डिजिटल पेंटिंग

Submitted by पद्मजा_जो on 27 September, 2011 - 06:06

पजो,
हे डिजिटल पेंटिंग आहे?? जबरदस्तच! Happy
जरा माहिती पण लिही ना, नक्की काय वापरुन कसं काढलंय, कोणतं सॉफ्ट्वेअर वापरलं वगैरे? आणि तो मोठा वॉटरमार्क नसता टाकला तर चाललं असतं का? कोपर्‍यात छोटा आहेच ना!
ओरिजिनल साईज ची पण लिंक दे ना, इथे पूर्णपणे दिसत नाहीये, की एवढीच साईज आहे?

धन्यवाद मी_चिऊ, चातक, प्रकाश काळेल, खारीक, म्हमैकर...
चातक .... करते थोडा फेंट.
प्रकाश काळेल...हे फ्रॉम स्क्रॅच आहे..
खारीक...ओरिजिनल साईज मोठी आहे.... आणि हे फोटोशॉप मध्ये केलेलं आहे...
Happy

फ्रॉम स्क्रॅच!!!!
अफ्फाट आहे!! जबरीच.. Happy
ओये, ओरिजिनल साईज ची लिंक दे प्लीज, नाहीतर मला इमेल वर पाठव! Happy

धन्यवाद मंदारदादा, स्मितू, दिनेशदा, limbutimbu, नलिनी.... Happy
खारीक, इमेल किंवा फेबु, वर टाकते, तिकडे निट दिसेल....

धन्यवाद किश्या, आनंदयात्री, शोमु.. Happy

शोमु : थोडी माहिती : फोटोशॉपमध्ये ब्रश टूल आहे. त्याच्या सहाय्याने आपण कॅनव्हासवर जसं पेंट करतो, त्याच पद्ध्तीने करायचं. (फक्त इकडे ब्रशची opacity, fill वापरून शेड्स तयार करता येतात... एवढाच काय तो फरक...बाकी ब्रश टूल वापरायला थोडा हात बसायला वेळ लागतो...पण सरावाने जमतं... Happy )