हाय..!
प्रिय लिहिलं नाही कारण तू मला प्रिय आहेसच याची मला खात्री नाही. किंवा खूप जास्त प्रिय असावीस. Narcissist ना शेवटी.. ह्म्म्म.. कशी आहेस? म्हणजे आता मला खरच आठवत नाही की तू कशी आहेस. स्वतःविषयी विचार करताना मला नेहमी असं वाटतं की, ' अर्रे मी अशीच तर आहे पहिल्यापासून, फक्त आता स्वतःविषयी अमुक अमुक गोष्ट शब्दांत मांडू शकते. (आणि गरज पडलीच तर त्यामागची कारणमीमांसादेखिल स्पष्ट करु शकते.)' असो, तर याप्रकारे तुझ्याविषयीदेखिल मला काही आठवत नाही, त्यामुळे काही नवीनही वाटत नाही.
हल्ली मी परत बोलायला लागलेय. म्हणजे खाई खाई सुटल्यावर माणसं जशी खात सुटतात तशी मी बोलत सुटलेय त्याच्याशी. त्यामुळेच मी त्याला माझी दर्दभरी दास्ताँ पण सांगितली. (वास्तविक, जे झालं त्याच्याविषयी मला दर्दच काय पण इतरही काही वाटत नाही.) पण बहुधा लोकांना दर्द वाटत असावा. म्हणून मग मी देखिल तो वाटू देते. म्हणजे मलाही कधी कधी रडायला हक्काचा खांदा मिळेल अशी आशा वाटते. खरंतर तो नाही मिळाला तरी हरकत नसते. मिळाल्याचा आनंदही नसतो, बरं, तो खांदा मी वापरेनच याचीही खात्री नसते. पण हा खांदा मिळण्याचा प्रकार भलताच रोमँटीक असतो. खांद्यावर रडून झाल्यावर जे काही होतं ते मात्र प्रॅक्टीकल असतं. (की नॅचरल?) पण खरी गंमत ही नाहीये. खरी गंमत ही आहे की, हे सगळं माहित असूनही असंच व्हावसं वाटतं. (व्हावसं वाटतच असंही नाही पण होऊ नये यासाठीही मी काही करत नाही.)
मी फार मी मी करते. कदाचित मला दुसरं काहीच करता येत नसावं. हे जाणवलं की मी विचार करते. shame based conscience आणि guilt based conscience यातला कुठला मला जास्त सूट होईल याचा. कुठलाच नाही असं उत्तर मिळालं की मला विकृत असल्यासारखं वाटतं. आत्महत्या करणे हा चांगला मार्ग असू शकतो पण ते फारचं रोमँटीक वाटतं. प्रत्यक्ष आयुष्यात मी भलतीच प्रॅक्टीकल असल्यामुळे मला ते जमणार नाही हे ही जाणवतं. स्वतःला नाकारण्यात काही हशील नाही कारण मग माझं नसलेलं conscience कुठूनसं "खोटारडी! खोटारडी" म्हणून ओरडू लागतं. स्वतःला स्विकारणं हा रोमँटीसिजम आहे. त्यामुळे तो ठराविक काळानंतर संपतो. माझ्याबाबतीत तो संपला आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टींना अर्थ नाही.
मिळवायचंय ते मिळत नाही ही समस्या नाहीच आहे. काय मिळवायचं तेच समजत नाही ही समस्या आहे. बरं ते समजलं आणि काही मिळालं तरी मग त्यानंतर इतर काही हवसं वाटणारच नाही याची काय खात्री? किंबहुना असं वाटेल याचीच शक्यता जास्त. मग मला काहीच मिळवावसं वाटत नाही. तरी पण मी उत्तरं मिळवते. मिळवायला, गमवायला किंवा बदलायला ती माणसांपेक्षा कमी हानिकारक असतात. बायका कन्फ्युज असतात असं पुरुषांचं मत असतं हे मला हल्लीच कळलं. आपल्यात बाईपणाचा अवशेष सापडला याचा आनंद मानून घ्यावा असा माझा विचार होता पण मग मला इतर बर्याच गोष्टींप्रमाणे याही गोष्टीचा बाईपणाची स्पेसिफिक संबंध लावता येत नाही असं कळलं.
मला पाऊस पडताना परत परत का रोमँटीक वाटत रहातं याचं उत्तर मिळवायचा प्रयत्न चालुये सध्या. असं वाटणं हा मी स्वतःशी केलेला अजून एक खोटारडेपण आहे असा निष्कर्ष निघाल्यास मला खूप काळाने परत एकदा वाईट वाटू शकतं.
असो. आजच्याला इतकच. काळजी घे म्हणत नाही मी तुला. कारण ते खोटं वाटतं. You are sane (selfish?) enough to take care of yourself. जाते.
बाय.!
स्वत:स पत्र?
Submitted by मी मुक्ता.. on 13 October, 2011 - 03:09
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
सहीच !!!
सहीच !!!
मी मुक्ता - अतिशय सुंदर लेखन!
मी मुक्ता - अतिशय सुंदर लेखन!
अजून असेच वाचायला आवडेल.
(No subject)
मुक्ता आता शिर्षक "स्वतःस
मुक्ता
आता शिर्षक "स्वतःस पत्र..बदलून" असं दिसतंय... आर्ट फिल्मचं टायटल रजिस्टर करून टाक
मुक्ताजी - सुंदर लेखन आहे....
मुक्ताजी - सुंदर लेखन आहे....
ह्म्म्म...
ह्म्म्म...
नि:शब्द !!!!!
नि:शब्द !!!!!
सर्वांचे आभार.. Kiranyake,
सर्वांचे आभार..
Kiranyake, काही टायपोज होते.. ते बदलले..

तसही आर्ट फिल्म चं नाव नाही वाटत ते. फारच अॅबस्ट्रॅक्ट होतंय..
इंदीरा संत यांची 'आपणच
इंदीरा संत यांची 'आपणच आपल्याला' ही कविता आठवली,
.........
अप्रतिम लिहलंयेस..
(No subject)
मस्तय
मस्तय
(No subject)
स्वतःला स्विकारणं हा
स्वतःला स्विकारणं हा रोमँटीसिजम आहे. त्यामुळे तो ठराविक काळानंतर संपतो. माझ्याबाबतीत तो संपला आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टींना अर्थ नाही.>> आवडले.
>> काय मिळवायचं तेच समजत नाही
>> काय मिळवायचं तेच समजत नाही ही समस्या आहे.
अगदी नेमक्या शब्दांत समस्या मांडलीये! स्वत:बाहेर सुख शोधू पाहता अशी वेळ येते. बर्याच लोकांवर आलीये याअगोदर. लेखिकेला जे पाहिजे आहे ते अंतर्यामी शोध घेऊनच मिळेल.
शुभास्ते पन्थान: सन्तु.
लेख चांगला आहे. किती लोक एव्हढा स्पष्ट विचार करू शकतात? आणि तो उघडपणे मांडायला एक प्रकारचं धाडस असावं लागतं अंगी. ते दाखवल्याबद्दल अभिनंदन!
सर्वांचे खूप खूप
सर्वांचे खूप खूप आभार..:-)
शाम,
आपणच आपल्याला लिहीलेली
पत्र वाचता वाचता
ओले होणारे डोळे पुसून
फडफडू द्यावीत वा-यावर पानं............
याच कवितेविषयी बोलताय ना आपण? खूप भारी आहे ही. पण माझ्या माहितीनुसार ही अनुराधा पाटीलांची आहे.
धन्यवाद गामा पैलवान
मुक्ते, सुंदर... <<स्वतःला
मुक्ते, सुंदर...
<<स्वतःला स्विकारणं हा रोमँटीसिजम आहे. त्यामुळे तो ठराविक काळानंतर संपतो. >>....
<<मिळवायला, गमवायला किंवा बदलायला ती माणसांपेक्षा कमी हानिकारक असतात. >>...
काय हे... किती आतलं....
दाद... खूप आभार...
दाद...
खूप आभार...
हा प्रकार माझ्यासाठी नवीन
हा प्रकार माझ्यासाठी नवीन आहे. धन्यवाद ! काही वेगळ वाचल.
सुपर्ब,,,
सुपर्ब,,,
धन्यवाद नितीनचंद्र..
धन्यवाद नितीनचंद्र..
mansmi18, आभार..
बाप्रे! इतकं थेट? दादजींशी
बाप्रे! इतकं थेट?
दादजींशी सहमती..
गामा पैलवानला अनुमोदन. खूप
गामा पैलवानला अनुमोदन. खूप सुंदर लेख. स्वतःचा स्वतःशीच विचार करायला लावणारा.
मस्तच!
मस्तच!
ह्म्म.. धन्यवाद हितचिंतक,
ह्म्म..
धन्यवाद हितचिंतक, सुरेखा, विनार्च...
प्रचंड आवडलं काय मिळवायचं तेच
प्रचंड आवडलं
काय मिळवायचं तेच समजत नाही ही समस्या आहे. बरं ते समजलं आणि काही मिळालं तरी मग त्यानंतर इतर काही हवसं वाटणारच नाही याची काय खात्री? >>>
दिल किसी हाल पे थामे ही नही जाम-ए-करार,
मिल गए तुम भी तो क्या और ना जाने मांगे!
फार सुंदर लिहिलंय, अगदी थेट,
फार सुंदर लिहिलंय, अगदी थेट, धाडसी.. फार छान, आवडलं
दिल किसी हाल पे थामे ही नही
दिल किसी हाल पे थामे ही नही जाम-ए-करार,
मस्तच....
मिल गए तुम भी तो क्या और ना जाने मांगे!>> व्वा क्या बात कही है...
धन्यवाद मंजिरी..
हे वाचलं तेव्हाच दादबाईंची
हे वाचलं तेव्हाच दादबाईंची दाद काय येते याबद्दल उत्सुकता होती.. सहमत आहे अगदी !
तरी पण मी उत्तरं मिळवते.
तरी पण मी उत्तरं मिळवते. मिळवायला, गमवायला किंवा बदलायला ती माणसांपेक्षा कमी हानिकारक असतात >>>>
सुपर!!
खूप सही लिहीलं आहे!
Pages