सुपाएवढे कान ... सुपात दिसतात छान ...

Submitted by डॅफोडिल्स on 9 August, 2008 - 08:06

DSC01016_1.jpg
अजुन एक बाप्पा
DSC01013_0.jpgबालगणेश...
हाच ना तो पार्वतीमातेच्या स्नानगॄहाबाहेरचा चिमुकला द्वारपाल...

DSC01405_0.jpg

ही चॉकलेट्स वाटतायत का ?

DSC01275.jpg

रुनी.. तुला ही उदबत्ती घरं पहायची होती न?
DSC01286.jpgDSC01287.jpg

गुलमोहर: 

डॅफो, गोड दिसतो गं बाप्पा!

पण हे बाप्पा आहेत कशाचे? माती ? कणिक?.... ?
========================================

सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband!

सुरेखच जमल्यात मूर्ती. आणि सुपाची आयडिया सहीच. छान मखरासारखं वाटतंय ते सुपाचं छत्र.
हे सूप भिंतीवर पण लावता येईल ना. त्याखाली लामण दिवा किंवा कंदील असा अँटीक लाईट इफेक्ट दिला तर कसं दिसेल?

धन्यवाद
ही छोटीशी सुपं सहा ईंचाचीच आहेत.. भिंतीवर लावायसाठी.. बनवलेली.
संघमित्रा मलाही तशीच कल्पना सुचली होती.. लामणदिवा... छोटिशी घंटा..
किंवा सुपाला खाली गोंडे.. कवड्या असं लटकवायचं

पण मला हे फोटोज इथे अप लोड करायची खूप घाई होते.. Happy
छान वाटतं नं मग मायबोलीकरांच्या प्रतिक्रिया आल्यावर म्हणून ..:):)

किती गोड झाल्या आहेत मूर्ति! Happy मला दुसरी जास्त आवडली.. 'कधी मोदकाचं ताट येतंय माझ्याकडे आणि कधी मी ते फस्त करतोय' असं वाटतंय! Happy
डॅफो, तुझी यापूर्वीची हस्तकलाही पाहिली होती. मातीकाम तर सुंदर करतेसच, पण रंगसंगतीही खूप आकर्षक करतेस तू. असेच फोटो अपलोड करत चल Happy
--------------------------------------
अताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते..

तेच ना... दुसरा गणपती जेवायला घाइ करत असत असल्यासारखा वाततोय... हातातला मोदक सुद्धा खाउन टाकलाय...

७७७७७७७७७७७७७७७७************************************

सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |

डॅफो,
पहिल्यापेक्षा दुसरा बाप्पा एकदमच गोड आहे. मला खुप आवडले. ही वॉलहँगिंग ची आयडीया भारी आहे ग. Happy

व्वा! सुन्दर! Happy मला पहिला जास्त आवडला! Happy
सुपाची आयडिया मस्तच! मी वापरणार कुठेतरी.....
माती म्हणजे चायना क्ले/व्हायटिन्ग फेविकॉल मधे वगैरे मिक्स करुन वापरली का?
मातीचा तपशील दे ना!
(पुर्वी आम्ही कॉर्न फ्लॉअर पासुन काहीही मटेरिअल वापरुन बघायचो)
...;
आपला, लिम्बुटिम्बु

थँक्स पूनम.. संघमित्रा रुनि..लिंबु.. जगोमोहन..

लिंबुटिंबु .. हो व्हायटींग आणी गम वापरूनच बनवले आहेत.. हे छोटे छोटे गणपती बाप्पा. पाच सहा ईंचाची सुपं वापरली आहेत. मातीशी खेळायला मला खूप आवडते.. पण माध्यम काय वापरायचे.. भाजायचे कसे वगैरे काही माहित नाहिये.. टेरकोटा च्या वस्तू किती छान असतात न..
मी आपलं व्हायटींग पावडर.. किंवा जिथे शक्य होईल तिथे एम सील वापरते.. अजुनही बर्‍याच वस्तू बनवल्या आहेत. हळूहळू अप लोड करते फोटोज.

मस्तच कल्पना. सुरेख झाला आहे बाप्पा. गणपती बाप्पा मोरया!! Happy

मस्तच आहेत सुपातले गणपती.

डॅफो,
क्लासच आहेत सगळी उदबत्तीची घरं. प्रेझेंट द्यायला मस्तच आहेत ही. याची माहिती लिहु शकशील का, म्हणजे मी करुन बघेन.
भाजलेली नाहीयेत त्यामुळे पडली हातातुन तर लगेच तुटतात का ती?
इथल्या दुकानात मी घरच्या ओव्हन मध्ये भाजता येईल असा मुलांसाठीचा क्ले बघीतला.
तसे काही भारतात मिळत असेल तर तुला भाजलेल्या वस्तु करता येवु शकतात घरी.
किंवा घरासाठी छोट्या भट्ट्या मिळतात का ते बघ, पण कदाचित त्या महाग असतील बर्‍याच. त्यापेक्षा असे भाजलेले काम शिकवणारा क्लास शोधणे जास्त योग्य ठरेल.
या वस्तू विकतेस का तू, मला नक्की आवडेल घ्यायला.

ह्म्म्म.. अगदीच लगेच नाही तुटत.. मी काही काही प्लॅस्टीकच्या वस्तूंचा बेस वापरला आहे. Happy

सहजच बनवले.. सुचलं तसं.. स्वान.. फुलं...
विड्याच्या पान सुपारीला काही बेस नाहिये. Happy

तसे काही भारतात मिळत असेल तर तुला भाजलेल्या वस्तु करता येवु शकतात घरी.>>>>
हो गं मी शोधत आहे इथे बँगलोर मध्ये कुणी शिकवतय का ते.. टेरकोटा वगैरे Happy
किंवा पॉलीमर क्ले माहित आहे तुला ? त्याच्या वस्तू पण टिकाउ होतील.. इथे कुठे मिळेल माहित नाही .. पण तुला मिळेल तिकडे.

मस्त आहेत सुपातले गणपतीबाप्पा. आणि उदबत्तीची घरं सुपरक्लास Happy
धनु.