आंब्याची कोय - माझी सोय

Submitted by bnlele on 10 October, 2011 - 08:50

प्रत्येक जातिच्या आंब्याच्या कोईचा आकार वेगळा. अशा कोईंचा उपयोग अचानक सुचला !
त्या सोबत इतर टाकाऊ कचर्‍याचा उपयोग करून वस्तू, प्राणी बनविण्याचा छंद जोपासण्याच सुचल.
खाली एक लिंक देत आहे. उत्सुकता वाटली तर बनविण्याच तंत्र-माहिती देईन.
https://picasaweb.google.com/Bhaulele/BhaskarLeleSCraft02?authuser=0&aut...

गुलमोहर: 

मस्तच!
वाटली तर बनविण्याच तंत्र-माहिती देईन.>>> नक्की लिहा याबद्दल.
करवंट्यांचापण छान वापर केलात.

वाव्वा!!!!!!!!!!!! भाऊकाका.. तू अजून काही काही बनवलेलं दिसतंय. प्रत्येक स्टेप बद्दल लिही. पुष्कळ जणाना आवडेल शिकायला ऑन लाईन.. Happy

वा काय सुंदर कला आहे ही. आम्ही लहान असताना बाठे शेकोटीत भाजून खाण्याचीच कला जोपासली Lol

व्वा!:)

आश्चर्यकारक संखेचे प्रतिसाद आणि उत्सुकता - अधिक माहितीची !
खूप आगळा आनंद मिळाला मायबोली वर.
शक्य तितकं लवकर मला उमगलेल तंत्र लेखबद्ध नक्की करीन.
तूर्त हे आश्वासन धन्यवादां सहित.

कबूल केल्या प्रमाणे तंत्र लिहिण्यास सुरवात -भूमिके पासून केली आहे. विजॆचा घोळ साथ देतो तेंव्हाच पुढे सरकणं शक्य होतं. धीर धरण्या पलिकडे हातात काही नाही !

काय क्रिएटिव्हीटी आहे...........
जबरदस्त........
कसे करता हे सगळं... जाणून घ्यायला खूप आवडेल....

छंद- आंब्याची कोय-माझी सोय

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी आम्ही उभयता ,सौच्या आग्रहास्तव पुण्यात स्थायी स्वरूपात आलो; या शहराशी माझा परिचय त्रोटक होता.
लहानपणी नाताळच्या सुट्ट्यांमधे आई आम्हा भावंडांना घेऊन यायची;आत्या, मोठ्ठे काका, मामा वगैरे नातलग इथेच स्थॆयीक होते.
वयाच्या आठ-दहा वर्षां पर्यंत दर सुट्टीत भीकारदास मारुति जवळच्या कुणा केंदुरकरांच्या वाड्यात एक खोली घेऊन रहावयाच असा
क्रम आठवणीत स्मरतो.नंतर कधि लग्न-मुंजीं सारख्या प्रसंगी ,आणि १९८०-९० या काळात शासकीय कमा निमित्त ८-१० दिवस.
आठवण म्हणाल तर-पर्वतिच्या पायर्‍या आणि द्वारपालांचे पुतळे आणि आंब्यांचा वास आजतागायत कायम आहे.
सकाळी स्वछ धुतलेले रस्ते,हापुस-पायरी च्या आढी आणि तो दरवळ ! नंतरच्या धावत्या भेटीत अनुभव - गाण्याच्या सुरेल मैफली
आणि पाहिलेले प्रभावी नाट्यप्रयोग यांच्याच.
सौ चा संबंध याहीपेक्षा जवळचा. कारण ती फर्ग्यूसन ची स्नतकोत्तर आणि अलिकडच्या काळात तिचे दोन भाऊ पुण्यातच स्थाईक झालेले
म्हणून.
माझ्या निवृत्ती नंतर पुण्यात स्थाईक होण्याचा तिचा अट्टाहास;माला आंब्यांचा मोह आणि कला-संस्कृतिची जवळीक हंवीच होती !
आंब्यांच्या सीझन सुरू व्हायच्या सुमारास आमचं पदार्पण झालं. एकदा सकाळी फेरफटका मारून येताना हापुस आणि पायरी दोन-दोन डझन घेऊन आलो.
गढ जिंकल्याच्या आनंदात घरि येऊन घंटी वाजवली. दारु घडताना ऎकू आलं- "आहो,दोघांमधे एवढे आंबे कोण खाणार ? ही सुरवात आहे,पुढे गोडी तर
वाढेलच आणि स्वस्त पण होतील. असा आधाशीपणा कशाला! !"
वाटलं आणलेल्या आंब्यात एखादा सडका निघाला ! म्हणलो-एकावेळी चार हापुस कापायचे आणि चार पायरींचा रस पोळीशी.
तिच्या आईला डायबेटिस होता म्हणून ती पण चविपुरताच चाखणार हे नंतर लक्षात आलं.
जेवणाच्या ताटात हापुसच्या फोडी-कोयी आणि वाटीत पायरीचा रस आणि नांवाला एक पोळी असा थाट होता.
डिस्कव्हरी चॅनेल टीव्हीवर लागलेला- नैसर्गिक दृष्यांची मेजवानी डोळ्याना सुखद होती. अचानक फ्लॅमिंगोंचा थवा दिसला;आंब्याची कोय हातात होतीच !
ते पक्षि आणि कोयीच्या आकारातलं सादृष्य मनात ठसलं ! कचर्‍यात टाकण्या ऎवजी पाहुया कोयीतून पक्षि बनवता येतो कां.
प्रयोग यशस्वी झाला आणि नवा छंद जन्माला आला !
........ क्र्मशः