कोईंचा उपयोग करण्या साठी थोड्या तिप्स देण्याचा हा प्रयत्न.माझ्या छंदाची जन्म कहाणी आधी दिली आहे. त्याच क्र्मात हा दुसरा आणि शेवटचा भाग:-
सामग्री:- वेगवेगळ्या आंब्यांच्या कोईचा जातिनुसार आकार वेगळा असतो-- लांबुळका,चपटा,फुगीर, नहान,मोठा वगैरे. कुठ्ला आकार उपयोगी
पडणार हे मनात योजलेल्या वस्तु किंवा प्राण्याच्या शरिराराकृतिवर/ अवयवावर अवलंबून असणार. म्हणून कैरी आणि कोईंचा साठा हवा. त्याच दृष्टिने विभिन्न फळांच्या लहान-मोठ्या बिया, उदा-पिस्ते, खजूर,इ,ची फोलपटं, रंगीत वेष्टण असलेल्या विजेच्या तारांचे तुकडे, प्लास्टिकच्या डब्यांची झाकणं असा कचरापण पाहिजे. तोंड, चोच,पावलं, असे अवयव बनवायला कामा येतील.
ऑजार: :- वायर कटर,लहान व्हाईस(किल्ल्या बनविणारे वापरतात तसा किंवा बेंच व्हाईस) कोय कापण्यास सोईचे म्हणून,नोज-प्लायर, लहान-पण लांबपात्याची कात्री, स्कौच टेप, फेव्हीबॉंडची ट्यूब., फ्रेटवर्कची बारिक आरी असलेलं धनुष्य, स्क्रूद्रायव्हर्स, बारिक फाईल्सचा सेट ई.
रबराच्या झाडाच्या पांब्या किंवा लवचिक अश्यावेलीच्या तुकड्यांचा सुद्धा उपयोग होतो.
कल्पकतेला आधार :- धुवून स्वछ केलेलि/ल्या) एक किंवा अधिक कोई टेबलावर ठेऊन वेगवेगळ्या प्रकारे जमवून मनात कल्पिलेला प्राणी किंवा
वस्तूशी जुळणारी आकृति निश्चित करता येईल आणि विश्वास वाढेल.
कोय व्हाईसमधे मध्यभागी पकडून (जास्त दाब न देता) एका वक्राकार भागाने कापावी. ती उघडून आतली ठिसूळ बी (निरुपयोगी) बाजूला करावी. त्यावरचा पापुद्रा काळा असला तर हलके काढून ठेवला तर उपयोगी असू शकतो. त्याच प्रमाणे कठीण टरफलांच्या आतला पिवळा पापुद्रा पण सलग काढून घ्यावा. शेपटी, तुरा, किंवा अन्य बारकाव्यांसाठी उपयोगी होतील. कोईवरच्या रेषांचाही उपयोग होऊ शकतो म्हणून सुरवातीला नकाढलेल्या बर्या. डोळ्यांसाठी फळांच्या बिया किंवा
सालं असलेल्या ड्डाळीचा वापर करता येतो. खजूर,जाभूळ, चिक्कू अशा कठिण बियांचा उपयोग चोची करण्यास होतो.;
यापैकी काही बियांवरचा रंगीत पापुद्रा भिवई बनवण्याला उपयोगी असतो.आत बी साधारण पांढरी असते. रंगीत पापुद्र्याचा
उपयोग बुबुळ तयार करण्यास करता येईल. पिस्त्याची फोलपटं ठिसूळ असतात. ती पक्ष्याच तोंड करण्यास छान.
लिंबू, संत्र यांच्या बिया कोई प्रमाणेच कापून डोळ्य़ांसाठी वापरता येतात.
खरं सांगायच तर एकदा धाडस केलं कि... जात्यावरच्या ओवी सुचतील नक्की.