी त्यांच्या विचारांची प्रचंड मोडतोड केली आहे व त्यांच्यावर खोटे आरोप करणे आजही चालू आहे." या दोन्ही पुस्तकांमधून प्रा. मोरे यांनी या सर्वांना साधार, सविस्तर उत्तरे दिली आहेत. त्यांच्यापैकी कुणीही त्यांच्या या म्हणण्याचा प्रतिवाद केलेला दिसत नाही. त्यांच्या पुस्तकात प्रा. शेषराव मोरे लिहितात, "सावरकरांची मानहानी, बदनामी व अवमूल्यन करण्याबद्दल, असे करणाऱ्यांवर खटला भरता येऊ शकतॊ. पण अशा मार्गाचा विचार करण्याची पाळी येणे हाच या समाजाचा वैचारिक दर्जा किती खालावला आहे याचे निदर्शक होय. सावरकरांचे सामाजिक विचार म. फुले व डॉ. आंबेडकर यांच्या विचारापेक्षा कुठेही कमी क्रांतिकारक नव्हते आणि कार्य बहुजनांच्या हिताचे होते. त्यांनीच सावरकरांचा यासाठी गौरव करायला हवा होता. फुले, शाहू, आंबेडकर या परंपरेत त्यांना मानाचे स्थान द्यायला हवे होते . पण बहुजनांनी सावरकरांच्या समाजक्रांतिचा अभ्यासच केला नाही. सावरकर भक्तांनाही याची खंत दिसत नाही. "
जाता जाता आणखी उपलब्ध माहिती अशी की प्रा. मोरे हे खरे तर बी.ई. झालेले. साहित्य क्षेत्रात नरहर कुरुंदकरांसारख्या समाजवाद्याचे शिष्य. प्राध्यापकीही तंत्रशिक्षण क्षेत्रातील. पण २० वर्षे सेवा झाल्यानंतर निवृत्ती घेऊन त्यांनी चक्क कायद्याची डिग्री मिळविली. पण त्यांची पुस्तके त्या आधीच प्रसिद्ध झाली होती. प्रा. शेषराव मोरे हे सावरकर भक्त नसून सावरकर अभ्यासक आहेत हेही नमूद करतो. कृषिभूषण अप्पासाहेब पवार अंदमानात सावरकरांच्या कोठडीचे दर्शन घेऊन आले आणि त्यानंतर त्यांनी आदरपूर्वक सावरकर साहित्य वाचून काढले असे श्री प्रताप पवारांनी लिहिलेले आहे.
तात्पर्य सावरकरांच्या चाहत्यांनी आपली शक्ति सावरकरांचे कार्य आणि विचार तरूण वर्गापर्यंत पोचविण्यासाठी खर्च करावी. असे काम करणार्‍या सोलापूरच्या सावरकर विचारमंचाबद्दल मी मायबोलीवर अलिकडेच लिहिले होते. याशिवाय मी स्वतः [शशिकांत गोखले] सुमारे ४० फोटो असलेले एक ४० पानांचे ’अष्टविनायकदर्शन’ [ashtvinayakdarshan] या नावाचे विनामूल्य ई-बुक तरूण मुलांना सावरकरांच्या कार्याचा आणि विचारांचा परिचय व्हावा यासाठी लिहिले आहे. ते विनामूल्य डाऊनलोड करून घेऊन वाचावे असे मी आवाहन करतो.

गुलमोहर: 

चर्चेचे फलित इतकेच, की तिथे तात्विक पराभव होतो आहे हे दिसतांच या संस्थळावरिल जालीय वयः
सदस्य झाल्यापासूनचा कालावधी
4 आठवडे 12 तास
इतका असतांना
सामना मध्ये लेख छापून येणार्‍या 'समाजवादी' (*साहित्य क्षेत्रात नरहर कुरुंदकरांसारख्या समाजवाद्याचे शिष्य* म्हणजे काय? साहित्यात समाजवादी अन इतर वेळी हिंदूत्ववादि काय?) शेषराव मोरे यांचा संदर्भ देत, वेगळे बा.फ. निघतात. या धाग्याची रिक्षा अद्याप फिरली नाही वाटते?

चष्म्याचा धंदा तेजीत आहे आजकाल...

>>"तिथे तात्विक पराभव होतो आहे हे दिसतांच,,,,,,,,"<<
कोणाचा तात्विक पराभव होतो आहे ? हे कोणी, कसे आणि केव्हां ठरवले? 'उचलली जीभ लावली टाळ्याला ' अशा आणि अशी सेल्फ सर्टिफिकेट्स घेणार्‍यांना उतरे देत बसण्यात कांही अर्थ नसतो म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो याचा अर्थ पराभव झाला असा नसतो. तरीहि यामुळे अशी सेल्फ सर्टिफिकेट्स घेणार्‍यांचा 'अहं' त्यामुळे वाढीला लागतो हेही खरेच! पण त्याला सध्या तरी इलाज नाही.

दा.सु.,

>> श्री. अक्षय जोगांनी कितीही पुरावे दिले तरी उपयोग होणार नाही. हे स्वच्छ दिसत असूनही कांही सावरकर
>> चहाते आक्षेपांना उत्तरे देण्यात शक्ति घालवत आहेत असे मला वाटते.

एका अर्थी तुमचं म्हणणं बरोबर दिसतं. पण काय आहे की असत्य सारखंसारखं दडपून सांगितलं की सत्य वाटू लागतं. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो.

म्हणूनंच चर्चा सतत वस्तुस्थितीशी जोडण्याचा सायास चालू ठेवावा लागतो. हाही एक संघर्षच आहे. सावरकरविरोधक काय लायकीचे आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. मात्र मायबोलीसारख्या ठिकाणी शांत वाचक प्रचंड प्रमाणावर असतात. त्यांना विचारात घेता खोट्याचा बुरखा फाडणं आवश्यक पडतं.

म्हणूनंच आक्षेपांना उत्तरं द्यावीत या मताचा मी आहे.

आ.न.,
-गा.पै.

"सावरकर विरोधकांनी त्यांच्या विचारांची प्रचंड मोडतोड केली आहे

कसली मोड्तोड केली आहे.. ? जनता देशाची घटना पाळते.. सावरकरांच्या विचारांच्या मोडतोडीचा संबंध येतोच कुठे? उलट, सावरकर सावरकर करत नाचनार्‍यानी आपन देशाच्या घतनेची मोडतोड करत नाही ना, हे पाहिले पाहिजे. पण हे सांगितले की साम्गनारा हिंदुविरोधी, निधर्मी, सेक्युलर असा शिक्का बसतो.

>>उलट, सावरकर सावरकर करत नाच नार्‍यानी आपन देशाच्या घतनेची मोडतोड करत नाही ना, हे पाहिले पाहिजे. पण हे सांगितले की साम्गनारा हिंदुविरोधी, निधर्मी, सेक्युलर असा शिक्का बसतो.<<

Sad Uhoh Sad