संवाद लिहा स्पर्धा - २

Submitted by माध्यम_प्रायोजक on 16 October, 2011 - 22:33

'देऊळ'निमित्त वेगवेगळ्या स्पर्धा, खेळ घेत असताना आमच्या हाती आली काही प्रकाशचित्रं...

पण नुसती ती चित्रं बघून काही कळेना हो... काय प्रसंग असेल, त्यातल्या व्यक्ती काय बोलत असतील, विचार करून मेंदू शिणला नुसता..

म्हणून ठरवलं, आता मायबोलीकरांनाच दाखवायची ती प्रकाशचित्रं आणि त्यांनाच बनवायचं संवादलेखक...

होय, 'देऊळ'निमित्तानं घेऊन आलो आहोत, प्रकाशचित्रांवरून संवाद लिहिण्याची आणखी एक रंजक स्पर्धा!

खाली दिलेल्या चित्रातल्या दोन व्यक्तींमधला संवाद तुम्हांला इथे लिहायचा आहे.

अट एकच, हा संवाद एकूण पाच वाक्यांपेक्षा जास्त नसावा (दोन्ही पात्रं मिळून).

एका आयडीची एकच प्रवेशिका ग्राह्य धरली जाईल. तुम्हांला आवडलेल्या संवादाला मत देऊन या स्पर्धेचा विजेता तुम्हीच निवडणार आहात.

विजेत्या स्पर्धकाला बक्षीस म्हणून मिळेल 'देऊळ' चित्रपटाची एक ऑडिओ सीडी.

sanwaadlihaa2.jpg

वापरा तर मग तुमची कल्पनाशक्ती आणि वर दिलेल्या प्रकाशचित्रातल्या व्यक्तींमध्ये घडवून आणा संवाद!

Groups audience: 

दिलिप प्रभावळकर :- अरे हो हो जरा माझं ऐकून घ्या.
नाना पाटेकर : - काय ऐकून घ्या.... मी ३ बोललो होतो.

दिलिप प्रभावळकर :- अरे हो पण ३ करोड एकदमच हवेत का?
नाना पाटेकर : - का नाही... १ एकर जमीन आहे ती

दिलिप प्रभावळकर :- हो पण रेट तर ५० चालू आहे
नाना पाटेकर : - मग थांबा पुढच्या महिन्यात GE येतेय .... संपूर्ण ५०० करोड चं प्रोजेक्ड घेऊन .... मग त्याच जमीनीचे ५ घेईल मी...सांगा तुमच्या आमदार साहेबाला

दिलिप प्रभावळकर :- हो पण ही बैग तर ठेऊन घे
नाना पाटेकर : - नको .... या तुम्ही

श्री. नाना : काय? अचानक आज येणे केलेत?
श्री दिलीप : नाना, काही गोष्टी हाताबाहेर गेल्या की आपल्याला हातपाय हलवावे लागतात..
श्री. नाना : ह्म्म्म... आजकाल गावात जे काही चाललंय ते सर्व कल्पनाशक्तिच्या पलिकडलं आहे.
श्री दिलीप : म्हणुनच मी ही धावत आलोय.. आता तुला काळजी करण्यासारखं काही नाही. मी बघतो सर्व काही..
श्री. नाना : असं बोलुन तुम्ही आमच्यावर अविश्वास दाखवताय..

मा.नानासाहेबरावजी : बघ मित्रा, आतातरी जरा व्यवहारातल्या हुशारीने वाग कारण तुझी अभ्यासातली हुशारी आणि तत्व तुला जिथल्या तिथेच ठेवून गेली.

प्रा. जहागिरदार : व्यवहारातली हुशारी म्हणजे नक्की काय रे, या खेड्यातल्या मुलांसाठी कॉलेज बांधावं म्हणून मी सांभाळून ठेवालेला भूखंड मी तुझ्या साखरकारखान्यासाठी तुझ्या घशात घालणे?

मा.नानासाहेबरावजी : अरे तुला बक्कळ पैसा देतोय ना मी, ही कॅशने भरलेली बॅग बघ आणि तुझ्या आयुष्यभर बसून सुखात जगण्याची व्यवस्था करुन घे. तू माझा लंगोटीयार म्हणून एवढ्या समजूतीने सांगतोय, दुसरा कुणी असता तर त्याचा भूखंड माझ्या ताब्यात कधी आला ते त्यालाच कळले नसते.

प्रा. जहागिरदार : तुझ्या आणि माझ्या सुखाच्या व्याख्या वेगळ्या, तुझे माझे मार्ग वेगळे आहेत कारण माझ्या कॉलेजमधून या परिसरातील उद्याची पिढी शहाणी होऊन बाहेर पडेल तर माझ्या जीवाला आणि ज्यांची ही जमीन आहे त्या माझ्या वडिलांच्या आत्म्याला सुखशांती लाभेल.

दिलिप प्रभावळकर :- जाऊ दे आता... माझा राग शांत झाला म्हणूनच आलो रे मी.... तु आता जे समजावतोय तेच आठ दिवसापुर्वि का नाही बोललास माझ्याशी.
नाना पाटेकर : - अरे आपल्यात वैर वाढलं नी पोरां मधे प्रेम ....... मिलिंदाचं पटल मला .... त्याने विचारल नि मी ही हो म्हण्ट्ल ..... तुझ्या डोक्यात काय येईल नि तु काय करशील.... म्हणालो करुन टाक ... जाउ दे

दिलिप प्रभावळकर :- हो रे तुम्ही तर नाही विचारलतं .....पण माझ्या पोरीनेही नाही

........ ३० सेकंद शांतता......

नाना पाटेकर : - बर मी बोलाऊन घेतो ...... मिलिंद मंजिरीला पोल्ट्री दाखवायला घेऊन गेलाय... थांब .......
दिलिप प्रभावळकर :- नको मी निघतो........ ती तशीच आली .... ही तेव्हढी बैग दे तिला.... बाकी काही नाही.... निघतो मी.

प्रभावळकर -तुला फक्त सावध करायला आलो होतो, लोक आतां 'मामा' नाही राहिलेत.
नानासाहेब - अरे, माझ्यासारखे नानाच लोकाना ते 'मामा' नसल्याचं सागून मामा बनवत असतात.
प्रभावळकर - तू बेसावध रहायचंच ठरवलं आहेस, तर निघतो मी.
नानासाहेब - खूपच सावध केलंयस तू मला, दोस्ता; आतां मी खोटंखोटं पडून घेऊन लोकाना त्यांच्या ताकदीची झिंग चढवतो व मग तेच मला डोक्यावर घेऊन कसे नाचतील बघ !!!

नानासाहेब : काय रं लेका कुटं निघलाय बॅग घेउन.
प्रभावळकर : २ दिवस पाहुनचार घेतला. आता घरी जावं म्हणतो.
नानासाहेब : अरं दोस्ता रावा की अजुन ४ दिस. मोकळ्या हवेनं तब्येत सुदारल की आमच्यावाणी..
प्रभावळकर : ते सगळं ठीक रे. पण सुट्ट्या नाहीत रे.
नानासाहेब : अरं काय रं तुमची जिंदगी. घाण्याच्या बैलागत झालय तुझं.

आमदार नाना पाटेकर साहेब : काय राव, तुम्ही आमच्या पॅनल इरूधात गावकर्‍यांचं पॅनल हुभं करतुया असं कानावर आल म्हनायची की आमच्या

समाजसेवक दिलीप प्रभावळकर : मग काय करावं दादा आमी? एवडी वरसं जाली तुमी काय दुसर्‍याच्या त्वंडात घास पडुना देईल जालं म्हणायचं की आता. आवं पोट फुटील की अशानं.

आमदार नाना पाटेकर साहेब : आमच्या प्वाटाची फिकरं करनं सोडा राव, तुमच्या पॅनल सारकी कैकं पचवलीत आमी. उगाच वाकड्यांत शिरायचं काम नाय करायचं. ह्या गठुर्‍यांत मोप पैका हाये, त्यवडां उचल आनं म्हातारीच्या गोधडीत गुडूप व्ह्यायचं, काय, टकुर्‍यात उजीड पडला की नाय?

समाजसेवक दिलीप प्रभावळकर : नाय जमायचं दादा, एकतर मिळुन सारकं खायच आसलं तर बोलु की, आता तुकड्यांवर काम नाई चालायच काय??? नायतर हुं जावद्या ईलेक्शन मदी समुरा समूर!!!

आमदार नाना पाटेकर साहेब : लई बोल्लास, आन पहिल्या फकत खांद्यावरनं हात काड तुजा, च्यामारी बोट धरायं दिलास तर खांदयापातुर पोचलास, सोबत ग्येतला तर डोचक्यावर तांडव करशीला माज्या!!

पाटेकरः आलास? कधीपासून वाट बघत होतो रे चातकासारखी. काळजीने डोक्याचा नुस्ता भुगा झालाय.
प्रभावळकरः (पाटेकरच्या खांद्यावर हात ठेवत) किती घाबरतोस रे? तुला म्हटलं होतं ना काळजी करू नकोस म्हणून. तुझा प्रश्न सोडवलाय मी.....कायमचा.
पाटेकरः म्हणजे? काय केलंस काय तू? पैसे दिलेस त्याला? एव्हढे पैसे तुझ्याकडे कुठून आले?
प्रभावळकरः (छद्मीपणे हसत) बस काय आता? पैसे देऊन असे लोक गप्प बसत नाहीत हे तुला पण माहित आहे आणि मला पण. संपवलाय मी त्याला. विश्वास बसत नसेल तर ही बॅग उघडून बघ. त्याचं मुंडकं घेऊन आलोय पुरावा म्हणून दाखवायला. त्याची विल्हेवाट लाव म्हणजे मामला खतम!
पाटेकरः मैने देखा जब तेरे हॅन्डबॅगके थ्रू, कभी १०१ कभी १०२, उस दिन से हुआ फिव्हर ये शुरु, कभी १०१ कभी १०२

प्रभावळकरः नान्या नान्या अरे लेकरा अस करु नकोसं, कधीनाकधी येते अशी वेळ सर्वान्वरच
नान्या: करु नको तर्र मग्गक्काय करु? ते काय नाय, आपल ठरलं ते ठरलं, मी जाणार.
प्रभावळकरः बघ बोवा अजुन विचार कर, असा निराश होऊ नकोस, खूप आयुष्य आहे तुझ्यासमोर, खूप काही करण्यासारख आहे, बघ बघ माझ्याकडे बघ, गेलेत का माझ्यायेवढे केस तुझे? (गालातल्या खळीत हसत) आत्ताशीक आर्ध हेलिप्याड बनलय तुझ, अजुन विमानतळ व्हायचा आहे, तर इतक्यातच ही भाषा?
नान्या: आहो तुम्च्यासारख विमानतळ होऊ नये म्हणून तर हे सगळ कर्तोय ना! तुम्हाला काय? तुमचा आख्खा पोर्णिमेचा चन्द्र झाला तरी तुम्हाला कामं मिळताहेत.....
प्रभावळकरः तरी पण बघ नान्या, ही बन्डी का काय ज्याकेट की फिकेट म्हणता ना तुम्ही? तर अशी बन्डी, असा परिटघडीचा सदरा पायजमा अन ही, ही भलीथोरली ब्याग असा बाडबिस्तारा घेऊन का कुणी सन्यास घ्यायला जात? जायच तर जा बोवा, पण निदान वेष तरी साजेसा कर! अपने पेशेकी शरम कर कुछ! या वेषात तू बाकी काही नाही पण एखाद्या गल्लीचा दादा नैतर गेलाबाजार टर्म मधे काहीच खायला न मिळालेला उपाशी पण तळतळाटलेला कार्पोरेटर वाट्टोहेस Proud