रिश्ते

Submitted by आयडू on 5 August, 2008 - 10:55

आज बर्याच दिवसांनी ते दोघे समुद्रकिनारी कॉफी घेत बसले होते... मे बी वेळ मिळत नव्हता किंवा काढायचाच नव्हता... संध्याकाळी त्यानं फोन करून आज आपण भेटूयात का? असं तीनदा विचारल्यावर तीने 'कॉफीला' होकार दिला होता.. नेहमी प्रमाण १:३० तास वाट बघायला लावल्यावर ती कॉफीशॉप मध्ये पोहचली.

तिची वाट बघत तो laptop वर ब्लॉगस्/ मेल्स तपासत होता...
ती: ओ आज फारच लवकर पोहचलास की रे तू! कसा काय??
तो: फार नाही १० च मिनीट झाली (खोटं! त्याला वाद वाढ वायचा नव्हता.) काय घेणार?
ती: अं... काहीच नको.. रात्री जेवायच आहे. आणी मला भलत्या सलत्या वेळी काहीही खायची सवय नाही!
तो: बर.. मला भूक लागली आहे! कॉफी घेशील ना?
ती:(विचारात: किती दिवसांनी अशी निवांत कॉफी घेईन म्हणत्ये मी..)हो मला कोल्ड कॉफी चालेल.
तो: ऑर्डर देतो.. दोन कोल्ड कॉफी, १ चीझ ऑम्लेट
ती: आज काय विशेष?
तो: काही नाही सहज..
ती: सहज म्हणून तीनदा फोन केलास मला?? अरे बोल मी दोन मिटींग पोस्टपोन करून आल्ये!
तो: अगं मला वाटल.. तिचा फोन वाजला.. आणी मग पुढचा अर्धा तास ती फोनवर बोलत होती..
कॉफी संपवून तो तिचा फोन कधी संपेल ह्याची वाट बघत होता.. खरतर त्याला तिच्याशी खूप काही बोलायच होत पण ती नेहमीप्रमाणं तेवढी फ्री राहिली नव्हती! आणी हे त्याला प्रकर्षान जाणवत होत..
ती: (बरोबर ४५ मि. नी) हां बोल लवकर मला जायचय ऑफीसमध्ये..
तो: काही नाही मी कॉ फी सांगतो.. १ कोल्डकॉफी!
इतक्यात तिचा फोन परत वाजतो आणी ह्या वेळी मात्र ती फोन घेत बाहेर जाते..
तो: (विचारात- आज काल काय झालय काय आपण पूर्वी सारख बोलत का नाही?)
ती: पटकन आत येत अरे मी फोन होल्डवर ठेवलाय जपानचा कॉ. कॉ. चालू आहे! मला लगेचच जाव लागेल आता बाय!

त्याच्या उत्तराची/ प्रतिसादाची वाटही न बघता ती निघते..
आणी तो तसाच बसलेला असतो... (तिची) दुसरी कॉफी संपवत...
जगजीतच्या ओळी गुणगुणत... हाथ छुटे भी तो रिश्ते नहीं छोडा करते..

********************************************

दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"

गुलमोहर: 

सही रे!
गोदेय

छान लिहिलं आहेस.. मी विचारात पडलेय की किती मित्र-मैत्रिणींना निवांत भेटले नाहिये एव्हढ्यात...

छान लिहलयसं दीपू!
दोघांच्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या असल्या की असं होणं अपरिहार्य....

तु पण जगजीतचा पंखा दिसतोयस!

गोदेय,सरि. (एकेरी उल्लेख चालेल नं?) धन्स!! Happy मी विचारात पडलेय >> अग पडू नकोस! जाउन भेट नं त्यांना...

स्वरूप, धन्स! "प्रायॉरिटीज" हा फार मोठा शब्द झाला रे (एकेरी उल्लेख चालेल नं?) वेळ काय कसाही काढता येतो फक्त इच्छा पाहिजे! Happy

जगजीत>> हा आणखी एक माझा वीक पॉइंट!(दुर्बल घटक) गुलाम अली, मो. रफी आणी रूपकुमार राठोड ह्याच गाण्यासाठी(ऐसा कोई जिंदगी से वादा तो नहीं था.. तेरे बिना जीने का इरादा तो नहीं था..)

तू काय वाचतोस/ ऐकतोस??

दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"

कुलदीप, एकेरी पळेल बरंका.. रुपकुमारचं हे गाणं कोणतं. म्हणजे नवीन आहे हे obvious पण ऐकलं नाहिये (नविन गाण्यांच माझं ज्ञान यथातथाच). खरयं, विचारात पडण्यापेक्षा पटकन भेटावेच....म्हणुनच आम्ही काही जवळची मित्रमंडळी आठवण आली की एकमेकांकडे टपकतोच, आता उशीर झालाय, असेल की नाही - प्रकारच नाही, कुठे आहेस, भेटायला येतोय - इतकाच फोन ..

सरि,

ऐसा कोई जिंदगी से वादा तो नहीं था.. तेरे बिना जीने का इरादा तो नहीं था..>> हे रु. रा. यांच फार नवं गाण नाही आहे! वादा ह्या अल्बम मधल हे(हेच फक्त श्रवणीय आहे Happy ) गाण असून गुगलस तर मिळेल तुला ते.. फारच अप्रतिम पार्श्वसंगीत आणी ह्या गीताचे बोल आहेत!! Happy

मी ते इथं (ह्या गोष्टीत) टाकल असत पण इथ ती सिच्युएशन नाही.
दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"

शोधते रे..रु.रा.ची हुतुतू मधली गाणी चांगली आहेत. कारण - गुलजार, विशाल भारद्वाज combination.. (जरा विषयाला सोडुन झालं राव.. चु.भु.दे.घे.) Happy

बास का ह्या विश्वातले सारे गहन विषय इथंच चर्चीले जातात! चालुद्या!

मी आत्ताच एका अत्यंत गंभीर :)अश्या बीबी वर गेलो होतो:

दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"


दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"

विषय मस्त घेतला आहेस आणि मांडलाही उत्तमच.
एका कथेची ही सुरुवात असु शकेल. बघ विचार कर.
अनघा

अनघा,
हम्म्म्म तुलाही अस वाटतय?:) खरतर ही एक कथाच आहे पाहिजे तर असं म्हण के पूर्वार्ध...
आणी तो तसाच बसलेला असतो... (तिची) दुसरी कॉफी संपवत...
>>> ह्याच्यापुढेही मी लिहिलय पण इथं प्रसारीत केलेल नाही.. पण आता करीन लवकरच.. Happy मनापासून धन्यवाद!!

"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.